महाराष्ट्रा टाइम्स

सत्तापेच: राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक

3 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगाबाबत आणखी विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज, मंगळवारी दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले...
                 

सियाचीनमध्ये हिमस्खलन; ८ जवान अडकले

11 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
जगातील सर्वाच उंचीवरील युद्धभूमी अशी ओळख असलेल्या सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील ८ जवान दबले गेले आहेत. दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ ही हिमस्खलन झाले असून हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंचीवर असल्याचे सांगण्यात आले...
                 

पवारभेटीनंतर राऊत म्हणाले, सरकार सेनेच्याच नेतृत्वाखाली!

11 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

धुक्यामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प

11 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

राऊत पवारांच्या भेटीला; सत्तापेचावर खलबतं

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पवार-राऊत यांच्या भेटीत सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं...
                 

आयटी सेक्टरमधील ४० हजार नोकऱ्या जाणार?

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आर्थिक मंदीमुळे देशातील रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला असून यंदा आयटी सेक्टरमधील ३० ते ४० हजार लोकांना कामावरून काढून टाकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांनी ही शक्यता वर्तवली आहे. आयटी उद्योगात दर पाचवर्षाला अशाप्रकारे हजारो लोकांना नोकरी गमवावी लागते. दर पाच वर्षाने आयटी क्षेत्रात अनेक बदल होत असतात, त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतात, असं पै म्हणाले...
                 

Live: मित्रपक्षांना विश्वासात घेणार- शरद पवार

13 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सत्ताकोंडी: पवार-सोनिया यांच्यात ५० मिनिटं चर्चा

14 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

किशोरी पेडणेकर होणार मुंबईच्या नव्या महापौर

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे...
                 

भाजपनं राष्ट्रवादीकडून शिकावं; मोदींचा सल्ला

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भाजपनंही शिकायला हवं, असं मोदी म्हणाले...
                 

'झुंड' अडचणीत; नागराज, अमिताभ यांना नोटीस

17 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'टिकटॉक'वर बंदी घाला; मुंबई हायकोर्टात याचिका

18 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सत्तास्थापनेचं सेना-भाजपला विचारा: पवार

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज संभ्रम वाढवणारं विधान केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत गेलेले शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकार स्थापनेबाबत प्रश्न विचारला असता, याबाबत शिवसेना आणि भाजपला विचारायला हवं, असं उत्तर दिलं...
                 

मयंकला कधी मिळणार वनडे, टी-२० मध्ये संधी?

20 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
कसोटीतील सलामीवीर मयंक अग्रवाल याने पहिल्या दक्षिण आफ्रिका आणि नंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये द्विशतक ठोकण्याचा विक्रम केल्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात मयंकची चर्चा सुरू झाली. मयंकने इंदूर कसोटीत बांगलादेशविरुद्ध तुफान फटकेबाजी करत २० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २४३ धावा केल्या. या धडाकेबाज फलंदाजीनंतर मयंक आता वनडे आणि टी-२० सारख्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी दावेदार बनला आहे...
                 

...म्हणून उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द

21 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी तो वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उद्धव यांचा पुढील दौरा कधी असेल याबाबत मात्र अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही...
                 

कोल्हापूर: बाइक-टेम्पोचा भीषण अपघात; ३ ठार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता.शिरोळ) येथे टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. गुणपाल रोजे (२७), सुहास कोठावळे (२६) आणि विपूल रमेश पाटील ऊर्फ अजिंक्य अशी मृतांती नावे असून त्यांपैकी एक दानोळी (ता.शिरोळ) येथील, तर दोघेजण मजले (ता. हातकणंगले) येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे दानोळी व मजले गावावर शोककळा पसरली आहे...
                 

खुशखबर! मुंबईत शेकडो घरे उपलब्ध होणार?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा शपथविधी आज

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मंदीवर बिल गेट्स -'पुढचं दशक भारताचंच'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भारतामध्ये पुढच्या दशकात अत्यंत वेगाने आर्थिक प्रगती करण्याची क्षमता असल्याचं मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केलं. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात गरीबीतून बाहेर काढलं जाईल आणि सरकारला आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वाव मिळेल, असं ते म्हणाले. आधार कार्ड प्रणालीचंही बिल गेट्स यांनी कौतुक केलं. भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र आणि औषध क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याचं ते म्हणाले...
                 

अयोध्येचा निकाल: जस्टिस नजीर यांना झेड सुरक्षा

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अयोध्या खटल्यात ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि कुटुंबीयांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. कट्टरपंथी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून जीविताला धोका असल्याच्या संशयावरुन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांना जस्टिस नजीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत...
                 

अयोध्या निकाल अमान्य; मुस्लीम पक्षकार कोर्टात जाणार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयविरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मशीदीच्या बदल्यात देऊ केलेली पर्यायी जमीन स्वीकारायची नाही, असाही निर्णय बोर्डाच्या बैठकीत झाल्याचे जिलानी यांनी म्हटले आहे...
                 

स्मृतिदिन Live: देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन... राज्यभरातील शिवसैनिक आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहत आहेत. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येतील. राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्ता समीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनतापक्षाव्यतिरिक्त शिवसेनेचे नवे मित्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेबांच्या सृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहण्याची शक्यता आहे...
                 

कुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; राऊत यांचा टोला

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी माजी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'सगळी उत्तरे मिळतील, आम्हाला कुणी शहाणपणा शिकवू नये. आम्ही शिवसैनिक आहोत. स्वाभिमान, हिंदुत्व यांवरची सर्व उत्तरं मिळतील, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतान माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया विचारली असता, राऊत यांनी हे उत्तर दिले आहे...
                 

फडणवीसांनी सेनेला करून दिली 'ती' आठवण?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे', असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मतिदिनी आदरांजली वाहिली आहे. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे...
                 

शबरीमला: महिलांना मंदिरात प्रवेश नाहीच

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

भाजपने युतीचा धर्म शिकवू नये: अनिल परब

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Live: राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या पुण्यात बैठक

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

NDA सोडण्याची औपचारिकता बाकी:राऊत

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भाजपप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेनेने फारकत घेतली आहे. केंद्रातल्या एकमेव मंत्रिपदाचाही शिवसेनेकडून राजीनामा देण्यात आला आहे. पण एनडीएतून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे...
                 

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरची आत्महत्या

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'रामालाही राज्य सोडावं लागलं; इतकं मनाला लावून घेऊ नका'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आपलं उद्दिष्ट सरकार आणणं; कुणाला मुख्यमंत्री करणं नाही

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्रिपदाच्या वादावर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खोचक टीका केली आहे. आपलं काम सरकार आणणं आहे, कुणाला मुख्यमंत्री करणं नाही, असा टोला नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लगावला आहे. मात्र गडकरी यांनी हा टोला शिवसेनेला लगावला की भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे...
                 

कसा आहे रितेश-सिद्धार्थचा मरजावां? वाचा रिव्ह्यू

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

थंडीची चाहूल; मुंबईकरांची पहाट अल्हाददायक

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

गुगल बोलायलाही शिकवणार; नवं फिचर आलं

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मयांकचं द्विशतक; भारताकडे ३४३ धावांची भक्कम आघाडी

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

#पुन्हानिवडणूक... कलाकारांना हॅशटॅग भोवला!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी महाराष्ट्रातील सत्तापेच अद्याप सुटलेला नाही. सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली अजूनही सुरू आहेत. या सगळ्या गदारोळात शुक्रवारी सकाळी ट्विटरवर काही मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक? असा ट्रेंड सुरू करण्यात आला. कलाकारांनी सुरू केलेल्या या हॅशटॅगमुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण सोशल मीडियावर निर्माण झालं आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू केलेलं हे हॅशटॅग प्रकरण कलाकारांना महागात पडलं...
                 

आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रेरणादायी व्हिडिओ

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. त्यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेले प्रत्येक ट्विट 'हिट' ठरतं. यावेळीही त्यांनी एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत एक मोलाचा संदेशही दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल! तसंच महिंद्रा यांनी दिलेला संदेश तुम्हाला प्रेरणा देईल यात शंकाच नाही!..
                 

इंदूर टेस्ट: मयांकचा धडाका; आणखी एक द्विशतक

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने बांगलादेशविरुद्ध खेळताना आज कमाल केली आहे. त्याने खणखणीत द्विशतक झळकवलं आहे. जितके कसोटी सामने तो खेळला आहे त्याच्या अर्धी त्याच्या शतकांची संख्या झाली आहे. करिअरच्या आठव्या कसोटी सामन्यात मयांकने ही खणखणीत कामगिरी केली आहे. या शतकानंतर त्याच्या नावे कसोटीतल्या चार शतकांची नोंद झाली आहे. शिवाय त्याने दुसऱ्यांदा द्विशतक ठोकले आहे...
                 

