महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

मुख्यमंत्र्यांची विठ्ठलपूजा पंढरपुरात नव्हे, 'वर्षा'वरच

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आपण पंढरपूरच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. वारी ही राजकीय व सामाजिक अभिनिवेशापलीकडे असली पाहिजे', अशा शब्दांत कान टोचत मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' या निवासस्थानीच विठ्ठलपूजा करण्याचा निर्णय जाहीर केला...
                 

बेजबाबदार वक्तव्य केल्यास कारवाई; राहुल यांचा इशारा

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करत पक्षाला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील वाचाळवीरांना तंबी देत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 'मी मोठी लढाई लढतो आहे. सर्वांना पक्षाच्या व्यासपीठावर बोलण्याचा हक्क आहे, मात्र पक्षाचा कुणीही नेता बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर मी कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही', अशा शब्दात राहुल यांनी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना इशारा दिला आहे...
                 

LIVE: 'बिग बॉस'च्या घरातून शर्मिष्ठा राऊत बाहेर

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदी सरकारचे काउंटडाउन सुरू: सोनियांचा हल्ला

13 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून त्याचा प्रत्यय काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत आला. 'मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे', असे वक्तव्य यूपीएच्या अध्यक्ष आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे...
                 

काँग्रेसचे मिशन ३००; भाजपविरोधात नवी रणनीती

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आज झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच या निवडणुका लढवण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं...
                 

संघर्षपट समजून तरी घ्या!

                 

'ते' शिवरायांचे मावळे होऊच शकत नाही: CM

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मराठा संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी पूजेला जाता आलं नाही. त्यामुळे पूजेपासून रोखणाऱ्या संघटनांना फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहेत. 'काही संघटनांनी वारकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू केलं आहे. मागण्यांसाठी वारकऱ्यांना वेठीस धरणं चुकीचं असून जे वारकऱ्यांना वेठीस धरतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाहीत,' असे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांना सुनावले आहेत...
                 

पूर्णा पटेल

17 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ मनोरंजन  
                 

नगर-सोलापूर महामार्गावर अपघात; ५ वारकरी ठार

21 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदींची गळाभेट; पवारांकडून राहुलना शाबासकी

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

डोंबिवली: RTI कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

अखेर सॅनिटरी नॅपकीन करमुक्त; GST परिषदेत झाला निर्णय

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे देशाच्या ग्रामिण भागातील महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणार आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. बैठकीला उपस्थित राहिलेले राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे...
                 

आफ्रिकेच्या 'महाराज'चा पराक्रम; लंकेचं लोटांगण

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
दक्षिण अफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज यानं आज नावाला साजेशी कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तब्बल आठ विकेट घेऊन त्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला. एका डावात ९ गडी बाद करणारा महाराज हा जगातील १७वा तर दक्षिण अफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे...
                 

मुंबईचे गुजरात करण्याचा सरकारचा डाव: भुजबळ

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पाहाः पुण्यात इमारत कोसळली; आठ जखमी

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पुण्यात मुंढवा येथील केशवनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्या खालून ७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली एक मुलगा अडकल्याची भीती व्यक्त होतेय. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. कैलास भांडवलकर (वय ६०), छाया भांडवलकर (वय २२) , साक्षी शितल (वय १२), स्वरा शितल (वय ३), आदित्य मोरय्या (वय ५), अरुणा भांडवलकर(वय ४०),मुग्धा भांडवलकर (वय १ वर्ष), विनीता रामसुरज मोरय्या आदी जखमी. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू...
                 

१९५ जवान देशसेवेत; पाहा शानदार संचलन

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

कोण कोणाचे?; अविश्वास प्रस्तावातून 'ट्रेलर'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सिनेरिव्ह्यू: 'धडक'मध्ये सैराटची गंमत नाही!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
एखाद्या चित्रपटाचा 'रीमेक' काढताना मूळ चित्रपटाचा आशय तोच ठेऊन एका नव्या मांडणीमध्ये सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांपुढे आणण्याची एक प्रचलित पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे 'रीमेक'च्या नावाखाली मूळ सिनेमाची पुरती वाट लावून भलताच सिनेमा निर्माण करण्याचे प्रकारही आपल्याकडे घडतातच; पण तरीही 'रीमेक' करताना मूळ कलाकृतीचा आत्मा तोच राहावा, अशी अपेक्षा असते. नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'सैराट'चा 'रीमेक' करताना मात्र 'सैराट'मधील निर्माता-दिग्दर्शकाला हव्या असलेल्या आवश्यक तेवढ्याच गोष्टी उचलल्या जातात आणि त्यानंतर एक टिपिकल लव्ह स्टोरी पडद्यावर साकारली जाते...
                 

स्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपणार नाही

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवस्मारकाची उंची कमी केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान दिले होते. मात्र विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तुम्ही १५ वर्षांत काय केले, परवानग्याही घेतल्या नाही, असे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली होती. आता या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती समाजासमोर मांडायला हवी, असे विखे-पाटील म्हणाले. तर, सरदार वल्लभभाई पटेल यांचेच स्मारक उंच राहावे यासाठी शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला...
                 

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आषाढी वारीच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी १९० बसची व्यवस्था केली आहे. ३० जुलैपर्यंत एसटीच्या सुमारे एक हजार फेऱ्या होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. शिवाय कोल्हापूरसह जिल्ह्यातील सर्व डेपोंमध्ये आरक्षणाचीही सोय केली आहे. पुरेसे आरक्षण झाल्यास थेट गावातून बस सोडली जाईल...
                 

राहुल यांचे भाषण गेमचेंजर; काँग्रेसकडून प्रशंसा

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पावसाची हजेरी; मुंबईकरांचा वीकेण्ड ओलाचिंब

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पावसाने या आठवड्यात मुंबईकरांना उसंत घ्यायला वेळ दिला. मात्र आठवड्याच्या अखेरीस तो पुन्हा मुंबईकरांना भिजवायला येणार आहे. अधून-मधून भिजवत शुक्रवारीच पावसाने याची जाणीव करून दिली. ढगाळ वातावरणासह सकाळी ८.३०पासून सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे १.६ मिलिमीटर आणि सांताक्रूझ येथे केवळ ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी मुंबई-ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे...
                 

न्यायालयच जेव्हा नियमभंगाच्या फेऱ्यात अडकते!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातील आरोपीने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही तपास अधिकारी असलेल्या पोलिसाने आरोपपत्र दाखल केले आणि दंडाधिकारी न्यायालयानेही खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आरोपीला जामीन दिला, याची मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे...
                 

वाहतूकदारांच्या संपाने ४ हजार कोटींचा फटका

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

राहुलना फ्रान्सचे उत्तर; करार सार्वजनिक होऊ शकत नाही

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने फ्रान्सशी केलेल्या राफेल कराराबाबतच्या गंभीर आरोपांचे फ्रान्सने खंडन केले आहे. या 'करारात घोटाळा झाला असून विमानांची किंमत वाढवण्यात आली', असा आरोप राहुल यांनी केला होता. याबरोबरच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी राफेल करारासंदर्भात देशाला खोटी माहिती दिली, असा आरोपही राहुल यांनी केला होता...
                 

नाणार सारखा प्रकल्प विदर्भात आणणार: CM

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोस्टल म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील असल्याने तो विदर्भात येऊ शकत नाही. मात्र जमिनीवरील रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभा राहू शकतो. हे लक्षात घेता तसा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे...
                 

लोकसभेत राहुल गांधींनी घेतली मोदींची गळाभेट

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आज लोकसभेत वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र, त्याचवेळी मोदी किंवा भाजपबद्दल आपल्या मनात द्वेष नसल्याचं सांगत राहुल यांनी भर लोकसभेत मोदींची गळाभेट घेतली. त्यांच्या या मिठीची रसभरीत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे...
                 

मुंबई: भायखळा जेलमध्ये ३०० कैद्यांना विषबाधा

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

रिव्ह्यू: 'धडक' अर्थात, हिंदी 'सैराट' का बघावा?

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'सैराट' या मराठी चित्रपटाचा रिमेक, श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिचा पहिलाच चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाउड'मधून सिनेरसिकांची मनं जिंकणारा ईशान खट्टर यांच्यामुळं 'धडक' विषयी प्रचंड उत्सुकता होती. ही उत्सुकता आज अखेर शमेल. प्रचंड गाजावाजानंतर हा चित्रपट प्रदर्शित झालाय. 'हम्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हे हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक शशांक खेताननं चित्रपटाची मांडणी थोड्या वेगळ्या पद्धतीनं केलीय...
                 

वाहतूकदारांचा संप सुरू; परिणाम दिसू लागले!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सिनेरिव्ह्यू: 'रे राया'... उरतो केवळ इच्छापट

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल का मिळत नाहीत? याला कारणे दोन. पहिली आपण आपल्या विविध समाजातील लोकांत उपजत असलेल्या कलागुणांचा वापर करून घेत नाही. उदा. डोंबारी. त्यांच्यातील तरुणांना खेळगुण दाखविण्यास सज्ज करणारे योग्य प्रशिक्षण दिले तर ते नॅशनल चॅम्पियन बनू शकतात. किंवा चोऱ्या करून पळणारे चांगले धावपटू होऊ शकतात. आणि दुसरे कारण, अर्थातच आपली शिश्टीम. त्यावर आपण मात केली आणि हे दोन अडथळे दूर केले की आपल्याला कोणीही विजेते होण्यापासून रोखू शकत नाही.'..
                 

सिनेरिव्ह्यू: '३१ दिवस'ची संकल्पना चांगली पण...

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
काही संकल्पना अशा असतात की कोणीही त्याच्या मोहात पडावं. अशा विलक्षण, आऊट ऑफ द बॉक्स संकल्पनासाठी चित्रपट उद्योगच नव्हे तर प्रेक्षकदेखील वाट पहात असतात. मात्र ती एका सफल चित्रपटात रुपांतरीत करण्यासाठी, ती संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याचे कथेत रूपांतर करण्याचे कसब नसेल तर त्याचे मूल्य शून्यच...
                 

नव्वद टक्क्यांवरील शेकडो विद्यार्थी प्रवेशाविनाच

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पसंख्याक कोटा आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांतूनच भरणे अनिवार्य आहे. यामुळे अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी खुल्या करण्यात आलेल्या या कॉलेजांच्या जागा काढून घेतल्यामुळे अनेक नामांकित कॉलेजांमध्ये दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये खुल्या प्रवर्गातील एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकलेला नाही...
                 

'गर्भपातांच्या अर्जांबाबत समिती स्थापन करा'

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
गेल्या काही महिन्यांत आमच्यासमोर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्यास परवानगी मागणाऱ्या अनेक याचिका आल्या आहेत. अशा याचिका वारंवार येत असतील तर राज्य सरकारच याप्रश्नी एक कायमस्वरुपी समिती स्थापन का करत नाही, असा संतप्त सवाल करत याविषयी गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला दिले...
                 

सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? विखेंचा सवाल

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्य सरकार केवळ घोषणाच करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आतापर्यंत केवळ निरनिराळे शासन अध्यादेश काढले जात आहेत, मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न जनतेपुढे आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत म्हणाले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले...
                 

शिवस्मारकाची उंची नेमकी किती?; संभ्रम वाढला!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा वाद अद्याप कायम आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पुतळ्याची उंची ४४ मीटर कमी करण्यात येणार आहे. पर्यावरण विभागाच्या परिपत्रकामुळे उंचीचा मुद्द्यावरील संभ्रम वाढला असून शिवसेनेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे...
                 

शिवाजी महाराजांचे दुर्मिळ ‘आश्वासनपत्र’ सापडले

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

तरुणींनी 'असा' शिकवला रोडरोमियोला धडा

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आगळ्या वेगळ्या कल्पनेचं 'व्हॉट्सअॅप ग्रंथालय'

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सलग दोन वर्षं... सातशे तीस दिवसांहून अधिक दिवस... दररोज सकाळी पहाटे पाच ते सातची वेळ... व्हॉट्सअॅप आणि त्यावरील ६५हून अधिक ग्रुप आणि ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून आठ हजारांहून अधिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत एक ऑडिओ क्लिप नियमितपणे पोहोचत आहे. हे काम करणारे अवलिया आहेत भिवंडीतील अंजूरफाटा येथील जिल्हा परिषद शिक्षक अलंकार वारघडे. त्यांचा या कामाबद्दल राष्ट्रीय गौरव करण्यात आला आहे...
                 

'OBC असल्यानं सभागृहात बोलू दिलं जात नाही'

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'मी इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्याने मला सभागृहात बोलू दिले जात नाही', असा थेट आरोप पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांनी महापौरांकडे केली आहे. पुणे महापालिकेच्या कारभाराविषयी थेट नागरिकांशी संबंधित असलेले सुमारे ६० लेखी प्रश्न विचारले असून अद्याप एकदाही आपल्याला प्रश्नोत्तरे करण्याची संधी महापौरांनी दिलेली नाही याकडे ससाणे यांनी पत्राद्वारे महापौरांचे लक्ष वेधले आहे...
                 

पाहा 'संजू' चित्रपटाचे न पाहिलेले गाणे!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
रणबीर कपूरचा सुपरहिट चित्रपट 'संजू'वर सध्या सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'संजू' हा बॉलिवूडमधील घसघशीत कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे संगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. परंतु संजू चित्रपटासाठी एक गाणे चित्रित करण्यात आले होते, व त्या गाण्याचा वापर चित्रपटात झालाच नाही. अशी माहिती राजकुमार हिरानी यांनी दिली...
                 

शंभराची नवी नोट येतेय; जुन्या नोटाही चालणार

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सुझुकीची 'बर्गमन स्ट्रीट १२५' भारतात लॉन्च

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सुझुकीने त्यांची नवीन स्कुटर 'सुझुकी बर्गमन स्ट्रीट १२५' ही आज लॉन्च केली आहे. दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये या स्कुटरची पहिली झलक दाखण्यात आली होती. या स्कुटरचं डिझाइन एका मोठ्या बर्गमन स्कुटरवरून घेण्यात आलं आहे. सुझुकीनं भारतात लॉन्च केलेली ही सुझुकीची दुसरी १२५ सीसीची स्कुटर आहे. पाहूयात काय आहेत याचे फीचर्स:..
                 

महिलांसाठी भारत असुरक्षितच: जया बच्चन

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

भर वर्गात विद्यार्थ्याला पॅन्ट काढायला लावली

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

शनिशिंगणापूर मंदिर अखेर सरकारच्या ताब्यात

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

चंद्रपूर: प्रसाधनगृहाशेजारी भाज्यांची स्वच्छता

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पाहा: 'या' रंगात येणार १०० रुपयाची नवी नोट

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
१०० रुपयाची व्हायोलेट रंगाची नवी नोट आता चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने तशी तयारी केली आहे. १०० रुपयाच्या या नव्या नोटमध्ये मायक्रो सेक्युरिटी फिचर्स असतील. ही नोट ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये चलनात येण्याची अपेक्षा आहे. आता १०० रुपयाच्या नोटच्या तुलनेत नवीन नोटचा आकार हा छोटा असेल. पण नव्या १० रुपयाच्या नोट पेक्षा १०० रुपयाच्या नव्या नोटचा आकार काहीसा मोठा असणार आहे. या नोटेवर गुजरातमधील राणीच्या विहिरीचे चित्र असणार आहे. नवीन नोट चलनात आल्यावरही जुनी नोट चलनात कायम राहणार आहे...
                 

'बिग बॉस'चं धक्कातंत्र; सर्व स्पर्धक अंतिम फेरीत

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
रेशम टिपणीस बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उरलेल्या सहा स्पर्धकांपैकी टॉप-५ मध्ये कोण जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. सहा स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागणार होतं. मात्र, बिग बॉसनं धक्कातंत्राचा वापर करत सर्वांनाच अंतिम फेरीत प्रवेश दिला. पुष्कर, अस्ताद, सई, मेघा, शर्मिष्ठा आणि स्मिता हे सहाही स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे फायनलिस्ट आहेत...
                 

आशियाई स्पर्धांसाठी निवडीचे निकष शिथील

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आगामी आशियाई स्पर्धांसाठी भारतीय अॅथलिट्सची निवड करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन्सला अधिक मोकळीक देत खेळाडूंच्या निवडीबाबतचे काही नियम शिथील केले आहेत. काही अॅथलिट्सच्या निवडीवरून सरकारवर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धा १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत इंडोनेशियात होणार आहेत...
                 

मराठा तरूण आक्रमक; राज्यभरात आंदोलन सुरू

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. पुणे, मुंबई आणि सोलापूरसह राज्यभरात मराठा तरुणांनी मोर्चा, ठिय्या आंदोलन करत राज्यसरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. या आंदोलकांनी राज्यभरातून पंढरपुरात येणाऱ्या एकूण १६ बसेस फोडल्याने पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे...
                 

हवामानशास्त्राचा आधारस्तंभ

                 

'मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री खोटे बोलताहेत'

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

'त्या' मिठीवरून काँग्रेसची मुंबईत पोस्टरबाजी

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत अचानक मिठी मारल्याने त्यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असले तरी मुंबई काँग्रेसने मात्र राहुल गांधी यांच्या या कृतीचं समर्थन करणारी पोस्टर संपूर्ण मुंबईत लावून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'द्वेषाने नव्हे, प्रेमाने जिंकणार,' असा मजकूर लिहिलेली ही पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत...
                 

काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा; चकमक सुरूच

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिरेक्यांनी पोलीस शिपाई शहीद मोहम्मद सलीम शहा यांची हत्या केली होती, त्याच ठिकाणी सुरक्षा दलाने या अतिरेक्यांचा खात्मा करून शहा यांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे...
                 

'मनुवाद आणि मनीवादी वृत्तीचा देशाला धोका'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुंबई: तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

GST परिषदेचा सवलतीचा पाऊस; १०० वस्तू होणार स्वस्त

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या आज पार पडलेल्या २८व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सॅनिटरी नॅपकीनसह अनेक वस्तू करमुक्त करण्यात आल्या असून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह ५०हून अधिक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १००हून अधिक वस्तू स्वस्त होणार आहेत असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले...
                 

वेंडरसेला नाइट आऊट पडलं भारी, वर्षाची बंदी!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
श्रीलंकेचा क्रिकेटपटू जेफ्रे वेंडरसे याला नाइट आऊट चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळेच श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड, एसएलसीने एक वर्षासाठी जेफ्रेच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नाही, तर जेफ्रेला २० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. बोर्डाने जेफ्रे याला आचारसंहितेचा भंग केल्यामुळे दोषी ठरवले आहे. नाइट आऊट केल्यामुळे जेफ्रेवर ही कारवाई करण्यात आली आहे...
                 

पाहाः अहमदनगरमधील भंडारदरा धरण भरले

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

तुकाराम मुंढेंचा सत्ताधारी भाजपला 'असा' झटका

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
विविध कारणांमुळं सतत चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा फटका आता नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपला बसला आहे. प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा महापालिका सभेचा ठराव मुंढे यांनी बेकायदेशीर ठरवला आहे. महापालिकेनं अधिकाराच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे...
                 

'मोदींच्या लोकप्रियतेबरोबर 'मॉब लिंचिंग' वाढेल'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

राजस्थान: गो तस्करीच्या संशयावरून एकाची हत्या

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदींवरच विश्वास! अविश्वास प्रस्ताव लोकसभेने फेटाळला

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात तेलुगु देसम पक्षाने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील लढाई मोदी यांनी शुक्रवारी अपेक्षेनुसार सहज जिंकली. या प्रस्तावाच्या बाजूने १२६, तर विरोधात ३२५ मते पडली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आरोपांची सरबत्ती, त्यांनी घेतलेली मोदी यांची गळाभेट, सहकाऱ्यांकडे पाहून त्यांनी मिचकावलेला डोळा, चर्चेला मोदी यांचे दीड तासाचे प्रत्युत्तर ही या रणकंदनाची वैशिष्ट्ये ठरली...
                 

नाट्यरिव्ह्यू: अशा आहेत दिनूच्या सासूबाई राधाबाई

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' या नाटकाचं नाव बदललं असतं तर ते चांगलं झालं असतं, कारण आता रंगभूमीवर जो प्रयोग सादर होतो त्यात तरी बबन प्रभूंचं काही राहिलेलं नाही. ते दिग्दर्शक-अभिनेता संतोष पवार आणि अभिनेत्री नयना आपटे यांचं झालेलं आहे. कारण संतोषने दिग्दर्शक म्हणून त्यावर स्वत:च्या शैलीचं कलम केलं आहे आणि अभिनयात तर संतोष आणि नयनाबाई या दिनू आणि राधाबाई न वाटता संतोष आणि नयना आपटेच वाटतात. त्यामुळे नाटकाचं नाव 'संतोषच्या सासूबाई नयनाबाई' असं दिलं असतं तर ते जास्त समर्पक ठरलं असतं...
                 

सरकारचा सारा पोकळवासा; विखेंचे टीकास्त्र

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
चार वर्षांत राज्यातील विकासकामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. मागच्या दारातून व्यवहार होऊन बिल्डरांना जमिनी देण्यात येते. हे राज्य बिल्डरांचे संरक्षण करणारे आहेत. विदर्भाच्या नावावर राजकारण करणाऱ्या सरकारने नागपुरात मिनी मंत्रालय का आणले नाही? वर्षभरात किती कॅबिनेट बैठक घेतल्या, अशी विचारणा करीत सरकारचा सारा पोकळवासा असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली...
                 

फेरीवाला संघटनांची मुंढेंविरोधात कोर्टात धाव

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
नाशिकरोड येथील शिवाजी पुतळा परिसरातील व्यावसायिकांचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने बुधवारी हटविल्यानंतर जिल्हा फेरीवाला आणि टपरीधारक संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नी दाद न दिल्यास संघटना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार आहे. दरम्यान, फेरिवाला नियोजन समितीचे प्रतिनिधी शनिवारी आयुक्तांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत...
                 

मिठी मारणं बालिशपणा; भाजपनं उडवली खिल्ली

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

खड्ड्यांना जबाबदार कोण? कोर्टाने फटकारले

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

चक दे! आजपासून रंगणार महिला हॉकी वर्ल्ड कप

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
महिलांच्या हॉकी वर्ल्डकपला आज, शनिवारपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे. महिला हॉकी क्रमवारीत नेदरलँड्सचा संघ अव्वल असून, इंग्लंडचा संघ दुसऱ्या, तर अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ कुठपर्यंत मजल मारतो, याबाबत उत्सुकता आहे...
                 

कोळीवाड्यातील जागा रहिवाश्यांच्या नावावर

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरातील जिल्हाधिकारी जमिनीवर वसलेल्या कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तसेच मच्छिमार मासे सुकविण्यासाठी ज्या जागेचा वापर करतात ती जागा अन्य कत्यिही कामासाठी वापरण्यात येणार नाही,असेही पाटील यांनी जाहीर केले...
                 

डीएसकेंच्या विरोधात आणखी दोन गुन्हे दाखल

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'आडवाणींच्या रथयात्रेमुळेच अयोध्येचा पेच'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'बंदी असताना लोकप्रतिनिधीच गुटखा खातात'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्यात गुटखाबंदी असतानाही परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, गुटखाबंदीचा उपयोग काय, अशा मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा सुरू असतानाच आमदार आशिष देशमुख यांनी लोकप्रतिनिधीच गुटखा खात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अन्न व औैषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनीही यावर उत्तर देत गुटखा खाणाऱ्या मंत्र्यांची यादी मागितली. ही यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे येरावार म्हणाले...
                 

राहुल यांच्या गळाभेट, डोळा मारण्यावर नाराजी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आज लोकसभेत भलेही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेत सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र राहुल गांधी यांचे कृत्य सत्ताधाऱ्यांना रुचलेले नाही. राहुल गांधी यांच्या या वागण्यावर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले आहे. राहुल यांची वागणूक योग्य नसून त्यांनी पंतप्रधानपदाचा आब राखायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. गळाभेट घेण्याच्या आपण विरोधात नाही, मात्र पंतप्रधान म्हणजे कुणी सामान्य व्यक्ती नाही...
                 

बिग बॉस: भर पत्रकारपरिषदेत मेघा-सईची जुंपली

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

व्हॉट्सअॅपचा एक मेसेज ५ वेळाच फॉरवर्ड होणार

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home