महाराष्ट्रा टाइम्स

महिलांसाठी WiFi, टीव्ही असलेले 'ती' टॉयलेट

                 

मुंबई: मुलाखतीला बोलावून युवतीवर हॉटेलात बलात्कार

नोकरीसाठी मुलाखतीला बोलावून एमबीए झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर जुहू येथील हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित युवतीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
                 

शहांच्या वक्तव्यावर उद्धव यांची तिरकस टीका

'राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. 'महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,' असं उद्धव यांनी म्हटलं आहे...
                 

शिवसेनेला ११८ जागा देण्याची भाजपची तयारी

                 

माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे मुंबईत निधन

                 

कल्याण: ७ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

शाळा सुटल्यानंतर रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या सात वर्षांच्या चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४) , अजय दोहारे (३४) या तीन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे...
                 

साहित्यविषयक प्रयोगांना प्राधान्य: दिब्रिटो

                 

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची हत्या

                 

पुण्यात आघाडीचं ठरलं! कोथरूडची जागा मनसेसाठी?

काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यानचं जागा वाटप अखेर जाहीर झालं आहे. पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी लढणार असून तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज जाहीर केलं. पवार यांनी एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगितल्याने ही जागा मनसे लढणार असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे...
                 

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे. तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून 'बांधणी' करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे...
                 

ठाण्याच्या महापौरांना व्हायचेय आमदार!

                 

पुण्यातील आठही मतदारसंघात मनसेची चाचपणी

                 

वडाळ्यात लवकरच 'बीकेसी-२' साकारणार

                 

मतमोजणी दुसऱ्या दिवशीच का नाही?: भुजबळ

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमधील तफावतीवर आक्षेप घेतला आहे. विधानसभेचं मतदान ईव्हीएम मशीनने होत आहे, मग मतमोजणी तीन दिवसानंतर का? दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? असा सवाल करतानाच ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी सरकारने दोन दिवस घेतले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे...
                 

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ तारखेला निकाल

                 

सतारवादक अरविंद पारिख यांना शासनाचा जीवनगौरव

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली...
                 

नागपूर रेल्वे स्थानकावर ‘डिजिटल लॉकर’

                 

पबजीच्या आहारी गेलेला तरुण बेपत्ता

मोबाइल इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमच्या आहारी गेलेला नेरूळमध्ये राहणारा १६ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. आयुष अशोक चुडजी असे या तरुणाचे नाव असून तो ज्याच्यासोबत पबजी गेम खेळत होता, त्यानेच त्याचे अपहरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे...
                 

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंचा मुंबईत रिक्षाने प्रवास

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चक्क ऑटोमधून प्रवास केला. मुंबईत मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहूतक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाबुल सुपियो यांनी स्वःच्या कारऐवजी ऑटोतून विमानतळावर जाणे पसंत केले. यावेळी मोबाइलमधून एक व्हिडिओ शूट केला. तसेच किशोर कुमारचे गाणेही गायले...
                 

'बेस्ट'च! कामगारांना ९,१०० रुपये बोनस मिळणार

                 

युतीचा फॉर्मुला आधीच ठरलाय; कसलाही तिढा नाही: उद्धव ठाकरे

                 

मुंबई: इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

                 

बुलडाणा: भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ३ ठार

                 

अंबाबाई मंदिर अतिक्रमणाच्या विळख्यात

ताराबाई रोडपासून महाद्वारापर्यंत दुतर्फा बसलेले विक्रेते, महाद्वार कमानीपासून रस्त्यावर मध्यभागीच ठाण मांडून बसलेले आवळे, चिंचा विक्रेते, घाटी दरवाजासमोर तवे विकणाऱ्या महिला, कार्तिक स्वामी मंदिराच्या पिछाडीस भिंतीलगत फूलविक्रेत्यांनी मारलेले शेड, रेलिंगजवळ लागणाऱ्या दुचाकी अशा अतिक्रमणाच्या विळख्यांनी अंबाबाई मंदिराचा परिसर जखडून गेला आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. मात्र, अद्याप महापालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही...
                 

ऐन निवडणुकीत शेतकरी पुकारणार एल्गार

                 

सावरकरांबद्दल लता मंगेशकर यांचे पुन्हा ट्विट

                 

पहिलीच्या मुलावर आरोप; संस्थाचालकावर गुन्हा

                 

आता तरी ‘इंजिन’ चालवा! मनसैनिकांचे आर्जव

लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पक्ष टिकवायचा असेल, तर निवडणूक लढलीच पाहिजे, अशी कळकळ कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या कानी घातली आहे. मात्र, ठाकरे यांची 'मन की बात' अजूनही न समजल्याने आगामी निवडणूक लढायची की नाही, याबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम कायम आहे...
                 

'महाजनादेश'यात्रेत पोलिसच झाले कार्यकर्ते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत राज्यभर कार्यकर्त्यांच्या वेशात पोलिस राबल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी ही योजना केल्याचे सांगण्यात येत आहे. तीन टप्प्यांत होणाऱ्या या यात्रेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित पोलिसांनी प्रत्येकी आठ-आठ दिवसांसाठी विविध जिल्ह्यांत जाऊन कार्यकर्त्यांच्या वेशात बंदोबस्त केला...
                 