मयांकचं खणखणीत दीडशतक; भारत ३०० पार

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

शरद पवार नागपुरात म्हणाले, मी पुन्हा येईन!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'लाख प्रयत्न करा, शिवसेनेला कुणीही रोखू शकणार नाही'

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Live: तीन अंकी नाटकावर भाजपची नजर; शेलारांचा टोला

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
तब्बल २१ दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागली असली तरी युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांमध्ये प्रामुख्यानं 'जोरबैठका' सुरू आहेत. तर, सत्तास्थापनेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेलेला भाजप या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे...
                 

शिवसेनेला NDAत स्थान नाही; राऊत उद्धव ठाकरेंचे 'गोबेल्स'!

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भाजप-शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा फक्त बाकी असताना या दोन्ही पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपाला धार चढली आहे. भाजप नेते राम माधव यांनी आज जोरदार शब्दांत शिवसेनेवर हल्ला चढवला व शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत स्थान मिळेल, ही शक्यता मावळल्यात जमा असल्याचे माधव यांनी सांगितले...
                 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'असे' जुळले सूर!

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'राफेलप्रकरणी चौकशीचा मार्ग मोकळा झाला'

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे दरवाजे उघडले असून आता याप्रकरणी गंभीरपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे...
                 

इंदूर टेस्ट: बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढं सुरुवातीपासूच चाचपडणाऱ्या बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशनं घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी फारसा उपयुक्त ठरला नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाहुण्या संघाला अवघ्या ५८.३ षटकांत गुंडाळले...
                 

'ओल्या दुष्काळा'साठी शेतकऱ्यांचा मुंबईत मोर्चा

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले...
                 

चौकीदार चोर... राहुल गांधींना कोर्टाकडून समज

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
लोकसभा निवडणुकीच्या काळात 'चौकीदार चोर है' हे वाक्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलंच प्रसिद्ध केलं होतं. पण या वक्तव्याविरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा स्वीकारत कोर्टाने त्यांना दिलासा दिला. शिवाय अशा प्रकारची वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही कोर्टाने दिला...
                 

'बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही'

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'भाजप-शिवसेना युतीमध्ये झालेली चर्चा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली होती. भाजपसाठी ती बंद दाराआडची चर्चा असेल. पण आमच्यासाठी ती सामान्य खोली नाही, मंदिर आहे. मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही खोटं बोलणार नाही,' असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला...
                 

जिओचे प्रीपेड प्लान; रोज मिळणार २जीबी डेटा

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सात वर्षांच्या मुलीनं साकारलं बालदिनाचं डुडल

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

उद्धव यांच्या हाती सूत्रे; सेना आमदार समाधानी

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रोज नुसत्या भेटीगाठी घेण्यापेक्षा तसेच रोज नवनवी विधाने करण्यापेक्षा शिवसेना नेत्यांनी आघाडीच्या नेत्यांशी सत्ता स्थापण्याबाबत मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर चर्चा केली असती तर सोमवारी राजभवनमधून नुसते हात हलवत परत येण्याची नामुष्की शिवसेनवर ओढवली नसती अशी नाराजीची प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदारांकडून व्यक्त होत आहे...
                 

महापौर खुल्या प्रवर्गातून; सेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांत स्पर्धा

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मुंबईसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठीची लॉटरी बुधवारी काढण्यात आली असून, यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुला प्रवर्ग असल्याने सत्ताधारी शिवसेनेत या पदासाठी अमाप स्पर्धक असून, यशवंत जाधव, किशोरी पेडणेकर, मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर या ज्येष्ठ नगरसेवकांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत...
                 

पाकिस्तानच्या मंत्र्यांचा 'पानिपत' सिनेमावर आक्षेप

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

कांद्याचे भाव घसरणार? आयात नियमांमध्ये शिथीलता

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आयात केलेल्या कांद्यासंदर्भातली किटकनाशक फवारणीसंदर्भातले नियम शिथील करण्याची मुदत कृषी मंत्रालयाने ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशी बाजारात कांद्याची आवक लवकरात लवकर वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत...
                 

अजित पवारांच्या नाराजीचे वृत्त आले आणि...

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीपूर्वीच काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार प्रचंड वैतागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले. समन्वय समितीची बैठकही रद्द झाल्याचं त्यांनी वैतागून सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत काही तरी वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं असून अजितदादांच्या नाराजीचं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे...
                 

JNU: विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे विद्यापीठ नमले

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील फीवाढी विरोधातील विद्यार्थी आंदोलनाला यश आले आहे. विद्यापीठाने फीवाढ शिथील करण्याचा आदेश देत विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गात परतण्याचे आवाहन केले. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यम यांनी बुधवारी ट्विट करत ही माहिती दिली. कार्यकारी समितीने होस्टेल शुल्कात वाढ आणि अन्य नियमांशी जोडलेल्या शुल्कात कपात केली आहे...
                 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; राऊत पुन्हा सक्रिय

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भाजपविरुद्ध एकहाती किल्ला लढवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आज यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डिस्चार्जआधी माध्यमांशी तितक्याच आक्रमकपणे संवाद साधत महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला...
                 

काँग्रेसशी योग्य दिशेनं चर्चा सुरू: उद्धव ठाकरे

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मध्यावधी होणार नाही, चिंता नको; पवारांचा आमदारांना धीर

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी, युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला. 'राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका,' अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईतील बैठकीत ते बोलत होते...
                 

...तर कर्नाटकातही भाजपची सत्ता जाणार?

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
कर्नाटकातील पोटनिवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत सहा जागा जिंकाव्या लागणार आहेत. अन्यथा पुन्हा एकदा येडियुरप्पा सरकार औटघटकेचंच ठरेल. बंडखोर आमदारांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वाढणार आहेत. बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोकळा झाला. १७ पैकी १५ जागांवर ५ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार असल्याने आता भाजपची धाकधूक पुन्हा वाढली आहे...
                 

फुटण्याची हिंमत कुणीही करणार नाही: पवार

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'सध्याच्या परिस्थितीत कुठलाही आमदार आपला पक्ष सोडून जाणार नाही. कुणी तशी हिंमत केलीच तर सर्व पक्ष त्याच्यासमोर एकच उमेदवार देतील आणि सर्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात कुठलाही 'माई का लाल' पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाही,' असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना दिला आहे...
                 

अखेर बार ‘फुसका’;काँग्रेस-राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदी-शहांच्या दबावामुळे राष्ट्रपती राजवट: दिग्विजय

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सत्ताकोंडीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली असून या घडामोडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा थेट आरोप दिग्विजय यांनी केला...
                 

राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल: फडणवीस

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Live: राष्ट्रपती राजवट; राज्यपालांच्या सुरक्षेत वाढ

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. पाहुयात आज घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स.....
                 

झारखंडात BJPला झटका; लोजप स्वतंत्र लढणार

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) जोरदार झटका बसला आहे. एनडीएमध्ये फूट पडली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्ष (लोजप) स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे...
                 

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस; केंद्राचीही मंजुरी

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते...
                 

सत्तापेच सुटणार?: सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली...
                 

सत्तास्थापनेचा पेच कायम; आजची चर्चा ठरणार निर्णायक

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं आमंत्रण; फक्त २४ तास हातात!

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजप आणि शिवसेनेनंतर तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. या ताज्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. हे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे...
                 

शाओमीचा २०W वायरलेस फास्ट चार्जर लाँच

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

अयोध्येतील जागेवर हॉस्पिटल बांधा: जावेद अख्तर

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सेना एनडीएतून बाहेर?; अरविंद सावंत आज देणार राजीनामा

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, ही काँग्रेसची अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेती केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे...
                 

विशेष लेख: निवडणूक नियम आणि टी. एन. शेषन

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सत्तापेच: मुंबईपासून दिल्लीपर्यंत उद्या जोरबैठका

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
भाजपनं राज्यात सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे उद्या मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या जोरबैठकांना उधाण येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी चर्चा करून सत्तेसाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव करणार असल्याने राज्यात कुणाचा मुख्यमंत्री बसणार? आणि राज्याच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार हे उद्याच कळणार आहे...
                 

Live: संजय राऊत सोनियांच्या भेटीला जाणार?

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही: भाजप

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
तब्बल १८ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर आज अखेर भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जनादेशाचा अनादर करत आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं नाही. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं...
                 

BSNL,MTNL कर्मचारी VRS च्या दिशेने

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या ६० हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनीच याबाबत माहिती दिली. व्हीआरएसचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकट्या बीएसएनएलचे ५७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत...
                 

ENGvsNZ: पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगला, ज्याने वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करुन दिली. पावसामुळे खोळंबा झालेल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. पावसामुळे हा सामना ११ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी ५ बाद १४६ धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडनेही सात बाद १४६ धावाच केल्या, ज्यामुळे धावसंख्या बरोबरीत सुटली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगला...
                 

बाइक स्टंट करताना धूळ उडाली; तरुणाची हत्या

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
बाइक स्टंट करताना धूळ उडाल्याच्या रागातून शेजाऱ्यांनी तरुणाची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची घटना नोएडात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्यात सख्ख्या भावंडांचाही समावेश आहे. तर पाच महिन्यांपूर्वीच्या वादातून ही हत्या झाल्याचं तरुणाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली...