महाराष्ट्रा टाइम्स

भारत-चीन सीमेवर तणाव; अजित डोवल यांनी PM मोदींना दिला अहवाल

an hour ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पूर्व लडाखमधील बदलत्या स्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. महत्त्वाकांक्षी सैन्य सुधारणा आणि युद्ध क्षमता वाढवण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींसोबतची ही बैठक आधीपासूनच ठरलेली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पँगोंग लेक, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथे दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून तिथे तणाव आहे...
                 

शेकडो वटवाघळं मेलेली आढळल्याने गोरखपूरमध्ये भीतीचं वातावरण

3 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

महाराष्ट्रात ५० विशेष ट्रेन नुसत्याच उभ्या, रेल्वेमंत्र्यांची राज्य सरकारवर टीका

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
आम्ही महाराष्ट्रासाठी १४५ ट्रेन दिल्या आहेत. पण आज सकाळपासून ते दुपारी १२.३० पर्यंत एकही प्रवासी विशेष ट्रेनमध्ये चढलेला नव्हता. १४५ ट्रेन पैकी ४१ ट्रेन या पश्चिम बंगालला रवाना होणार आहेत. उरलेल्या ७४ ट्रेन पैकी फक्त २४ ट्रेन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रवाना झाल्या. अजूनही ५० ट्रेन महाराष्ट्रात फक्त उभ्या आहेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले...
                 

स्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला विचारला जाब

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

या कारणामुळे देशात करोना रुग्णसंख्येचा उद्रेक

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
देशात दररोज एक लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. त्यामुळे आकडा तर वेगाने वाढत आहेच. शिवाय विमान आणि रेल्वे प्रवासालाही मुभा देण्यात आल्यामुळे स्थलांतरितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवासात करोनाची लागण होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळेच देशात आणि महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे...
                 

भारत-चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

लडाखमध्ये तणाव; चिनी सैनिकांइतके जवान भारतही तैनात करणार

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
लडाखमध्ये चीनने सैनिकांची जमवाजमव केल्याने त्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भारतीय लष्कराकडून देण्यात आली. लडाखमध्ये भारतीय लष्कराचे जवान मागे हटणार नाहीत. दुसऱ्या बाजूला चीनसोबत चर्चाही सुरू राहणार आहे. सीमा भागातील रस्त्यांचे बांधकाम सुरू ठेवण्यासह आणि चिनी सैनिकांच्या बरोबरीने भारतीय लष्कराच्या जवानांची संख्याही वाढवण्याचा निर्णय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या बैठकीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं...
                 

महाराष्ट्रात काँग्रेस निर्णायक भूमिकेत नाही- राहुल गांधी

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

श्रमिक रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, व्हिडिओ व्हायरल

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी हवं 'फिटनेस सर्टिफिकेट'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

एअर इंडियाला पुढील १० दिवस मधल्या सीटचे बुकिंग करता येणार: सुप्रीम कोर्ट

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
सुप्रीम कोर्टाने एअर इंडियाला पुढील १० दिवसांपर्यंत विमानांमधील मधील सीटवरील बुकिंगची परवानगी दिली आहे. मात्र, या नंतर मधील सीटचे बुंकिंग करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने एअर इंडियाला निर्देश देताना म्हटले आहे. एअर इंडियाने लोकांची चिंता करण्याची आवश्यकता असल्याचे नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे...
                 

आंध्र, प. बंगाल वगळता उद्यापासून देशांतर्गत विमान सेवा होणार सुरू

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

चिनी सैनिकांनी जवानांना ताब्यात घेतल्याचे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना ताब्यात घेतलं नाही. तसंच त्यांची शस्त्रंही हिसकावली नाहीत, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलंय. तसंच अशा वृत्तांमुळे देशहिताला ठेच पोहोचू शकते, असं म्हटलंय. दरम्यान, चिनी सैन्याने गेल्या दोन आठवड्यात गॅल्वान खोऱ्यात १०० तंबू उभारले आहेत. तसंच बंकर बनवण्यासाठी मशिनरीही आणण्यात येत आहे...
                 

यूपी सरकारने करोना वॉर्डातील मोबाइल बंदी उठवली

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
यूपी सरकारने कोरना आयसोलेशन वॉर्डात मोबाइल बंदीचा आदेश मागे घेतला आहे. नव्या आदेशानुसार, रुग्णांना अटींसह खाजगी मोबाइल वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये जाण्यापूर्वी, रुग्णाला आपल्याकडे मोबाइल फोन आणि चार्जर असल्याचे सांगावे लागणार आहे. त्यानंतर आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होण्यापूर्वी रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे मोबाइल आणि चार्जरचे निर्जंतुकीकरण केले जाईल. त्याच वेळी, मोबाइल आणि चार्जर रुग्ण इतर कोणत्याही रुग्ण आणि आरोग्य कर्मचार्‍यांना देणार नाही...
                 

राजस्थानला उष्णतेच्या लाटेचा इशारा; पंजाब, हरयाणा, दिल्लीतही उष्मा वाढणार

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

२५ हजारांत 'करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट', ठगाला अटक

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

प्रवाशांनो घाबरू नका, रेल्वेचं RAC तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता...

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

करोना: लॉकडाउनमुळे टळले ३७,०००-७८,००० मृत्यू, सरकारची माहिती

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राहुल गांधींनी घेतली मजुरांची मुलाखत; शेअर केला व्हिडिओ

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राजधानी विशेष ट्रेनसाठी आता ३० दिवसांपूर्वी करा अॅडव्हान्स बुकींग

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने १२ मेपासून ३० विशेष राजनाधानी ट्रेन चालवण्यास सुरुवात केली. या ट्रेन नवी दिल्ली स्टेशनवरून सुटणाऱ्या आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये या ट्रेनच्या फेऱ्या सुरू आहेत. पण आता या ट्रेनसाठी रेल्वेने काही नियम बदलले आहेत. यामुळे प्रवाशांना याचा अधिक फायदा होणार आहे. वाचा काय आहेत ते नियम......
                 

अम्फान महाचक्रीवादळ; ओडिशाला ५०० कोटींची मदत जाहीर

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
ओडिशामधील मदतकार्यासाठी भारत सरकार ५०० कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. ओडिशाला या आपत्तीतून उभरण्यासाठी केंद्र सरकार सर्व मदत करेल. नुकसानीचा सखोल आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसंच नुकसानग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योजना बनवण्यात येत आहेत, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं...
                 

स्वावलंबी भारत पॅकेज म्हणजे क्रूर थट्टा : सोनिया गांधी

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

एक लाख कोटींचं नुकसान आणि मदत १००० कोटींची; ममता भडकल्या

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

'अम्फान'ग्रस्त पश्चिम बंगालच्या मदतीसाठी पंतप्रधानांकडून १००० कोटींची मदत

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

रेल्वेचं तिकीट मिळवणं आणखी सोपं... स्टेशन काऊंटर, एजंटद्वारेही होणार बुकिंग

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

ममता दीदींच्या आवाहनानंतर पंतप्रधान मोदी आज बंगालच्या दौऱ्यावर

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

चीनकडूनच गस्तीत आडकाठी घालण्याचा प्रयत्न, भारताने सुनावले

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
भारतीय लष्कराच्या तुकड्यांच्या सर्व हालचाली या भारतीय सीमेतच करण्यात येत आहेत. भारतीय सीमेच्या सुरक्षेसाठी निश्चित केलेल्या प्रक्रियेचे त्यांच्याकडून कठोर पालन होते. भारतीय लष्कराचे जवान भारत-चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत जाणून आहेत. या सीमेचे प्रामाणिकपणे पालन करण्यात येत आहे. यामुळे भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडल्याच्या चीनच्या दाव्यात कुठलेही तथ्य नाहीए. चिनी सैनिकांडूनच भारतीय जवानांच्या गस्तीत आडकाठी घातली जातेय, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय...
                 

अम्फानने ७२ बळी घेतले, मोदींनी राज्याचा दौरा करावा: ममता बॅनर्जी

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

मजुरांना मदत करणाऱ्यांना यूपी सरकार तुरुंगात टाकतंय: प्रियांका गांधी

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
संपूर्ण जग करोनाशी लढण्यासाठी उभे ठाकले असताना, जे लोक मजुरांसाठी बसची व्यवस्था करताहेत, जे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करताहेत, जे त्यांच्या तिकिटांची व्यवस्था करताहेत, अशांना उत्तर प्रदेश सरकार तुरुंगाचा रस्ता दाखवत आहे, अशी टीका कांग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली आहे...
                 

काँग्रेस आमदार अदिती सिंह पक्षातून निलंबित; पक्षावरील टीका भोवली

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

कुपवाड्यात ३ दहशतवाद्यांना पकडले; दहशतवाद विरोधी दिनी मोठे यश

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राम जन्मभूमी परिसरात सापडल्या खंडित मूर्त्या आणि शिवलिंग

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

लॉकडाऊनमध्ये शिवसेना नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

नेपाळचा नवा नकाशा तथ्यहिन आणि बनावट, भारताने दावा फेटाळला

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
नकाशा जारी करणाऱ्या नेपाळने अशा प्रकारच्या अनुचित दाव्यांपासून दूर राहिलं पाहिजे. नेपाळने भारताच्या सौर्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा स्वीकार केला पाहिजे. सीमावाद हा चर्चेद्वारे सोडवता येऊ शकतो. पण नेपाळचा हा प्रयत्न त्याविरोधी आहे. अशा प्रकारच्या एकांगी कारवाईला कुठल्याही ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांचा आधार नाहीए, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे...
                 

गुजरातहून चालतच उत्तर प्रदेशला पोहचली ८ महिन्यांची गर्भवती

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन? सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला...

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

स्थलांतरीत मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय अधिक सुरक्षित!

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

जम्मू-काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा लागू, पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

नेपाळचा नवा नकाशा; भारताच्या भूभागावर केला दावा

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली. या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताच्या हद्दीतील आहेत. नेपाळच्या आगळकीवर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते...
                 

क्वारंटाइन सेंटरमध्ये थिरकल्या बारबाला, व्हिडिओ व्हायरल

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विभुतीपूर प्रखंड येथील देशरी कर्रख पंचायतीच्या क्वारंटाइन सेंटरमधील हा व्हिडिओ आहे. एका शाळेत हे क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आलं आहे. अनेक स्थलांतरीत मजुरांना येथे क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या मजुरांसाठी बार बालांच्या नाचण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मजुरांचे मनोरंजन व्हावे, यासाठी हा बार बालांच्या नाचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असं क्वारंटाइन सेंटरच्या प्रभारीने सांगितलं...
                 

'सुपर सायक्लोन'चा प. बंगालला धोका; ३ लाख नागरिकांना हलवले

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
'अम्फान सुपर सायक्लोन' हे उद्या कधीही धडकू शकते. यामुळे एनडीआरएफसह विविध विभाग परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. एनडीआरएफच्या १५ टीमनी ओडिशामध्ये काम सुरू केले आहे. पश्चिम बंगालमध्ये १९ टीम कामाला लागल्या आहेत. एकूण ४१ टीम सध्या तैनात आहेत. यापैकी काही टीम राखीव आहेत. चक्रीवादळाने अधिक नुकसान होऊ शकते अशा भागात एनडीआरएफच्या बहुतेक टीम तैनात करण्यात आल्या आहेत...
                 

Amphan cyclone live news: अमित शाहांचा ममता बॅनर्जींना फोन

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा केली...
                 

१९५ किमीच्या वेगानं आज धडकणार 'अम्फान' चक्रीवादळ

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
super cyclone amphan : सुपर सायक्लोन 'अम्फान' अतिशय भयंकर रुप धारण करून भारतीय समुद्र किनाऱ्याला धडक देण्याच्या तयारीत आहे. 'अम्फान'च्या रुपात १९९९नंतर पहिल्यांदाच एखादा सुपर सायक्लोन भारतात धडकणार आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना आणि वायुसेनेलाही अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलाय, यावरूनच याचा धोका लक्षात यावा. या वादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 'अम्फान' चक्रीवाळाचं नामकरण थायलंडनं केलंय. या पद्धतीचं धोकादायक चक्रीवादळ मोठं नुकसान पोहचवून जातं. २०१४ साली आलेल्या 'हुडहुड' चक्रीवादळाहूनही हे वादळ भयंकर आणि विध्वंसक असू शकतं. २०१४ मध्ये 'हुडहुड' वादळानं पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांसारख्या समुद्रकिनाऱ्यावरच्या राज्यांशिवाय उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडवून दिला होता...
                 

करोना : एक लाखाचा टप्पा ओलांडणारा भारत ११ वा देश

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

मजुरांनी भरलेला ट्रक पलटला, तीन महिलांचा मृत्यू

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
उत्तर प्रदेशात याआधी औरेयामध्ये भीषण अपघात झाला होता. राजस्थानमधून येत असलेल्या ट्रकला हा अपघात झाला होता. या अपघातात २५ स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना सोमवारी मजुरांच्या ट्रकला अपघात झाला. मजुरांनी भरलेला ट्रक पलटल्याने ट्रकमधील तीन महिलांचा या अपघातात मृत्यू झाला...
                 

मुंबईतील मजुराचा मृतदेह सोडून ट्रक चालक पळाला

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली. मुंबईत काम करणारा एक स्थलांतरी मजूर आपल्या तीन अल्पवयीन मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातील आझमगढमधील आपल्या गावाकडे निघाला होता. पण मध्य प्रदेशात शिवपुरी जिल्ह्यात प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालकाने त्याचा मृतदेह गाडीतून उतरवून रस्त्याच्या कडेला टाकला. मृत मजुराच्या तीन मुलांनाही त्याने ट्रकमधून उतरवले आणि पळून गेला...
                 

रेल्वे पकडण्यासाठी श्रमिकांची तोबा गर्दी, करोना रुग्णही आढळला

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

लॉकडाऊन ४.० मध्ये कोणत्या गोष्टींत मिळाली सूट, पाहा...

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राज्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार, पण...

9 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोन, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन निश्चित करावे. या झोनमधील नियम मात्र केंद्र सरकारकडून निश्चित केले जातील. सर्व प्रकारच्या झोनच्या सीमा ठरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल. जिल्ह्याच्या सीमा खुल्या कराव्यात की नाही याचा निर्णयही जिल्हाधिकारी घेऊ शकतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे...
                 

कुठल्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयारः रेल्वेमंत्री

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
अडकलेल्या मजूर आणि कामगारांसाठी आता कुठल्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास रेल्वे तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अडकलेल्या मजुरांची यादी आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती परवानगीसाठी राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावी, असं गोयल यांनी सांगितलं. यासोबतच रेल्वे राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडेही ही यादी सादर करावी, अशी सूचनाही गोयल यांनी केलीय...
                 

अम्फान वादळाचा धोका, रेल्वे वाहतूक थांबवण्याची मागणी

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

लॉकडाऊन ४ : काय आहेत राज्यांच्या मागण्या?

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागवल्याप्रमाणे राज्यांनी लॉकडाऊन ४ साठी आपापल्या सूचना दिल्या आहेत. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे, तर काही राज्यांनी सवलती वाढवण्याची शिफारस केली आहे. यासोबतच अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन ठरवण्याचा अधिकार द्यावा असंही म्हटलं आहे. १७ मे रोजी देशातील राष्ट्रीय लॉकडाऊनला ५४ दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ४ साठी आता नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा हा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जाहीर करण्यात आला होता. नंतर ही मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यातही वाढ करत लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे पर्यंत वाढविण्यात आला...
                 

श्रमिकांकडून १२ तास काम नाही, विरोधानंतर योगी सरकारची माघार

11 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

समूह संसर्गासाठी भारतानं तयार राहावं, तज्ज्ञांचा इशारा

11 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

भारताला जुलै महिन्यात मिळणार ४ राफेल लढाऊ विमाने

11 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राष्ट्रपतींनी स्वत:च्या पगारात केली ३० टक्क्यांची कपात

11 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

विशेष पॅकेजचा शेतकरी, मजुरांना मोठा फायदाः PM मोदी

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
देशातील ८ कोटी स्थलांतरीत मजूरांना पुढील दोन महिने मोफत अन्न धान्य दिले जाणार आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी नाबार्डकडून ३३ हजार कोटींचे अतिरिक्त भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशा घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. अर्थमंत्री सीतारामन यांनी आज केलेल्या घोषणांमुळे छोटे शेतकरी आणि स्थलांतरीत मजुरांना फायदा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. दरम्यान ८०० श्रमिक विशेष ट्रेनद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतले आहेत...
                 

एअर इंडियाची ६ देशांसाठी उड्डाणं, आजपासून बुकींग

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
भारताने वंदे भारत मिशननुसार जवळपास २० हजार भारतीयांना मायदेशात आणण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. दुसरीकडे एअर इंडियाने काही देशांसाठी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज संध्याकाळी ५ वाजेपासून बुकींग सुरू होईल. एअर इंडियाने या संदर्भात ट्विट करून माहिती दिलीय. नागरिकांना 0124 2641407/02026231407/18602331407 क्रमांकावर कॉल करून माहिती घेता येईल. याशिवाय http://www.airindia.in वरही माहिती देण्यात आली आहे...
                 

आपल्या राज्यात परतू नका, प्रत्येकी १०,००० रुपये मिळतील: नागालंडची घोषणा

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

यूपी, बिहार, एमपीत रस्ते अपघातात १६ मजुरांचा मृत्यू

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

वंदे भारत: तीस हजार लोकांना मायदेशी आणणार

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
'वंदे भारत' मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एअर इंडिया आणि तिची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसने ७ मे ते १४ मे या काळात ६४ विमानांद्वारे १२ देशांतून १४,८०० भारतीयांना सशुल्क पद्धतीने परत आणले. त्याच धर्तीवर आता दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जगभरातील विविध ३१ देशांत अडकलेल्या सुमारे ३० हजार भारतीयांना 'वंदे भारत' मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात मायदेशी आणले जाणार आहे...
                 

केंद्राचे पॅकेज निराशाजनक; विरोधकांचे टीकास्त्र

12 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
केंद्र सरकार देशातील नागरिकांची दिशाभूल करत आहे. सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये असंघटित, सार्वजनिक आणि रोजगार क्षेत्रासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली दिसत नाही. केंद्राचे हे मोठे पॅकेज शून्यासमान असून, त्यात राज्यांसाठी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे...
                 

२२ मेपासून विशेष मेल, एक्स्प्रेस आणि शताब्दीही धावणार

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
श्रमिक आणि राजधानी विशेष ट्रेनच्या आधारावर आता मेल आणि एक्स्प्रेस या विशेष ट्रेनही चालवल्या जातील. यात शताब्दी आणि इंटर सिटी विशेष ट्रेनचाही समावेश होऊ शकतो. या गाड्यांसाठी तात्काळ तिकीटाची सुविधा नसेल. पण वेटिंग लिस्ट बनवली जाईल. या ट्रेनसाठी आरएसी तिकीट मिळणार नाही, असं रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं...
                 

सामान्यांनाही ३ वर्षे लष्करात सेवा देता येणार, प्रस्तावावर विचार सुरू

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
देशातील हुशार आणि सर्वोत्तम तरुणांचा आपल्या दलात समावेश करण्याचा लष्कराचा प्रयत्न राहिला आहे. या प्रस्तावाद्वारे लष्कराला हा उद्देश पूर्ण करणं अधिक सोपं जाणार आहे. सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे लष्करात प्रवेश करून १० वर्ष नोकरी करता येते. पण या पेक्षा कमी कलावधीच्या सेवेची लष्करात अद्याप कुठली यजोना नाहीए. यामुळे सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी लष्करात सेवा देता येईल, या प्रस्तावावर लष्कराकडून विचार सुरू आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली...
                 

दिल्ली: करोनाबाधित लष्करी जवानाची आत्महत्या

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

१००० टन सोन्याचा दावा करणारे शोभन सरकार यांचा मृत्यू

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

करोना: भारतात रुग्णांची संख्या ७५,००० च्या जवळपास, जगात १२व्या स्थानी

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

विलगीकरण कालावधीला १४ दिवसांची मर्यादा नाही: दिल्ली हायकोर्ट

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
'करोनाने अवघ्या जगाला गोंधळात टाकले आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी त्यांना आवश्यक स्वातंत्र्य देण्याची किंवा या साथीच्या आजाराविरोधात लढण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत न्यायालय प्रत्येक प्रकरणात विलगीकरण कालावधीत १४ दिवसांची मर्यादा घालू शकत नाही,' असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे...
                 

४४ लाख मजुरांना श्रमिक ट्रेनने सोडलं, रेल्वे विभागाची माहिती

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणि गृहमंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशन आणि प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेचे उत्तर विभागाचे माहिती जनसंपर्क अधिकारी आर. के. राणा यांनी दिली. एखादा प्रवासी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करत नसेल तर त्याचे तिकीट रद्द करण्यात येत आहे, असं राणा यांनी स्पष्ट केलं...
                 

अँटी सीसीए आंदोलकांना अटक; जावेद अख्तर यांचा गृह मंत्रालयावर निशाणा

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

राहुल गांधींच्या सवालांवर प्रकाश जावडेकर यांचा पलटवार, सांगितली कामे

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

दिल्लीत ८३ परदेशी तबलिघींविरोधात २० चार्जशीट दाखल

10 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

'सरकारनं गरिबांच्या खात्यात १००० रुपये थेट ट्रान्सफर करण्याची गरज'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश  
                 

...म्हणून त्यानं दिली योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; महाराष्ट्र कनेक्शनही उघड!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ देश