मुंबई: उपनगराला मुसळधार पावसाने झोडपले

गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने आज रात्री मुंबई उपनगरात दमदार हजेरी लावली. अचानक विजांच्या कडकडाटांसह सुरू झालेल्या पावसामुळे उपनगरवासियांची एकच तारांबळ उडाली. तर पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने काही प्रमाणात वाहतुकीची कोंडीही झाली होती. ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना पश्चिम द्रुतगती मार्गावर पथदिव्यांच्या खांबावर वीज कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही...
                 

'त्या' बिल्डरांकडून अजूनही वसुली का नाही?

                 

सांगली: विटा-वाळूज एसटी बस उलटून ३८ विद्यार्थी जखमी

                 

नाशिक: महाजनादेश यात्रेवर आंदोलनाचं सावट

विदेशातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं असून, १२५ आंदोलकांना नोटिसा धाडल्या आहेत...
                 

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा

                 

रत्नागिरी पर्यटन जिल्हा घोषित करणार: फडणवीस

                 

'नाणार'मुळे १ लाख रोजगार; सरकार करणार फेरविचार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा सरकार फेरविचार करणार असून या प्रकल्पामुळे १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत...
                 

'एमआरआय'मध्ये मृत्यू, दहा लाखाची भरपाई

                 

अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, आंदोलकांना दिला सल्ला

                 

पवारसाहेब, हा स्वाभिमान काय असतो?; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 'आज तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबू भुईसपाट झाल्यावर स्वाभिमानाचे नाव का घेता? हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो?,' असा खोचक सवाल उद्धव यांनी पवारांना केला आहे...
                 

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा: बाळासाहेब थोरात

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे...
                 

'मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला देशहित शिकवू नये'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यांनी आम्हाला देशहित शिकवू नये, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे...
                 

काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं!; प्रत्येकी १२५ जागा लढणार

आमचं ठरलंय... असं म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेचं जागावाटपाचं गाडं अजूनही चर्चेच्या पातळीवर असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार आहेत. तर, मित्र पक्षांना ३८ जागा सोडणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज यावर शिक्कामोर्तब केलं...
                 

ओला-उबरचा फटका 'बेस्ट'लाही बसला: उद्धव ठाकरे

                 

मतांसाठी पवारांनी पाकधार्जिणं बोलू नये: CM

पाकिस्तान संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. अशा वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला? याचा विचार त्यांनी करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली...
                 

जयकर बंगल्यात अभिजात चित्रपटांचा आनंद !

दुर्मिळ अभिजात चित्रपट पाहायचे आहेत; पण अनेक ओटीटी व्यासपीठे, इंटरनेट, मनोरंजनाच्या वाहिन्या अशा कोणत्याच व्यासपीठावर ते उपलब्ध नाहीत? दुर्मिळ साहित्याच्या आधारे चित्रपटाचा अभ्यास करायचा आहे? या प्रश्नांची उत्तरे 'हो' असतील आणि तुम्ही सुजाण चित्रपट रसिक असाल तर नव्याने नटलेला 'जयकर बंगला' तुमची आतुरतेने वाट बघतोय...
                 

काश्मीरवरील अन्याय दूर केला!: जे. पी. नड्डा

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये कलम ३७० असणे हा केवळ भारतावरच नव्हे तर जम्‍मू काश्‍मीरवरही अन्‍याय होता. कलम ३७० रद्द करून काश्‍मिरी जनतेला मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम करण्‍यात आले असून गेल्या ६९ वर्षांचा अन्याय दूर केला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी केले...
                 

पळपुट्यांचा समाचार जनताच घेईल: शरद पवार

                 

गडचिरोली: दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा

                 

नाशिकमध्ये पावसाचे ‘कमबॅक’

शहरात संततधार पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत २८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने 'कमबॅक'केले असून, रविवारी आणि सोमवारी नाशिकसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे...
                 

रामराजेंचा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला

                 

कोकणासह महाराष्ट्र भगवा होईलः आदित्य ठाकरे

जनआशीर्वाद यात्रा ही तीर्थयात्रा असून, आता कोकण भगवे झालेच आहे. तसाच संपूर्ण महाराष्ट्रही भगवामय करण्यासाठी मला आपले आशीर्वाद द्या. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. आपल्या सर्वांचे दर्शन घ्यायला येथे आलो आहे, असे उद्गार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे काढले. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कुडाळात दाखल झाली. त्यावेळी ते बोलत होते...
                 

पवार इन अॅक्शन; मंगळवारपासून राज्याचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील होणारी गळती थांबविण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंड थोपाटले आहेत. पक्षातील गळती रोखण्याबरोबरच विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पवार येत्या १७ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून करण्यात येणार आहे...
                 

किर्तनकार इंदुरीकर महाराज भाजपमधून विधानसभा लढवणार?

                 

'मातोश्री’ला गंडा घालणारा डिलिव्हरी बॉय अटकेत

                 

‘महाजनादेश’ आज पुण्यात

                 

सायकल चालवा, सवलत मिळवा!

नागरिकांना सायकल चालविण्यास प्रवृत्त करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने आणखी एक पाऊल उचलले आहे. फाउंडेशनतर्फे सभासदांना स्मार्ट कार्ड वितरित करणार आहे. या माध्यमातून सभासदांना मेडिक्लेम सुविधा, तसेच शहरातील नामांकित दुकानांमध्ये खरेदीवर सूट मिळणार असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली...
                 

नागपूर: २ हजारासाठी मित्राकडून मित्राची हत्या

                 

'आमचे हिरो देवानंद, अमिताभ नव्हे; शरद पवारच'

'आमचे हिरो देवानंद, अमिताभ बच्चन कधीच नव्हते तर, शरद पवार होते. आमची पार्टीही राष्ट्रवादी नव्हे, शरद पवारच होते. त्यामुळे मला पवारांविषयी काहीही बोलायचे नाही. त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहील. आता मला पवारांचं मन दुखवायच नाही. त्यांचं मन राखायचं आहे,' असं विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. निंबाळकर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत...
                 

मुंबई मेट्रोसाठी आरेत दोन गट; जोरदार निदर्शने

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील २,७०० झाडे तोडण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थानिकांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे. शुक्रवारीदेखील याविरोधात निदर्शने करण्यात आली. 'सेव्ह आरे, सेव्ह मुंबई'च्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, मुंबईसाठी मेट्रो हवी आणि मेट्रो कारशेडला आरेमधील विरोध असे दोन गट आज पाहायला मिळाले...
                 

शिवसेनेची यादी मुख्यमंत्री तयार करतील!: उद्धव

                 

विखे, क्षीरसागर, महातेकरांना दिलासा; हायकोर्टाने याचिका फेटाळल्या

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या असून राज्य सरकारसह राज्य मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिपदावर वर्णी लागलेले राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही नियुक्त्या राज्यघटनेतील तरतुदींशी विसंगत आणि बेकायदा असल्याचा आरोप करत त्या रद्द करण्याची विनंती रिट याचिकांद्वारे करण्यात आली होती. आज उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या...
                 

नेत्रावतीचं इंजिन बिघडलं, मध्य रेल्वे विस्कळीत

                 

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

                 

उदयनराजेंचं ठरलं; शनिवारी करणार भाजपप्रवेश?

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त असून १४ सप्टेंबर रोजी ते खासदारकीचा राजीनामा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले...
                 

पुण्यात विसर्जनावेळी बुडणाऱ्या चौघांना वाचवलं

पुण्यात दिवसभरापासून मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान अप्रिय घटना घडल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. एका विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत विसर्जनावेळी तलावात बुडणाऱ्या तरुणाला अग्निशमन दल आणि जीवररक्षकांनी वाचवलं. तर तिसऱ्या घटनेत बोट उलटल्याने पाण्यात बुडणाऱ्या तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे...
                 

खासदार उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांंची भेट

                 

आमदारांच्या वाहनचालकाला आता १५ हजार भत्ता

                 

पोलिसांच्या गणरायाचे एक दिवस अगोदर विसर्जन

                 

बाप्पाला निरोप; मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

बारा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर उद्या गुरुवारी मुंबईभरातील चौपाट्या आणि तलावांमध्ये विघ्नहर्त्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन मिरवणुकांवर विरजन येऊ नये म्हणून संपूर्ण मुंबईत ५० हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन सोहळा आणि मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे...
                 

'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा: CM

भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे, महाभरती सुरू आहे, अशा शब्दांत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांनी आमच्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या 'मेगागळती'ची चिंता करावी. थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला...
                 

अहमदनगरमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

                 

नागपूर: सेक्सला नकार दिला म्हणून CRPF जवानाचा पत्नीवर हल्ला

                 

सर्दीचे दुखणे माजी महापौरांच्या जिवावर बेतले!

                 

कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा; काँग्रेसला सलग तिसरा धक्का

काँग्रेसला आज दिवसभरात तिसरा धक्का बसला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. कृपाशंकर हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे...
                 

'म्हाडा'ला दणका; व्याजासह भरपाईचे कोर्टाचे आदेश

                 

पोटच्या मुलीच्या नसा कापून आईनेच केला खून

पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. नोकरीसाठी अमेरिकाला जाण्यावरून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर मुलीसह घरातून निघून गेलेल्या महिलेने काकाच्या घरी जाऊन हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे...
                 

युतीवर शिक्कामोर्तब?

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत सोमवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सकारात्मक सूर उमटले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते...
                 

फडणवीसांचा षटकार; शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतले ३७ निर्णय

मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या सरकारच्या या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेटची बैठक घेतली. जाता जाता फडणवीस सरकारने एक-दोन नव्हे तर ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी त्यांच्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करणे, कुष्ठरोग पीडितांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणे, बचतगटांना कुक्कुटपालनासाठी निधी आदी महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे...
                 

डोंगरीत इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू