महाराष्ट्रा टाइम्स

केस-त्वचेसाठी ही औषधी वनस्पती म्हणजे टॉनिक

सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हाला अश्वगंधापेक्षा दुसरी कोणतीही चांगली औषधी वनस्पती शोधून सापडणार नाही. अश्वगंधाच्या वापरामुळे आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिक तेल उत्पादन होण्याच्या प्रक्रियेस गती मिळते. यामुळे चेहऱ्यावर चमक वाढते. आपल्या त्वचा आणि केसांसाठी अश्वगंधा एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करतं. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीस अतिशय महत्त्व आहे. अश्वगंधामध्ये अँटी- ऑक्सिडेंट, लोह आणि अमिनो अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते. या घटकांमुळे आपल्या चेहऱ्याचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते. शिवाय आपले आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळेच अश्वगंधाला जादुई वनस्पती असे देखील म्हटलं जातं. अश्वगंधा आपल्या शरीरातील हार्मोन संतुलित ठेवण्याचे कार्य करते. अश्वगंधाचा कित्येक आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये देखील उपयोग केला जातो. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करणं टाळा, त्याऐवजी अश्वगंधाचा आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश करा...
                 

मुलांमधील या ५ गोष्टींमुळे मुली होतात प्रभावित

मुलांच्या मनात नेहमी एक प्रश्न घोळत असतो. तो म्हणजे मुलींना आपल्यातील कोणती गोष्ट आणि नेमकं काय आवडतं? आपण कसे वागलो तर त्या इम्प्रेस होतील? पण याचं उत्तर त्यांना शोधूनही सापडत नसतं. मग अशावेळी काही जण रोमँटीक चित्रपटांचा आधार घेतात, काही जण पुस्तकांतून याचं उत्तर शोधतात, पण याचं खरं उत्तर कोणालाच सापडत नाही. खरंतर मुलींचं मन जाणून घेणंच खूप कठीण आहे. त्यांच्या मनात काय सुरु आहे, त्यांना काय आवडतं हे जाणून घेणं फार कठीण आहे. पण मंडळी, आज याचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टी ज्या प्रत्येक मुलगी मुलामध्ये शोधते आणि तिला त्या गोष्टी त्या मुलाकडे जास्त आकर्षित करतात. हा लेख सिंगल असणाऱ्या मुलांसाठी आणि ज्यांना गर्लफ्रेंड आहे त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे. चला तर जाणून घेऊया मुलींच्या आवडीचं गुपित!..
                 

दात येताना बाळाला का होतो अतिसाराचा त्रास?

बाळाला दात येणे हि त्याच्या आयुष्यातली पहिली मोठी घटना असते, पण हि प्रक्रिया स्वत:सोबत बाळासाठी एक त्रास सुद्धा घेऊन येते. तो त्रास असतो अतिसाराचा! बाळाला दात येण्यासोबतच हा त्रास सुरु होतो आणि हा त्रास इतका बाळासाठी असह्य असतो की हसणारं, खेळणारं बाळ खूप रडतं आणि केवळ निपचित पडून राहतं. त्याची ती अवस्था कधी कधी बघवही नाही. तुम्ही सुद्धा बाळाला होणारा हा त्रास स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला असेलच. पण काय आहे यामागचं कारण? दात येताना बाळाला का अतिसाराचा त्रास सुरु होतो? बरेच जण या मागे काहीही तर्क वितर्क लावतात. पण यामागचं नेमकं कारण फारच कमी जणांना माहित आहे. आज तुम्ही सुद्धा ते कारण जाणून घ्याल आमच्या या विशेष लेखातून! चला तर जाणून घेऊया काय आहे या मागचं गौडबंगाल!..
                 

दिवसातून ३ वेळा प्या ‘हे’ पाणी, महिन्याभरात बेली फॅट होईल कमी

वजन कमी करण्यासाठी शरीराची चयापचयाची क्षमता चांगली असणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. या प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे महागडे औषधोपचार करण्याची आवश्यकता नाही. केवळ बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्या आहारामध्ये काही बदल करावे. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच भरपूर उपाय सापडतील. उदाहरण द्यायचे झाले तर गरम मसाल्यातील तेजपत्ता आणि दालचिनीमुळेही वजन घटण्यास मदत मिळते. सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल तर वेट लॉससाठी (Weight Loss) तेजपत्ता आणि दालचिनीचे पाणी प्या. या पाण्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत सुरू राहते. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. ज्यामुळे आपलं वजन कमी होते...
                 

उन्हाळ्यातही तुमचा चेहरा दिसेल तजेलदार, तेलकट त्वचेसाठी वापरा हे ५ फेस पॅक

उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आपल्या त्वचेचं होतं. कडक उन, दमट हवा यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय वाईट परिणाम होतात. ज्या लोकांची त्वचा तेलकट असते, त्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे टॅनिंग, रॅशेज, मुरुम, घामोळे आणि सन बर्नचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये, यासाठी चेहऱ्याची योग्य देखभाल करणं आवश्यक आहे. तुम्हाला बाजारामध्ये कित्येक महागडे सनस्क्रीन आणि अन्य प्रॉडक्ट्स मिळतील. पण या केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टमुळे तुमच्या त्वचेला फायदा होईलच असे नाही. यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता मात्र अधिक असते. तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यासाठी घरगुती फेस पॅकचा वापर करावा. घरगुती उपचारांमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. शिवाय तेलकट त्वचेची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळेल...
                 

प्रेग्नेंसी-पीरियडमध्ये स्तनात होतात असे बदल

                 

तुमच्या उशीची एक्सपायरी डेट तपासून घ्या? अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार

दररोजच्या धावपळीमुळे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यानं दैनंदिन वापरातील कित्येक वस्तू बदलणंही (Replace) शक्य होत नाही. दात घासायचा ब्रश, भांडी घासण्याचा ब्रश यासारख्या वस्तू काही काळानं खराब होतात. या वेळीच बदलल्या न गेल्यास त्या वस्तू आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. तुम्ही तुमची उशी देखील वेळोवेळी बदलता का? अ‍ॅलर्जी, मुरुम, कोंडा किंवा श्वसनाशी संबंधित आजार वारंवार होण्यामागील कारण कित्येक शोधून सापडत नाही. पण तुम्हाला माहितीय का हा त्रास तुम्हाला तुमच्या आवडत्या उशीमुळे देखील होऊ शकतो. आपल्या पैकी बहुतांश जण कित्येक वर्ष एकाच उशीचा उपयोग करतात. आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही सवय अतिशय घातक आहे. उशीची देखील एक्सपायरी डेट असते. आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ नये, यासाठी ठराविक काळानंतर उशी बदलणं आवश्यक आहे...
                 

लग्न न करताही सलमान खान असा जगतोय आनंदी जीवन!

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मुलगी असो वा मुलगा त्यांनी २३ हे वय ओलांडले की घरातील आणि समाजातील सर्वजणच त्यांच्या लग्नाच्या विषयावर रात्रंदिवस चर्चा करु लागतात. अर्थातच सलमान खान सारख्या स्टार असलेल्या अनेक कलाकारांना यातून जावं लागलंच असेल. पण बॉलिवूडमधील कितीतरी अशा कलाकारांनी सलमान खान सारखं लग्न न करुन हेच सिद्ध केलं आहे की लग्न न करताही आनंदी आणि स्वचंछ आयुष्य आपण नक्कीच जगू शकतो. या मधील सर्वात मोठं उदाहरण सलामान खान यासाठी आहे कारण तो नेहमीच आपल्या नियम आणि आवडीनिवडींना प्राधान्य देत जगत आला आहे. त्यामुळे जर तुमचीही लवकर लग्न न करण्याची इच्छा असेल किंवा तुम्हालाही सलमान खान सारखं एकटं राहून आयुष्य खुश बनवायचं असेल तर सलमान खानच्या आनंदी आयुष्याच्या या टिप्स तुमच्या नक्कीच कामी येतील!..
                 

एका साडीमुळे मलायका अरोराला केलं होतं ट्रोल

                 

बाळाला गायीचं दुध देण्याचे 'हे' आहेत फायदे!

आईचे दुध हे कोणत्याही बाळासाठी पोषक असतेच, पण जस जसे बाळ मोठे होते तसतशी त्याला इतर पौष्टिक पदार्थांचीही गरज भासू लागते. अशावेळी गायीचे दुध बाळाला पाजण्याचा सल्ला दिला जातो. कित्येक स्त्रिया बाळाला भरवण्यात अनेक येणाऱ्या बऱ्याच पदार्थांत गायीच्या दुधाचा समावेश करतात. पण मंडळी, या गोष्टीला विरोध म्हणून काही जण असेही म्हणतात की बाळाला आईचे दुधच पाजावे, गायीचे किंवा अन्य कोणत्याही प्राण्याचे दुध देऊ नये. तर मग काय आहे सत्य? खरंच बाळाला गायीचे दुध दिल्याने फायदा होतो की नुकसान? आज आपण याच गोष्टीचा मागोवा घेत जाणून घेणार आहोत खरे सत्य की बाळाने गायीचे दुध प्यायल्याने जर फायदा होत असेल तर काय होतो आणि नुकसान होत असेल तर काय होते?..
                 

रुसलेल्या अनुष्काची विराटने काढली अशी समजूत!

क्रिकेट पिचवर केलेल्या प्रपोजपासून धुमधडाक्यात केलेल्या लग्नापर्यंत अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि विराट कोहली (virat kohli) कायमच चर्चेत राहिले. या जोडप्याने आपल्या अनोख्या प्रेमातून सध्या तरुणाईला वेडं तर केलंच आहे. पण हे जोडपं त्यांच्या लॉकडाऊन मधील अनेक छान छान छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चाहत्यांपर्यंत कायम या ना त्या मार्गाने पोहचवतच असतात. तर हल्लीच विराटने अनुष्काचा एक किस्सा सांगून सर्वांनाच हसून लोटपोट केलं. पण मंडळी, हा किस्सा ऐकताना तुम्हाला जरी हसू आवरलं नाही तरी या किस्स्यातून तुम्हाला तुमच्या जोडीदाराला खुश करण्यासाठी ब-याच टिप्स मिळतील बरं का..! तुम्हालाही माहितच आहे मुली थोड्या चुलबुल्या आणि रोमॅंटिक असण्यावर जोर देणा-या असतात. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की लगेच त्या आपल्या जोडीदारासोबत भांडण तरी करतात किंवा अबोला तरी धरतात. तसंच चिडलेली अनुष्काही एक दिवस विराटसोबत अबोला धरुन बसली होती. पण शेवटी विराने या टिप्स वापरुन तिच्या चेह-यावर पुन्हा हसू आणलंच...
                 

त्वचेचा रंग उजळण्यासाठी वापरा काकडीचे हे ३ फेस मास्क

काकडी आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. शरीरावर आलेली सूज कमी करण्यासह कित्येक प्रकारचे अँटी ऑक्‍सिडेंट्सही यामध्ये आहेत. काकडीमध्ये (Benefits of Cucumber Face Pack In Marathi) 'व्हिटॅमिन सी' आणि फोलिक अ‍ॅसिड यासारखे पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात आहेत. सॅलेड, सँडविच इत्यादींमध्ये काकडीचा उपयोग केला जातो. आरोग्याप्रमाणेच काकडीतील गुणधर्म त्वचेसाठीही लाभदायक आहेत. यातील पोषक घटकांमुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत मिळते. त्वचेवर नॅचरल ग्लो हवा असल्यास काकडीचा फेस पॅक वापरावा. यामुळे मुरुम, तेलकट त्वचा, डाग तसंच कोरड्या त्वचेच्याही समस्या कमी होतात. बाजारातील महागडे आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती फेस पॅकचा ब्युटी केअर रूटीनमध्ये समावेश करावा. यामुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होणार नाहीत. शिवाय कमी खर्चात चेहऱ्याला भरपूर पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल...
                 

जीभेला आलेत फोड? मग करा हे घरगुती रामबाण उपाय!

जीभ हा डोळ्यांप्रमाणेच एक संवेदनशील भाग आहे. कारण चमचमीत, तिखट, गोड, आबंट, कडू, खारट या सर्व चवींचा आस्वाद आणि आनंद आपण जीभेत असलेल्या चवी ओळखण्याच्या गुणधर्मामुळेच घेऊ शकतोय. ती साथ देत नसेल तर चवी सोडा धड पाणी देखील गोड वाटेनासं होतं. कधी कधी या जिभेवर सतत फोड येत असतात किंवा छाले पडतात अशावेळी वेदना तर होतातच पण पाणी पिताना देखील त्याचा दाह सहन करावा लागतो आणि आयुष्यातील स्वादिष्ट भोजन खाण्याची मज्जाच निघून जाते.जीभेला फोड येणे किंवा तोंडात छाले पडणे ही अगदीच सामान्य गोष्ट असून ती कधी ना कधी प्रत्येकालाच सहन करावी लागते. हे छाले किंवा जखम आपोआप ७ ते १० दिवसात बरी होते. पण त्या दरम्यान जेवताना किंवा काहीही खाताना खूप त्रास सहन करावा लागतो. पण मंडळी, खाली दिलेल्या घरगुती रामबाण उपायांनी तुम्ही तोंडातील छाले किंवा फोड अगदी लवकर बरे करु शकता आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट देखील होणार नाही...
                 

चीनमध्ये करोनाचा पुन्हा फैलाव, नवीन लक्षणे अधिक गंभीर

जगभरात करोना व्हायरसनं (CoronaVirus) थैमान घातलं आहे. या प्राणघातक विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या पद्धतीनं या आजाराविरोधात लढा देत आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंगसह स्वच्छतेच्या नियमांचं कोटकोरपणे पालन देखील करत आहेत. यादरम्यान चीनमधून करोना व्हायरससंदर्भात नवीन धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर चिंता अधिक वाढली आहे. चीनमध्ये कोव्हिड १९चा संसर्ग पुन्हा झपाट्यानं वाढत आहे. एवढंच नाही तर करोना व्हायरस बाधित रुग्णांमध्ये आढळलेली नवीन लक्षणे अधिक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांवर विशेष देखरेखी अंतर्गत औषधोपचार केले जात आहेत. खबरदारी म्हणून या रुग्णांना सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आलंय. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
                 

गरोदरपणात इसेन्शियल ऑईल वापरणे सुरक्षित आहे?

इसेन्शियल ऑईलमध्ये खूप ताकद असते आणि त्याचा थेट वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकतात म्हणून आपण नेहमी इसेन्शियल ऑईल हे कॅरियल ऑईल (रोपांमधून प्राप्त झालेले तेल) मध्ये मिसळूनच लावतो. परंतु इसेन्शियल ऑईलचा प्रभाव खूप असल्याने गरोदर स्त्रियांनी त्याचा कितपत वापर करावा याबद्दल मतमतांतरे आहेत. काहींच म्हणणं आहे की त्याचा वापर केल्याने गरोदर स्त्रीवर जास्त फरक पडत नाही, तर काहींच म्हणणं आहे कि गरोदर स्त्रीने याचा अजिबात वापर करू नये. अनेक एमरोमाथेरेपिस्‍ट गर्भवती स्त्रियांना इसेन्शियल ऑईल वापरण्याचा सल्ला देतात, पण काही मर्यादा घालून! म्हणूनच आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत की गरोदर स्त्रियांनी इसेन्शियल ऑईलचा वापर करणे कितपत योग्य आहे आणि जर वापर करायचा असेल तर त्या आधी कोणत्या गोष्टी माहित असायला हव्यात...
                 

सुष्मिता सेननं ४ वर्ष सहन केल्या आजाराच्या वेदना, या रोगाचा महिलांना सर्वाधिक धोका

विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. योगासने, व्यायाम प्रकार तसंच आपल्या मुलींसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिनं आपल्या यु-ट्यूब चॅनलवर ‘नानचाकू वर्कआउट’ करतानाचा व्हिडीओ शेअर केला. नानचाकू एक मार्शल आर्ट शस्त्र आहे, ज्यामध्ये एका साखळीला दोन काठ्या जोडलेल्या असतात. सुष्मितानं या वर्कआउटशी संबंधित एक कहाणी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टद्वारे स्वतःबद्दल कधीही न सांगितलेली माहिती सुष्मितानं समोर आणली. ‘२०१४मध्ये अ‍ॅडिसन डिसीज (Addison’s disease) नावाच्या ऑटोइम्युन आजारानं ग्रासलं होतं. यानंतर माझ्यामध्ये शारीरिक वेदना, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, थकवा, राग वाढत होता. चार वर्ष आजारपणामुळे आलेल्या वाईट क्षणांचा कसा सामना केला आहे, हे मी व्यक्त देखील करू शकत नाही’, असे सुष्मितानं सांगितलं...
                 

कोंडा,केसगळतीच्या त्रासातून हवीय सुटका? वापरा मुलतानी मातीचे ६ हेअर पॅक

त्वचा आणि केसांची देखभाल करण्यासाठी ‘मुलतानी माती’ (Multani Mitti For Hair Care) रामबाण उपाय आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ब्युटी केअर रूटीनमध्ये याचा वापर केला जात आहे. डाग, मुरुम, त्वचेचा रंग आणि पोत चांगला करण्यासाठी तसंच केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. मुलतानी मातीमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक गुणधर्मांचा समावेश आहे. यातील पोषक घटकांमुळे केसांवर सकारात्मक परिणाम होतो. या आयुर्वेदिक उपायामुळे केस तुटणे, केसगळती, कोंडा या समस्या कमी होऊन तुमचे केस घनदाट, काळेशार आणि लांबसडक होण्यास मदत मिळू शकते. केसांचं आरोग्य निरोगी राहावं, यासाठी तुम्ही मुलतानी माती हेअर पॅकचा वापर केल्यास फायदेशीर ठरू शकते. यापासून कित्येक पोषण तत्त्वांचा तुमच्या केसांना पुरवठा होईल. निर्जीव केसांचीही समस्या कमी होऊ शकते...
                 

दही व जि-्यांचे सेवन करुन 'हे' फायदे मिळवा!

दही म्हणजे आपल्या दैनंदीन आहारातील एक प्रमुख पदार्थ, काहींच्या घरात तर रोज जेवणानंतर दही खाल्ले जातेच. गावाला तर प्रत्येक घरात दुधापासून दही बनवतातच. दही जास्त खाण्यामागे कारण देखील तसचं आहे. दही हे अतिशय पौष्टिक असल्याचे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राने सुद्धा मान्य केले आहे, त्यामुळे दही सेवन करण्याने शरीराला लाभच होतो. पण तुम्हाला माहित आहे का फक्त दही खाण्यापेक्षा त्यात जर तुम्ही भाजलेले जिरे टाकले तर त्याची पौष्टिकता किती पटीने वाढते? जर तुम्ही दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून त्याचे सेवन केले तर दोन्ही पदार्थांतील पोषक तत्वे तर तुमच्या शरीराला मिळतातच पण सोबत ते चवीला सुद्धा चांगले लागते. आज आपण जाणून घेऊया याच मिश्रणाचे फायदे, नक्की काय फायदा होतो दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाल्ल्यास? चला जाणून घेऊया...
                 

प्राणघातक करोनाला दूर ठेवायचंय? या ५० गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

                 

तुम्ही बनावट कांजीवरम साडी खरेदी करताय का?

                 

Weight Loss: महिनाभर प्या ‘रोझ हर्बल टी’, बेली फॅट होईल कमी

गुलाबाच्या फुलामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर मिठाई सजवण्यापासून ते गुलकंद तसंच काही पेय पदार्थांमध्येही केला जातो. एवढंच नाही तर गुलाबाच्या पाकळ्या कित्येक ब्युटी प्रोडक्ट, सेंद्रीय क्रीम (Organic Cream) पासून विविध प्रकारच्या मलममध्येही वापरल्या जातात. केवळ सौंदर्यच नाही तर गुलाबामुळे आपल्या आरोग्यासही मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा पुरवठा होतो. बहुतांश जण वजन घटवण्यासाठी नियमित स्वरुपात गुलाबाच्या पाकळ्यांच्या चहाचे (Rose Tea Benefits For Health In Marathi) सेवन करतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंटचे घटक आहेत, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची चहा कशी फायदेशीर ठरते, जाणून घेऊया याची माहिती...
                 

लॉकडाऊन ४ मध्ये गंभीरपणे घ्या ‘ही’ खबरदारी!

आशा होती कि लॉकडाऊनचे कडक पालन केल्यावर करोनाचे संकट कमी होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला आयुष्य पूर्वीसारखे हसत खेळत जगता येईल, पण काही केल्या हे संकट कमी होत नाहीये. उलट वाढत चाललं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारला सुद्धा लॉकडाऊनच्या मागे लॉकडाऊन वाढवावं लागत आहे. पहिलं लॉकडाऊन, दुसरं लॉकडाऊन, तिसरं लॉकडाऊन आणि आता ३१ मे पर्यंत चौथं लॉकडाऊन! लॉकडाऊन ठेवूनही हे संकट कमी का होत नाही याचा जर नीट विचार केला तर दिसून येईल की सरकार आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतंय, पण आपण नागरिक म्हणून सरकारला नीट साथ देत नाही आहोत. जगात आज कित्येक देशांनी कडक लॉकडाऊन पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. सध्या आपल्याकडेही लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून मंडळी आपल्या देशासाठी आता आपली जबाबदारी आहे शक्य तितके नियम आणि सुरक्षा बाळगून हे लॉकडाऊन यशस्वी करून दाखवण्याची. आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्याचे पालन केले तर आपण आवर्जून कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो...
                 

उन्हाळ्यात डेनिम स्टायलिंगसाठी हटके टिप्स

                 

स्नायूंमधील वेदना दूर करतील हे घरगुती उपाय!

स्नायूंच्या वेदनांची समस्या लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांमध्येही दिसून येते. काही प्रकरणात तर कोणत्याही गंभीर आजाराशिवाय अचानक ही समस्या डोकं वर काढते. या वेदना इतक्या भयानक असतात कि भले भले या आजाराला घाबरून जातात. मात्र खरंच असं घाबरून जाण्याचं कारण नाही. समस्या तेव्हा उत्पन्न होते जेव्हा या वेदना वाढत जाऊन मोठ्या आजाराचं रूप घेतात. म्हणून या वेदना सुरु झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार सुरु करावेत. तुम्ही या स्थितीत थेट डॉक्टर कडे जाण्याऐवजी काही घरगुती उपचार करूनही या वेदनांपासून आराम मिळवू शकता. हे उपचार इतके सोप्पे आहेत की त्यासाठीची सामग्री आपल्या घरातच व आसपास सहज उपलब्ध होते. यातून आराम देखील हमखास मिळतो आणि डॉक्टरकडे जाण्याचे तुमचे श्रम आणि पैसा दोन्ही वाचतात. असेच काही रामबाण घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्हाला स्नायूंच्या या वेदनांपासून आराम मिळवून देऊ शकतात...
                 

उन्हाळ्यात स्किन डिटॉक्स करण्यासाठी ६ टिप्स

प्रसन्न चेहरा आणि त्यावरील नैसर्गिक चमक कोणालाही आकर्षित करू शकते. पण वाढते प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे त्वचा निस्तेज तसंच निर्जीव होऊ लागते. एवढंच नाही तर तुम्ही वापरत असलेल्या ब्युटी प्रोडक्टमध्येही भरपूर प्रमाणात केमिकल असतात. यामुळे त्वचेचा पोत खराब होतो. शिवाय, त्वचेवरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होऊ लागते. त्वचा निरोगी आणि सुंदर असावी, यासाठी त्याची नियमित देखभाल करणं आवश्यक आहे. यासाठी स्किन डिटॉक्सिफिकेशन हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्वचा डिटॉक्स करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यामुळे त्वचा निरोगी राहतेच शिवाय चेहऱ्यावर एक वेगळीच चमकही येते. स्किन डिटॉक्स करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरामध्येही हा उपाय सहजरित्या करू शकता...
                 

वयाच्या पस्तीशीत आई बनणं आहे का सुरक्षित?

पूर्वी मुलींची खूप कमी वयात लग्न व्हायची आणि त्यामुळे त्या आई देखील लवकर बनायच्या. तेव्हाच्या काळी लवकर संसाराला लागून लवकर आई होणं चांगलं मानलं जायचं. पण आता काळ बदलला तसे विचारही बदलले. आता मुली या स्वत:च्या पायावर उभं राहून, यशस्वी करियर निर्माण करून मग संसाराची, मुलांची जबाबदारी स्वीकारण्यावर भर देतात. त्यांना पंचवीस वा तिशीच्या वयात आई होणं हे खूप लवकर वाटतं. अनेक तरुणींच्या मते ३० नंतर लग्न करून ३५ च्या वयात आई होणे योग्य! पण खरंच हे योग्य आहे का? ३५ च्या वयात आई होणे याबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगतं? तर त्याचं उत्तर आहे या वयातील शरीराची स्थिती पाहता ३५ व्या वर्षात आई होणे काहीशा समस्या निर्माण करू शकते. आज आम्ही तुम्हाला याच समस्यांबद्दल सांगणार आहोत की ३५ च्या वयात आई बनू पाहणाऱ्या स्त्रीला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया...
                 

तणावामुळे तरुणांमध्ये वाढतोय ‘हा’ धोकादायक आजार, लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

World Hypertension Day 2020 : आजचे धकाधकीचे जीवन, करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव यामुळे खूप कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांची लागण होत आहे. हल्ली तरुणांमध्ये जास्त प्रमाणात उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येत आहे. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आजार आहे, कारण बहुतांश लोकांमध्ये याची लक्षणे दिसत नाहीत. वेळीअवेळी खाणे, ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाची (World Hypertension Day 2020) समस्या निर्माण होते. हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे अन्य आजारांना आयते निमंत्रण मिळते. या आजारामुळे हृदय, किडनी, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. या आजारात धमण्यांमध्ये रक्ताचा दाब सामान्य स्थितीच्या तुलनेत अधिक वाढतो. धमण्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहण्यासाठी आपल्या हृदयाची भूमिका महत्त्वाची असते...
                 

रामायणातील 'लक्ष्मण'चा मुलगा दिसतो मॉडेलपेक्षाही कूल

                 

शेवग्याच्या शेंगांत असतात 'ही' जीवनसत्त्वे!

शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण सर्वांनीच कधी न कधी खाल्ली असेल. हि भाजी फार कमी वेळा आहारात बनवली जाते. याची चव विशेष नसली तरी ती ज्या पद्धतीने बनवली जाते ती पद्धत त्याला विशेष चव देते. पण तुम्हाला माहित आहे का या शेवग्याच्या शेंगांचे खूप सारे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. काय म्हणता तुम्हाला माहित नव्हतं? हो हे खरंय. शेवग्याच्या शेंगा हीअशी भाजी आहे जी उन्हाळ्यात जास्त मिळते. हि भाजी शरीरासाठी थंड असून यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात. यात खास जीवनसत्त्व असतात जे आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या वाढीसाठी अति गरजेचे मानले जातात. विशेषकरून उन्हाळ्यात या भाजीचे सेवन करणे गुणकारी ठरते. चला तर आता जाणून घेऊया की शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या जीवनसत्त्व आणि पौष्टिक तत्वांची पूर्तता होते...
                 

झोपण्यापूर्वी करा मधाचे सेवन,मिळतील चमत्कारिक लाभ

आयुर्वेदामध्ये मधाला (Honey Benefits In Marathi) संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणाऱ्या कित्येक पौष्टिक घटक आहेत. योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला चमत्कारिक फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मधाचे सेवन केल्यानं शरीराला मिळणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
                 

वर्क फ्रॉम होमचा ताण? त्वचेच्या होतोय परिणाम

सध्या वर्क फ्रॉम होम करताना दिवसातला बराचसा वेळ स्क्रीनसमोर जातो. अगदी खाताना किंवा जेवण बनवताना कॉल घेणं, मीटिंग करणं अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण कार्यपद्धतीत आणि जीवनपद्धतीत झालेला बदलांचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होत असतो. सद्यस्थितीत त्वचेची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे, हे जाणून घ्या.....
                 

सारा अली खानला 'या' गोष्टीचं आहे भरपूर वेड

                 

रिकाम्या पोटी चहा पिताय? पचन प्रक्रियेवर असे होतात दुष्परिणाम

चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते. जोपर्यंत गरम चहाचे घोट पोटात जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामात यांचं लक्ष लागत नाही. हीच अवस्था प्रत्येक चहा प्रेमीची असते. कारण यांच्यासाठी चहा म्हणजे अमृत. सकाळी उठल्यानंतर बहुतांश जण पाण्याऐवजी थेट चहाच पिणे पसंत करतात. तुमच्याही दिवसाची सुरुवात ‘बेड टी’नं (Side Effects of Tea In Marathi) होते का? तर मग वेळीच सावध होणे गरजेचं आहे. चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं केवळ दुष्परिणामच होतात. अति चहा पिणाऱ्यांना असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण समस्यांचे मूळ नेमकं कुठे आहे, हेच त्यांना शोधून सापडत नाही. तुम्ही देखील पोट आणि पचनाशी संबंधित आजारांमुळे हैराण आहात का? जाणून घ्या यामागील कारण..
                 

सावधान!‘या’ चुकांमुळे होतो बद्धकोष्ठतेचा गंभीर त्रास, करा हे सोपे घरगुती उपाय

निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल होणं देखील गरजेचं आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनांचा सराव नियमित करणंही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल न झाल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जेणेकरून अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ आहारामध्ये हिरव्या भाज्या, दलिया, पोहे, ओट्स, टरबूज, कलिंगड, केळे आणि डाळींचा समावेश करावे. सोबत दिवसभरात किमान एक तासासाठी व्यायाम देखील करावा...
                 

तेलकट त्वचेमुळे आहात हैराण? या सोप्या टिप्समुळे चेहरा राहील ऑइल फ्री

उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावर जास्त दुष्परिणाम होतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा ऋतू अतिशय त्रासदायक असतो. घाम आणि त्वचेवरील अतिरिक्त तेलामुळे काही जणांना त्वचेच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे त्वचेची देखभाल न केल्यास चेहरा काळा पडणे, घामोळ्या येणे, ब्लॅकहेड्स, मुरुम आणि त्यांचे डाग असा त्रास उद्भवू शकतो. हे त्रास टाळण्यासाठी आपण साधे-सोपे उपाय करणं आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. भरपूर पाणी असणाऱ्या फळांचं सेवन करावं. उदाहरणार्थ टोमॅटो, काकडी, द्राक्षे, खरबूज, टरबूज इत्यादी फळे खाल्ली पाहिजेत. तसंच जास्तीत जास्त सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा. तेलकट त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी जाणून घेऊया काही टिप्स..
                 

करिश्मा तन्नाच्या या लुकमुळे सोशल मीडियावर धुरळा

                 

वजन वाढल्यानं उडवली खिल्ली,अभिनेत्रीनं दिलं 'स्टाइल'नं दिलं उत्तर

                 

'हे' पदार्थ राखतात हार्मोन्सचे संतुलन!

हार्मोन्स शरीराला अनेक प्रकारे मदत करतात. ते आपल्या शरीरातील सर्व क्रियांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणून हे हार्मोन्स संतुलित राखणे आणि शरीर सुस्थितीत ठेवणे अतिशय गरजेचे असते. हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी सर्वात गरजेचे असते योग्य पदार्थांचे सेवन करणे, जर तुम्ही कोणतेही खाद्य पदार्थ कसेही कोणत्याही वेळेत खात असाल आणि एकंदरीत तुमचे तुमच्या आहारावर नियंत्रण नसेल तर हार्मोन्सची क्रिया बिघडून शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन योग्य राहते आणि तुम्ही कित्येक गंभीर समस्यांपासून स्वत:च्या शरीराचा बचाव करू शकता. चला तर जाणून घेऊया या खाद्य पदार्थांबद्दल आणि सोबत याची सुद्धा माहिती घेऊया की हार्मोन्सचे हे संतुलन शरीरासाठी किती गरजेचे आहे...
                 

उन्हाळ्यात करा नारळाचे सेवन, होतील हे फायदे

नारळ म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण पदार्थ! नारळाचं खोबरं आपल्याकडे अनेक पदार्थांत वापरलं जातं. नारळ सगळ्याच ऋतूत अगदी सहज उपलब्ध होतो. संपूर्ण भारतापैकी दक्षिण भारतात नारळाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. नारळाची चटणी बनवण्यापासून ते तेल बनवण्यापर्यंत नारळाचे फायदे आहेत. तर असा हा नारळ जसा पदार्थांमध्ये चव वाढवतो तसाच तो आपल्या शरीराला लाभदायक फायदे करून देण्यातही मागे नाही. तुम्हाला माहीत आहे का नारळ खाल्ल्याने, किंवा आहारात खोबरं वापरल्याने काय फायदा होतो? नाही माहित? काळजी करू नका, कारण सामान्यत: नारळाची हि गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर आज जाणून घेऊया नारळ खाण्याचे फायदे आणि नारळाचे सेवन केल्याने आपण कोणकोणत्या शारीरिक समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकतो...
                 

भुवयांच्या पांढऱ्या केसांमुळे आहात हैराण? करा हे सोपे घरगुती उपाय

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरील भुवया (Eyebrow) हा महत्त्वाचा भाग मानलो जातो. आपले आयब्रो सुंदर, जाड आणि आकारात असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं. विरळ आयब्रो कोणालाच पसंत नसतात. यातही कित्येक महिलांचे आयब्रो कमी वयातच पांढरे होण्याची समस्या निर्माण होते. मग आयब्रो काळे करण्यासाठी असंख्य उपाय केले जातात. काही जणी पार्लरमध्ये जातात तर काही तरुणी आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. बहुतांश जण मेक अपचा आधार घेऊन आयब्रो तात्पुरत्या स्वरुपात काळे करण्याचा पर्याय निवडतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करून तुम्ही आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीनं काळे करू शकता. काळजी करू नका कारण हे उपाय तुमच्या खिशाला परवडणारे देखील आहेत. जाणून घेऊया माहिती.....
                 

​तनीषा मुखर्जीचा‘महाराष्ट्रीयन लुक’, चाहत्यांकडून कौतुक

                 

अ‍ॅलर्ट!१२-१३तास एकाच ठिकाणी बसून ऑफिसचं काम करताय? पाठीचं आरोग्य धोक्यात

                 

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे Covid-19नं मृत्यू होण्याचा धोका अधिक- रीसर्च

करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आणि वाढणाऱ्या करोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या यातील परस्पर संबंध तज्ज्ञांनी शोधून काढला आहे. 'व्हिटॅमिन डी' आणि करोना व्हायरसचा परस्पर संबंध आहे का? याची माहिती शोधण्यासाठी तज्ज्ञांनी यावर अभ्यास केला होता. संशोधनादरम्यान 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता आणि श्वसनाशी संबंधित संसर्गामध्ये संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. जाणकारांच्या माहितीनुसार ‘व्हिटॅमिन डी’ पांढर्‍या रक्त पेशींच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. 'जीवनसत्त्व ड' शरीरामध्ये सायटोकिन्स (Cytokines) नावाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्याचं कार्य करतात. करोना व्हायरसबाधित रुग्णांमध्ये याच पेशींची निर्मिती अधिक प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. ली स्मिम (Anglia Ruskin University) यांच्या माहितीनुसार, युरोपियन देशांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमी पातळी आणि कोव्हिड 19 (Covid 19) एकमेकांशी संबंधित असल्याचे आढळून आलंय...
                 

डोकं शांत ठेवण्यासाठी ट्राय करा या टिप्स!

सध्याचं युगच इतकं घौडदौडीचं झालं आहे की माणूस फक्त आणि फक्त पैशाच्या मागे पळतोय. प्रत्येकाला पैसा कमावून फक्त यशस्वी व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे. पण या सगळ्यांच्या मागे धावता धावता आपण एक मोठी गोष्ट गमावतो आहे ती म्हणजे मानसिक सुख आणि शांती आणि त्याबदल्यात आपल्या पदरात पडतो ताण-तणाव! कामाच्या नादात माणूस इतका व्यस्त असतो की त्याला रात्रं दिवस या कशाचंच भान नसतं. कामा व्यतिरिक्त संसारच्या जबाबदाऱ्या, आयुष्यातील चिंता यांमुळेही व्यक्ती ताण तणावाच्या गर्देत अडकला जातो. याचा एकत्रित परिणाम म्हणून आपलं अख्खं आयुष्य खराब होतं. मानसिक सुख नसल्याने आपण सुखी राहू शकत नाही. जे मिळत असतं त्यात समाधान मिळत नसतं. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की हा ताण तणाव कसा दूर करायचा. याला इंग्रजी मध्ये 'स्ट्रेस मॅनेजमेंट' सुद्धा म्हणतात, ज्याद्वारे आपण डोक्यात असणारा ताण कमी करू शकतो. चला तर जाणून घेऊया काय आहेत ताण कमी करण्याचे रामबाण उपाय!..
                 

गुलकंद मिश्रित दुध प्या, होतील हे आजार दूर!

गुलकंद हा असा खाद्यपदार्थ आहे जो आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणा-या या गुलकंदाचे कितीतरी लोक आपल्या आहारात नियमितपणे सेवन करतात. गुलकंद स्वादिष्ट तर असतोच पण त्यासोबतच त्याचा सुगंध आपलं मन अगदी तृप्त आणि आनंदी करतो. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन करणे फारच लाभदायक मानले जाते कारण ते फारच थंड असते आणि त्याच्या थंडपणाचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात जे अनेक रोग दूर करण्यास मदत करतात. याच गुलाबापासून बनणा-या गुलकंदामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘बी’ मोठ्या प्रमाणात आढळून येतात.चला तर मंडळी, या चविष्ट आणि स्वादिष्ट गुलकंदामुळे मन तृप्त होण्यासोबत आरोग्याला कोणकोणते लाभ मिळतात हे जाणून घेऊया!..
                 

Corona Vaccine :'२०२१मध्ये ‘या’ महिन्यांत तयार होऊ शकते लस'

                 

एकेकाळी ऐश्वर्याला घाबरत असे सुष्मिता, कारण

विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं अतिशय लहान वयातच अनोखा विक्रम रचला होता. तिच्या या विश्वविक्रमाची नोंद सुवर्ण अक्षरात करण्यात आली आहे. २१ मे १९९४ साली (Sushmita Sen Miss Universe Year) या सुंदर आणि हुशार सौंदर्यवतीनं मिस युनिव्हर्स (Miss Universe) चा किताब जिंकला होता. या स्पर्धेचं विजेतेपद जिंकणारी सुष्मिता सेन ही पहिली भारतीय महिला ठरली होती. पण सुष्मिता सेन एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) अतिशय घाबरत असे, हे तुम्हाला माहिती आहे का? पण केवळ एका उत्तरामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये तिचा कसा प्रवेश झाला आणि तिला इतिहास रचण्याची संधी कशी मिळाली? जाणून घेऊया सुष्मिता आणि ऐश्वर्याशी संबंधित असलेला हा किस्सा.....
                 

मासिक पाळीमध्ये पॅड बदलण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहीत आहे?

मासिक पाळीचा (Menstrual Cycle) स्त्रियांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. यामुळे स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे महिलांनी या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. धकाधकीचे आयुष्य, करिअर, कामाचा ताण, घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यातही स्त्रियांना शिक्षण किंवा कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागते. अशावेळेस काही जणी स्वच्छता पाळण्यासाठी (Menstrual Hygiene) कंटाळा करतात किंवा स्वच्छता पाळणं काहींना शक्यच नसते. पण स्वच्छता राखली न गेल्यास तुम्ही कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण देत आहात, हे लक्षात घ्या. कोणत्याही गंभीर समस्या उद्भवू नये, यासाठी पॅड योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं बदलणं आवश्यक आहे...
                 

केवळ १५ पुशअप करा,वजन कमी होण्यासह मिळतील भरपूर लाभ

शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच शारीरिक व्यायाम करणं देखील गरजेचं आहे. व्यायामामुळे शरीर फिट राहण्यासोबतच आपलं आजारांपासून संरक्षण होण्यासही मदत मिळते. नियमित एक तास व्यायाम केल्यास शारीरिक क्षमताही वाढते. फिटनेससाठी लोक कित्येक प्रकारचे व्यायाम करतात. काही जण योगासने करतात तर काही जिममध्ये जातात. काही जणांना घरातच सोप्या व्यायामांचा सराव करायला आवडतं. जिममध्ये जाऊन एक्सरसाइझ करणं शक्य नसल्यास तुम्ही घरातच ‘पुश अप्स’ करू शकता. पुश अप्समुळे शरीराला भरपूर लाभ मिळतात. फिटनेस ट्रेनर्स आणि बॉडी बिल्डर्सच्या मते हा व्यायाम नियमितकेल्यास आपलं शरीर फिट राहण्यासाठी बरीच मदत मिळते. पण कोणताही शारीरिक व्यायामाचा सराव करण्यापूर्वी ट्रेनरकडून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जाणून घेऊया पुश अप्समुळे शरीराला होणारे फायदे..
                 

‘हे’ पदार्थ करतील मुलांचे दात व हाडं मजबूत!

लहान मुलांना जेवन भरवणं म्हणजे पालकांसाठी एक मोठा टास्कच असतो. एकतर लहान मुलं जेवण्यास लवकर तयार होत नाहीत त्याचं टेन्शन असतंच वरुन त्यांच्या शरीरातील पोषक तत्वे कुठेच कमी पडू नयेत यासाठी आई-वडिलांना मुलांकडे अतिरिक्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यांच्या शरीराला मिळणारी पोषक तत्वे ही हाडे आणि दातांसाठी जास्त आवश्यक असतात. कॅल्शियम असलेलं अन्न खाल्ल्याने त्यातील अर्धे कॅल्शियम हाडांमध्ये तर अर्धे रक्तप्रवाहापर्यंत पोहचते. शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होऊ शकतात. यामुळे भविष्यात मुलांना सांधिवात आणि दातांचे विकार जडू शकतात. पण मुलांना एक ग्लास दुध प्यायला लावणं हे देखील कितीतरी कठीण काम असतं आणि त्यापुढे हेल्दी जेवण तर दूरच राहिलं. त्यामुळे तुम्ही त्यांना अशी डिश बनवून देऊ शकता जी त्यांना खूप आवडेलही आणि त्यातून त्यांच्या शरीराला पोषक तत्वे देखील मिळतील. तर कॅल्शियमची कमी भरुन काढणा-या या पदार्थांविषयी जाणून घ्या संपूर्ण माहिती!..
                 

चेहऱ्यावर ग्लो दिसत नाहीय? या बजेटमधल्या उपचारामुळे त्वचा होईल सुंदर

सर्वांनाच सुंदर आणि नितळ त्वचा हवी असते, पण देखभाल करण्यासाठी कोणाकडेच वेळ नसतो. ऑफिस, घरातील कामांमुळे ब्युटी केअर रूटीन फॉलो करणं अशक्यच असते. यावर पर्याय म्हणून कित्येक जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतात. पण यामुळे चेहऱ्यावर तात्पुरतीच चमक दिसते. शिवाय दुष्परिणाम होण्याचीही भीती असते. त्यामुळे पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरगुती उपचारांची मदत घेतल्यास तुम्हाला दीर्घ काळ टिकणारे फायदे मिळू शकतात. खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्यांचा त्रास होऊ लागतो. तसंच घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर न केल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांमुळेही त्वचेवर दुष्परिणाम होतात. यामुळे सनबर्न, टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांवर वेळीच उपचार न केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरातील काही मिनिटे स्किन केअर रूटीन फॉलो करण्यासाठी नक्की काढा...
                 

ब्रेकअप होण्याआधी दिसून येतात ही लक्षणे!

नातं सुरु होताना ते कायम सकारात्मक गोष्टींनी भरलेलं असतं. म्हणजेच प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी गुलाबी वाटू लागतं असं का म्हणतात कारण तेव्हा आपल्याला चांगलं आणि वाईट काय हे बघण्याची इच्छाच नसते. आपण पसंत केलेल्या जोडीदारामध्ये आपल्याला सर्वच गोष्टी सकारात्मक दिसत असतात. पण हळू हळू नात्यात जबाबदारीचं ओझं वाढू लागतं आणि एक वळण असं येतं की जिथे हा प्रेमाचा प्रवास संपवावा लागतो. नातं संपेपर्यंत त्याची दोघांनाही इतकी सवय झालेली असते की त्यातून सहजासहजी बाहेर पडणं सोप्पं नसतं. पण तुम्हाला माहित आहे का.. कधीच कोणाचं ब्रेकअप अचानक होत नाही तर ब्रेकअप होण्याआधी तुम्हाला छोटे मोठे संकेत मिळू लागतात. पण ते संकेत ओळखून वेळीच त्यावर ठोस उपाय करुन नातं अबाधित ठेवणं प्रियकर आणि प्रेयसी दोघांचही काम आहे. तर ब्रेकअप होण्याआधी मिळणारे संकेत काय असतात याबाबत जाणून घेणं नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरेल...
                 

करोना व्हायरपासून संरक्षण करणार ‘ही’ चहा

करोना व्हायरसमुळे जगभरात मृतांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोनाचा खात्मा व्हावा, यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत. या प्राणघातक आजारावर अद्याप प्रभावी लस सापडलेली नाही. या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याबाबत सरकारकडून नागरिकांना वारंवार सूचना केल्या जात आहेत. तसंच वेगवेगळ्या संस्थांकडून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासंबंधी केल्या जाणाऱ्या संशोधनातील नवनवीन माहितीही समोर येत आहे. नवीन रीसर्चनुसार, आसामच्या बागांमधील चहामुळे करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी मानवी शरीराला आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती मिळण्यास मदत होते. करोनापासून बचाव करण्यासाठी आसाममधील चहाची हिरवी पाने हे उत्तम औषध असल्याचं म्हटलं जात आहे...
                 

मुलं पडतील पालेभाज्यांच्या प्रेमात, ट्राय करा

लहान मुलांना सगळं खायला आवडतं असं सगळे म्हणतात. त्यांच्या समोर पिझ्झा ठेवा, बर्गर ठेवा, चॉकलेट ठेवा किंवा अजून कोणता चमचमित पदार्थ ठेवा ते हसत हसत अगदी चवीने सगळं चाटून पुसून संपवतात. पण हीच गोष्ट जेव्हा पालेभाज्या खाण्यावर येते तेव्हा मात्र हि पोरं नाकं मुरडतात. हे नखरे फक्त तुमचाच मुलगा करतो असं तुम्हाला वाटत असेल तर अहो तसं नाही, जगातील सगळ्या लहान मुलांना जणू हिरव्या पालेभाज्यांची अॅलर्जी आहे म्हणा ना. त्यांच्या समोर हिरव्या पालेभाजीपासून बनलेली कोणतीही, कितीही चविष्ट भाजी ठेवा, त्यांना कितीही प्रलोभनं द्या पण ते ती भाजी खायला तयार होणार नाहीत. तर मंडळी, आम्ही आज तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलाला हिरव्या पालेभाज्यांची गोडी लावू शकता. हिरव्या पालेभाज्यांतून किती पौष्टिक गोष्टी शरीराला मिळतात हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे तुम्हालाही वाटतं की तुमच्या मुलाचे आरोग्य धष्टपुष्ट आणि निरोगी राहावं तर आवर्जून तुम्ही त्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याची गोडी लावली पाहिजे. चला जाणून घेऊया असे कोणते आहेत पर्याय ज्यामुळे मुलं हिरव्या ..
                 

अर्शद वारसीनं ३० दिवसांत घटवलं ६ किलो वजन,वाचा डाएट प्लान

लॉकडाऊनमुळे घराबाहेर जाऊन जीम, योगासने, व्यायाम करणं शक्य नाही. यामुळे आपल्यापैकी बरेच जण घरातच वेगवेगळे व्यायाम प्रकार करून आणि पौष्टिक आहाराचे सेवन करून फिट राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बॉलिवूड कलाकार देखील वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व काळजी घेत आहेत. त्यांचे व्यायाम, डाएट यासंदर्भातील अपडेट आपल्याला सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळत आहेत. पण सध्या बॉलिवूडमधील ‘सर्किट’ अर्शद वारसीचीच जोरदार चर्चा सुरू आहे. कारण त्यानं एका महिन्यात तब्बल सहा किलो वजन घटवलं आहे. अर्शदनं (Arshad Warsi Weight Loss In Marathi) स्वतःमध्ये जे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत, त्याचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. केवळ ३० दिवसांमध्ये 'सर्किट'नं सहा किलो वजन कसे कमी केले, याची सविस्तर माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे...
                 

अश्वगंधामुळे करोना व्हायरसचा धोका रोखला जाऊ शकतो- रीसर्च

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यापासून आपल्या शरीराला कित्येक आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभ मिळतात. यातील औषधी गुणधर्मामुळे कित्येक शारीरिक समस्या, विकार आणि रोगांपासून आपलं संरक्षण होतं. यामुळे ताणतणाव, चिंता आणि जळजळ, शरीरावर आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. अश्वगंधा (Ashwagandha Benefits In Marathi) ही वनस्पती मोठ्या प्रमाणात भारत आणि उत्तर आफ्रिकेमध्ये आढळते. आयुर्वेदामध्ये ही वनस्पती महत्त्वाची मानली जाते. सध्या जगभरात करोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. आयुर्वेदिक औषधोपचार करून प्राणघातक करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत मिळू शकते, अशी माहिती आतापर्यंत अनेक अभ्यासांद्वारे समोर आली आहे. याचसंदर्भातील एक नवीन माहिती समोर आली आहे. कोव्हिड १९ पासून संरक्षण करण्यासाठी अश्वगंधा वनस्पती प्रभावी औषधोपचार ठरू शकते,असा दावा आयआयटी दिल्लीच्या संशोधनात करण्यात आला आहे...
                 

घामोळ्यांच्या त्रासामुळे आहात हैराण, ५ मिनिटांत करा हे सोपे उपाय

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उन्हाळा ऋतू तापदायक असतो. या ऋतूमध्ये अन्य आजारांसह गंभीर स्वरुपात त्वचा विकारांचाही सामना करावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी घामोळ्यांमुळे जीव अक्षरशः हैराण होतो. संपूर्ण शरीरावर लालसर पुरळ आल्यानं असह्य त्रास होतो. गरम-दमट हवेमुळे शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. काही कारणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे पूर्णतः बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे घामोळ्या, लाल पुरळ शरीरावर येतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये घर्मग्रंथीची वाढ पूर्णतः झालेली नसते. त्यामुळे लहान मुलांना जास्त प्रमाणात घामोळ्यांचा त्रास होतो. घामोळ्यांची समस्या टाळण्यासाठी शारीरिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा विकार गंभीर होण्याची शक्यता असते. सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तुम्ही दूर करू शकता...
                 

नाचणीच्या सेवनाने गरोदरपणात होतील हे फायदे!

नाचणी म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण खाद्यपदार्थांपैकी एक! तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या पदार्थांची नावं आपण शाळेपासून एकसुरात ऐकत आणि वाचत आलो आहोत, तांदूळ, ज्वारी आणि बाजरीचे महत्त्व तर आपल्याला माहित आहेच, पण मंडळी नाचणी देखील कमी नाही बरं का! कोकणात नाचणीची भाकरी खूप प्रसिद्ध आहे, त्याशिवाय महाराष्ट्राच्या विविध भागात सुद्धा नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तुम्ही देखील बऱ्याच जणांकडून ऐकलं असले कि ही नाचणी खूप आरोग्यदायी आहे आणि गरोदर स्त्रीसाठी तर खूपच लाभदायी आहे. पण असं का? असं काय असतं या नाचणीमध्ये ज्याचा गरोदर स्त्रीला फायदा होतो? गरोदर स्त्रीने नाचणी खाल्ल्याने तिच्या बाळाला काय फायदा होतो? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत या विशेष लेखामधून! चला जाणून घेऊया...
                 

मित्रमंडळींचे हे सल्ले चुकूनही कृतीत आणू नका

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात मित्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे ते लोक असतात ज्यांच्यासोबत आपण सर्व सुख आणि दु:खं शेअर करतो. काही अडचण आली तर त्यांना विचारतो, त्यांच्याकडे मदत मागतो. मग भले ती अडचण व समस्या आपल्या प्रेमाबद्दल का असेना. पण मंडळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो कि भले मित्र कितीही चांगले सल्ले देत असतील तरी आपल्या लव्ह लाईफबद्दलचे निर्णय त्यांना विचारून घेऊ नका. बऱ्याचदा मित्रमंडळी चारी बाजूने सारासार विचार न करता तुम्हाला सल्ला देतात आणि जर तुम्ही त्यांचा तो सल्ला ऐकला तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. कदाचित तुम्ही तुमच्या चांगल्या जोडोदारालाही गमवू शकता. असं नाही की मित्र सर्वच गोष्टींत चुकीचे सल्ले देतात, पण काही सल्ले असे असतात जे ते स्वत:च्या कल्पनेनुसार देतात. त्यामुळे आपल्या लव्ह लाईफ बद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय हे तुम्ही स्वत: विचार करून घ्यावेत आणि जर मित्र तुमचं लव्ह लाईफ नीट करण्यापेक्षा ते बिघडवण्यात जास्त रस घेत असले तर अशा मित्रमैत्रिणींपासून दूरच राहावे...
                 

कोलोस्ट्रमचा लहान बाळाला काय फायदा होतो?

आई झाल्यावर प्रत्येक स्त्रीला स्वत:ची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण डिलिव्हरीच्या आधी तिच्या शरीरात जसे अनेक बदल होतात तसेच बदल डिलिव्हरी नंतरही तिच्या शरीरात होत असतात. अशावेळी स्त्रीला माहित असायला हवे कि कोणते बदल तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि कोणते वाईट आहेत! आईचं दुध हे बाळासाठी अमृत मानलं जातं. डिलिव्हरी नंतर आईच्या शरीरात जे अनेक बदल होतात, त्यातील एक बदल होतो स्तनांतील दुधामध्ये. या बदलाचे अनेक प्रकार सुद्धा असतात. ज्यापैकी एक बदल म्हणजे कोलोस्‍ट्रम! या बदलाबद्दल फारच कमी स्त्रियांना माहित असते. कोलोस्‍ट्रम हा बदल स्त्रीच्या शरीरासाठी धोकादायक नसतो. हा बदल बाळाच्या शरीरासाठी खूप लाभदायक मानला जातो. चला तर आज जाणून घेऊया काय आहे हे कोलोस्‍ट्रम आणि यामुळे बाळाला काय लाभ मिळतात!..
                 

बाळ जीभ बाहेर काढून देतं या गोष्टींचे संकेत

लहान बाळाला बोलता येत नसल्याने आपल्या कृतीला किंवा आपण त्याच्याशी जे बोलतोय त्या बोलण्याला ते हात-पाय हलवून, जोरात ओरडून, हसून किंवा मग हळूच जीभ तोंडाबाहेर काढून प्रतिसाद देतं. कधी कधी ते जीभ बाहेर काढून आपल्या आई-वडिलांना काहीतरी सांगण्याचेही प्रयत्न करतात. तुम्ही देखील ब-याचदा लहान बाळाला सतत जीभ बाहेर काढून हसताना पाहिलं असेल. कारण सर्वच मुलं जन्मानंतर ६ महिने तरी जीभ बाहेर काढतातच. तुम्हाला बाळाने जीभ बाहेर काढली तर ती गंमत वाटू शकते आणि त्यामुळे तुम्ही ती गोष्ट दुर्लक्षित करू शकता. पण असं करणं चुकीचं आहे. कारण ब-याचदा बोलता न आल्याने आपल्याला होणारा त्रास असो वा एखाद्या गोष्टीची गरज, जसं की भूक लागली आहे वैगरे सांगण्यासाठीही लहान मुल जीभ बाहेर काढतं. त्यामुळे जर तुमचंही बाळ लहान असेल आणि ते जीभ सतत बाहेर काढत असेल तर खाली दिलेल्या गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. म्हणूनच जाणून घ्या याविषयी सर्व माहिती!..
                 

धोकादायक एड्स आजारावर अद्याप लस उपलब्ध नाही, कारण

जगभरात आज वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे (World AIDS Vaccine Day 2020) साजरा केला जात आहे. एड्स आजारासंदर्भात लोकांमध्ये जगजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी १८ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. एड्स एक गंभीर स्वरुपातील आजार आहे आणि या धोकादायक आजारावरही प्रभावी लस सापडलेली नाही. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization)करोना व्हायरससंदर्भातही इशारा देण्यात आला होता. जगातून करोना विषाणूचा खात्मा कदाचित कधीही होणार नाही, अशा स्वरुपातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून काही दिवसांपूर्वी दिली गेली. खूप वर्षांपूर्वी एड्स रोग एचआयव्ही (HIV) विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात पसरला होता. या आजारावरही अद्याप कोणतीच लस विकसित झालेली नाही. World AIDS Vaccine Day निमित्त जाणून घेऊया यासंदर्भातील सविस्तर माहिती...
                 

कोमट पाण्यातून करा जि-याचे सेवन, होतील लाभ!

सध्या आपण सर्वच घरुन काम करत आहोत. अशावेळी आईने स्वयंपाकघरात केलेल्या पदार्थांचा तृप्त करणारा सुगंध अगदी हॉलपर्यंत दरवळत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हा पदार्थ चवदार बनवण्यात आणि त्याच्या तृप्त करणा-या सुगंधामागे फोडणीचा मोठा हात असतो. तर पदार्थ कोणताही असो त्यात फोडणीच्या स्वरुपात वापरले जाणारे जिरे हे प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. कोणतीही डाळ, भाजी असो वा चमचमीत पदार्थ जसे की ढोकळा आणि समोसा असोत, जि-यांशिवाय कोणताच पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या भारतीय पाककृतींमध्ये जि-यांना अनन्यासाधारण महत्व आहे. स्वयंपाकास रूचकर बनवण्यासोबतच जिरे आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक असतात. याच जि-यांमुळे आपल्या आरोग्यास असणा-या कितीतरी आजारांचा धोका दूर होतो आणि गंभीर आजारांपासून आपले संरक्षण होते. चला तर मग जाणून घेऊया की इवलेशे जिरे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी किती मोलाचे कार्य करतात...
                 

घरगुती डाएट फॉलो करून २ महिन्यांत घटवलं २० किलो वजन

                 

श्वेता तिवारी झाली मुलांची आई आणि वडिलही!

एक असा काळ होता जेव्हा श्वेता तिवारीने टीव्ही मालिकांचा काळ गाजवला होता. खास करून तरुणींच्या गळ्यातील ती ताईत बनली होती. सगळ्या सासुंना तिच्यासारखी सून हवी होती आणि सगळ्या तरुणी सुद्धा तिचंच अनुकरण करत होत्या. आज तिचे मालिका क्षेत्रावर अधिराज्य नसले तरी आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. आजही तिचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. मात्र इथपर्यंत पोहोचायला श्वेता तिवारीने खूप मेहनत घेतली. तिचा संपूर्ण प्रवास हा खूप साऱ्या चढ-उतरांनी भरलेला होता. तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चुकी म्हणजे तिची लग्न. एकदा नाही तर दोनदा तिने निवडलेला जोडीदार चुकला आणि दोन्ही वेळेस घटस्फोट घेऊन ती विभक्त झाली. राजा चौधरी याच्याशी पहिलं लग्न केल्यावर २०१३ साली तिने अभिनव कोहली याच्याशी लग्न केलं, पण ते लग्न सुद्धा जास्त काळ टिकलं नाही. पहिल्या नवऱ्याकडून तिला पलक नावाची मुलगी आहे तर दुसऱ्या नवऱ्याकडून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. आज ती एकटी दोन्ही मुलांचा सांभाळ यशस्वीपणे करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का नवऱ्याशिवाय असं एकट्याने दोन दोन मुलांना सांभाळणे एका स्त्रीसाठी किती कठीण असू शकतं?..
                 

हा आजार घेतो दरवर्षी कोट्यवधी लोकांचा बळी!

आपल्या पिढीने पाहिलेला सगळ्यात भयानक आजार कोणता तर साहजिकच सगळ्यांचं उत्तर असेल करोना! पण मंडळी हे खरं नाही. करोना जरी भयानक आजार असला तरी तो सगळ्यात भयानक आजार नाही. या आजारापेक्षाही कित्येक जीवघेणे आजार आजवर या जगात धुमाकूळ घालून गेले आहेत आणि काही आजारअजूनही मृत्यूचे थैमान घालत आहे. असाच एक आजार आहे डेंग्यू! या आजाराबद्दल तुम्हालाही माहित असेलच. दरवर्षी भारतात १६ मे हा दिन राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून ओळखला जातो. डेंग्यू आजाराबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळला जातो. हा आजार पावसाळ्यात आपले डोके वर काढतो. हा आजार इतका भयानक आहे की परिस्थिती हाताबाहेर गेली तर करोनासारखे थैमान घालू शकतो, म्हणून दर पावसाळ्यात प्रशासन डेंग्यूच्या मच्छरांना नष्ट करण्यासाठी औषध फवारणी अभियान चालवते आणि नागरिकांना सुद्धा काय काय सुरक्षा उपाययोजना पाळाव्यात त्याची माहिती देते. यामुळे हा आजार नियंत्रणात आहे. असे असूनही दरवर्षी करोडो लोक या आजाराला बळी पडतात हे देखील कटू सत्य आहे. आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जाणून घेऊया...
                 

बाळासोबतच आईनेही घ्यायला हवी स्वत:ची काळजी!

प्रेग्नेंसीनंतर अचानकच बाळाची जबाबदारी पूर्णत: त्याच्या आईवर येऊन पडते. बाळाची काळजी घेण्याच्या घाईगडबडीत ती आपणलंही नुकतंच बाळंतपण झालंय हे विसरुनच जाते आणि दिवसेंदिवस तिचं स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत जातं. त्यामुळे काही दिवसांनी अचानक वजन खूप वाढलेलं जाणवतं आणि त्या स्त्रीला वाटतं बाळाच्या जन्मानंतर आपली फिगर खराब झाली. पण वजन वाढण्याला किंवा प्रेग्नेंसीनंतर शारीरिक बदल होण्यास हे एकमेव कारण जबाबदार नसतं. हे खरं आहे की प्रेग्नेंसीमध्ये महिलांचे वजन वाढते. पण हे वजन कायम असंच वाढलेलं राहणार.. हा महिलांचा गैरसमज असतो. योग्य पद्धतीने आरोग्याची काळजी घेतल्यास वजन नक्कीच कमी होऊन आपण पूर्ववत दिसू शकतो. पण ब-याचदा बाळाच्या जबाबदा-यांमध्ये महिला आपली काळजी घेण्यास विसरतात. दिवसेंदिवस असेच वजन वाढत गेल्याने त्या चिंतीत होऊ लागतात कारण त्यांना वजन वाढण्यामागचं कारणच समजत नसतं. पण आम्ही आज तुम्हाला अशा काही साध्या-सोप्या पण तितक्याच प्रभावी टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही बाळाला सांभाळण्यासोबतच स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देऊ शकता!..
                 

पुरुषांना करोनाचा जास्त धोका,असा करा बचाव

करोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरातील संशोधक या प्राणघातक आजारावर प्रभावी लस शोधण्याचे कार्य करत आहेत. पण अद्याप करोना व्हायरसचा (CoronaVirus Update In Marathi) खात्मा करण्यासाठी लस सापडलेली नाही. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहे. दरम्यान, करोना व्हायरसशी संबंधित एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांना करोनाचा सर्वाधिक धोका आहे. यामुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी होत आहे. पुरुषांच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता करोना व्हायरसविरोधात लढा देण्यास सक्षम नसल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. या मेल हार्मोनच्या कमतरतेमुळेच मोठ्या संख्येत पुरुषांचा मृत्यू होण्यामागील कारण असल्याचं म्हटलं जात आहे...
                 

तुमच्या पाठीचा कणा आहे का मजबूत? मान, खांदे, कमरेवर होतील गंभीर परिणाम

                 

मोठ्या अभिनेत्रींवर ‘फॅशन कॉपी’चा आरोप

                 

मलाईका-अर्जुन लॉकडाऊनमध्ये असं जपतायत नातं!

करोनामुळे लॉकडाऊन सुरु झालं आणि या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त पंचाईत झाली ती प्रेमी युगुलांची! रोज भेटण्याचे, हातात हात घालून फिरण्याचे, मस्त मज्जा करण्याचे दिवस मागे पडले. फक्त सामान्य कपल्सच नाही तर बॉलीवूड कपल्सना सुद्धा याची झळ बसली. बॉलीवूडमध्ये नुकतंच उदयास आलेलं आणि चर्चेचा केंद्रबिंदू बनलेलं कपल म्हणजे मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर होय. मलाईकाने अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन आणि मलाईका अगदी उघडपणे आपलं प्रेम व्यक्त करू लागले व काहीच दिवसांत तरूणाईचं आवडतं कपल देखील बनून गेले. पण जसा लॉकडाऊन सुरु झाला तसं त्यांच भेटणं, फिरणं बंद झालं. अशावेळी जास्त दिवस लांब राहिल्याने नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो, नात तुटू शकतं. पण हि गोष्ट होऊ नये म्हणून आज एकमेकांपासून लांब असून सुद्धा मलाईका आणि अर्जुन या लॉकडाऊन मध्येही देतात एकमेकांना वेळ. यासाठी त्यांनी ज्या टिप्स वापरल्या त्याच टिप्स आज आम्ही तुमच्या समोर उलगडतो आहोत. चला जाणून घेऊया!..
                 

करोनाला प्रतिबंध घालूया या रामबाण उपायांनी!

करोनाचे संकट दिवसागणिक वाढत चालले आहे. अशावेळी आपली एकच जबाबदारी आहे ती म्हणजे स्वत:सोबत देशाला देखील सुरक्षित ठेवणे. गेले २ महिने भारतीयांनी करोनाशी शक्य तितका लढा दिला. पण हा आजार काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आज भारतामध्ये ५० हजार पेक्षा जास्त करोनाग्रस्त असून करोनाचा कहर अजूनच विळखा घालतो आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये एक नागरिक म्हणून सरकारी सूचनांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. भारतात आजवर लॉकडाऊनचे तीन टप्पे आपण सर्वांनी पाळले. या तीन टप्प्यांत आपल्याला अनेक निर्बंध सहन करावे लागले. कोणालाच जास्त सुट मिळाली नाही. मात्र आपण असंच आयुष्य अजून जगू शकत नाही. आपल्याला शक्य तितके आपले जीवन रुळावर आणावे लागेल, या दृष्टीने पुढील पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नागरिकांना बऱ्याच सूट मिळण्याची शक्यता आहे. पण इथे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की याचा गैरफायदा न घेता करोनाला हद्दपार करण्यासाठी सतर्क राहावे. चला तर जाणून घेऊया काय काय अशा गोष्टी आहेत ज्या पाळल्यास आपण करोना पासून दूर राहू शकतो!..
                 

लहान मुलांना दही खाऊ घालणं आहे का योग्य?

लहान बाळाला सुदृढ बनवण्यासाठी त्याला अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ दिले जातात. हे पदार्थ त्या बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याच पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे दही होय! दही हे गाईच्या दुधाशिवाय म्हैस, बकरी आणि उंटाच्या दुधापासूनही बनवले जाते. पण हे दही लहान बाळाला नक्की खायला द्यावे कि नाही याबद्दल अनेक मतभेद आहेत. कोणी म्हणतं कि लहान बाळाला इतक्या लहान वयात दही खायला देणं हे नुकसानकारक ठरू शकतं तर काहींच म्हणणं आहे कि लहान बाळाला दही खायला देणे हे फायदेशीर ठरू शकतं. आज आपण याच मतभेदाचा मागोवा घेऊन जाणून घेऊया कि बाळाला दही खायला दिल्याने खरंच फायदा होतो कि यामुळे बाळाच्या शरीराला मोठं नुकसान होतं. आणि जर या दह्यामुळे बाळाला फायदा होत असले तर हे दही बाळाला खाऊ घालणे कधीपासून सुरु करावे? ज्ञात करून घेऊया याबद्दल सगळी माहिती!..
                 

करिश्मा तन्नाचा बोल्ड अवतार, 'या' फोटोची तुफान चर्चा

                 

वेलचीयुक्त दुधाचे करा सेवन, 'या' गंभीर आजारांचा टळेल धोका

ऋतु बदलानुसार आपल्या आहारामध्येही बदल करणं आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे आयुष्य यामुळे आपले खाण्यापिण्याच्या सवयींकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपल्याला आजारांची लागण होते. आजार होऊ नये, यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यावर भर द्या. बदललेल्या जीवनशैलीमध्ये आजाराविरोधात प्रतिकार करण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका निभावतात. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळांमध्ये जंक फूड खाणे टाळा. जंक फूड, वेळी-अवेळी खाणे यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. काही कारणास्तव जेवण करणं शक्य नसेल तर दूध प्या. पण उपाशी पोटी झोपणे टाळा. वेलची पावडर मिक्स करून दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
                 

बाळाला ओट्स देण्याआधी जाणून घ्या ‘हे’ सत्य!

प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपलं बाळ हे तंदुरुस्त असावं. त्याची शारीरिक क्षमता अतिशय बळकट असावी. आजारांपासून तो दूर राहावा आणि यासाठी आई वडील आपल्या बाळाला शक्य तितका पौष्टिक आणि सकस आहार खायला देतात. जेणेकरून त्यातील पौष्टिक घटक त्याच्या शरीराला आवश्यक तत्व प्रदान करतील. या पौष्टिक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ओट्स! बाळाच्या शारीरिक विकासासाठी ओट्स हा सध्याच्या युगातील एक आघाडीचा पदार्थ मानला जातो. पण ओट्स हे बाळाला खाऊ देण्यापूर्वी त्या संदर्भात काही गोष्टी आई वडिलांना माहित असायला हव्यात. जसे कि ओट्स बाळाला कधीपासून खायला द्यावेत आणि कशा प्रकारे भरवावेत? त्याचे नक्की काय काय फायदे आहेत? तर आज आम्ही देणार आहोत तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे!..
                 

शरीराच्या ‘या’ भागावर केवळ २ थेंब तेल लावा,मिळतील आश्चर्यकारक लाभ

निरोगी आरोग्य हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून असते. आहारामध्ये आपण कित्येक प्रकारच्या खाद्य तेलांचाही समावेश करतो. हे तेल वेगवेगळे खाद्य पदार्थ किंवा अन्नधान्यांपासून तयार केले जाते. या तेलांमध्ये अशा असंख्य पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात लाभ मिळतात. आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. स्वयंपाकाव्यतिरिक्त या तेलाचा तुम्ही शरीराचा मसाज करण्यासाठीही वापर करू शकता. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही या तेलांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराराला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. मसाजप्रमाणेच नाभीमध्येही तेल लावल्यास तुम्हाला आश्चर्यकारक आरोग्यदायी लाभ मिळतील. याद्वारे कमी खर्चामध्ये तुम्ही सोपे घरगुती आणि परिणामकारक उपाय सहजरित्या करू शकता. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे तेल शरीराच्या कोणत्या भागावर लावल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल...