महाराष्ट्रा टाइम्स

हाउडी ह्यूस्टन, भारतात सर्व छान चाललं आहे: PM मोदी

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'भारतात सर्व छान चाललं आहे', अशी ख्याली खुशाली सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्यूस्टनमधील 'हाउडी मोदी' या ऐतिहासिक सभेत अमेरिकेतील हजारो भारतीयांशी संवाद साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या सभेला विशेष उपस्थिती होती. मोदी एकटा काहीही करू शकत नाही. मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा व्यक्ती आहे, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले...
                 

इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकत्र लढणार: ट्रम्प

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

अतिरेकी हल्ल्याचा कट; चार खलिस्तानींना अटक

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
पंजाबसह आजुबाजूच्या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पंजाब पोलिसांनी उधळून लावला आहे. पंजाब पोलिसांनी बंदी असलेल्या खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या चार अतिरेक्यांना अटक करून दहशतवादी हल्ल्याचा डाव उधळून लावला आहे. या चारही अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे...
                 

बच्चन, समोसा, भांगडा; अमेरिकेत 'मिनी इंडिया'

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
अमेरिकेत होत असलेल्या हाऊडी मोदी इव्हेन्ट दरम्यान संपूर्ण ह्यूस्टन भारतमय झाल्याचं चित्रं आहे. ह्यूस्टनमधील सोहळ्यात मंचावर समोश्यापासून ते अमिताभ बच्चनपर्यंतच्या चित्र, प्रतिकृतींची झलक पाह्यला मिळाली. या मंचावर पंजाबी भांगडापासून ते गुजराती गरब्यापासून गुरबाणी, गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू आदी संस्कृत श्लोक ऐकायला आणि पाह्यला मिळाले. त्यामुळे आपण भारतातच असल्याचा भास होत होता...
                 

MIM स्वबळावर; आणखी चार उमेदवारांची घोषणा

9 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

कुस्ती: राहुलला कांस्य, भारताला पाचवं पदक

10 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

देवेंद्र फडणवीसच पुन्हा होणार पुढील मुख्यमंत्री: अमित शहा

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मुंबई: भाजप-शिवसेना युतीवर कोणतेही भाष्य न करता, राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करत भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले...
                 

पंतप्रधान अमेरिकेत दाखल; आज 'हाउडी मोदी'चा गजर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

शटर तोडून चोऱ्या करणाऱ्या 'लड्डू' गॅंगला अटक

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

जागतिक कुस्ती स्पर्धाः दीपक पुनिया अंतिम फेरीत

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

नुसतं घरी बसायला आवडत नाहीः शिखर धवन

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

वडाळ्यात लवकरच 'बीकेसी-२' साकारणार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

यूपीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ६ ठार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहाजण ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या बटाला येथेही एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. त्यात २३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता...
                 

मतमोजणी दुसऱ्या दिवशीच का नाही?: भुजबळ

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमधील तफावतीवर आक्षेप घेतला आहे. विधानसभेचं मतदान ईव्हीएम मशीनने होत आहे, मग मतमोजणी तीन दिवसानंतर का? दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? असा सवाल करतानाच ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी सरकारने दोन दिवस घेतले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे...
                 

नगरः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला, तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे...
                 

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
महाराष्ट्र व हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशातील एकूण ६४ मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही घोषणा केली. या सर्व निवडणुका विधानसभेबरोबरच २१ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक यातून वगळण्यात आली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे...
                 

राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ला निकाल

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

अमिताभनंतर सुमीत राघवनचाही मेट्रोला पाठिंबा

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्रातील निवडणुकीची आज घोषणा

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

इम्रान खान आणि ट्रम्प यांची २३ सप्टेंबरला भेट

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

दोन दिवसांत युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंची ग्वाही

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'सन्मानजनक जागा मिळाल्या, तरच भाजपसोबत युतीची बोलणी होतील,' असे एकीकडे सांगताना दुसरीकडे 'युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एकदोन दिवसांत युतीची घोषणा होईल,' अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे युतीबाबतचा संभ्रम शुक्रवारीही कायम राहिला...
                 

रुपया, बाजारांची 'चांदी'; सोन्यात घसरणीची नांदी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंचा मुंबईत रिक्षाने प्रवास

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चक्क ऑटोमधून प्रवास केला. मुंबईत मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहूतक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाबुल सुपियो यांनी स्वःच्या कारऐवजी ऑटोतून विमानतळावर जाणे पसंत केले. यावेळी मोबाइलमधून एक व्हिडिओ शूट केला. तसेच किशोर कुमारचे गाणेही गायले...
                 

पानसरे हत्या; तिघांना न्यायालयीन कोठडी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

भारताला फ्रान्सकडून मिळाले पहिले राफेल विमान

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
भारतीय वायुदलाला फ्रान्सकडून पहिले लढावू विमान राफेल मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. राफेल बनवणारी कंपनी दसॉ एविएशनकडून पहिले राफेल स्वीकारण्यात आल्याची माहिती भारतीय वायुदलातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. राफेलचा मुद्दा देशभर गाजला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राफेलवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती...
                 

राज्यात पूर; CMला झोप कशी लागते?: पवार

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
एकदा काय उन्हाळा आला तर पक्षबदलूंनी पळापळी सुरू केली आहे. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाहीत, असं सांगतानाच बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैल वाकडे चालतात. मग आपण त्यांच्या जागेची अदलाबदल करतो. तरी तो नाठाळ बैल तसाच वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज हे बैल तसेच झाले आहेत. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दलबदलूंवर हल्ला चढवला...
                 

नागपूर जिल्ह्यात डेंग्यूची साथ; शहरात १०० रुग्ण आढळले!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

गुगल पेद्वारे वीज बिल भरायला गेला अन् फसला!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मुंबई, उपनगरांत मुसळधार; रेल्वे वाहतूक सुरळीत

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मुंबई शहर आणि उपनगरांत पहाटेपासूनच पाऊस सुरू असून पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत दक्षिण मुंबईसह माटुंगा, दादर, वरळी आणि लालबागमध्ये पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. तर, पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे...
                 

'एअरटेल डिजिटल'ची LG टीव्ही यूजरना ऑफर

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

सोनं २७० ₹ स्वस्त; सलग तिसऱ्या दिवशी घसरण

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

IS कनेक्शन: अरीब मजीदला जामीन नाहीच

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

ऐन निवडणुकीत शेतकरी पुकारणार एल्गार

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

चांद्रयान-२: नासाला मिळाला महत्त्वपूर्ण फोटो

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
चांद्रयान-२ मधील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या विक्रम लँडरशी संपर्क अद्यापही प्रस्थापित होऊ शकलेला नाही. मात्र, नासाच्या एका प्रयत्नामुळे यासंबंधीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. अमेरिकन अंतराळ एजन्सी (नासा) ने आपल्या चंद्रमा ऑर्बिटरद्वारा चंद्रच्या ज्या भागाचा फोटो काढला तो भाग म्हणजे विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला होता. नासाकडून या फोटोची पडताळणी करण्यात येत आहे...
                 

एअर मार्शल भदौरीया होणार हवाई दल प्रमुख

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रु. बोनस!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दिवाळीपूर्वीच बोनसरुपी फराळ जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. दिवाळी-दसऱ्यापूर्वीच, अगदी न मागता मिळालेल्या या भेटीमागे अर्थात आगामी विधानसभा निवडणूक आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकायला नको म्हणून आधीच हा बोनस जाहीर करण्यात आला आहे...
                 

पहिलीच्या मुलावर आरोप; संस्थाचालकावर गुन्हा

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

...म्हणून शरद पवारांच्या सभास्थळी भगवा झेंडा

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या शनिवारी (२१ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता नगरला मेळावा घेणार असून, नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्समध्ये होणाऱ्या या सभास्थानी भगवा झेंडा लावण्याचा निर्णय जिल्हा राष्ट्रवादीने घेतला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणी आम्ही भगवा ध्वज लावणार आहोत', असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुधवारी सांगितले...
                 

‘मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच’

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
राज्यातील बहुतांश विरोधी पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली असली, तरी कागदी मतपत्रिका आता इतिहास जमा झाल्या आहेत. राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येईल, याचा ठाम पुनरुच्चार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे...
                 

खूशखबर! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

टी-२०: भारताचा द. आफ्रिकेवर 'विराट' विजय

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

पाकिस्तानची मुजोरी; मोदींसाठी एअरस्पेस देण्यास नकार

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास मनाई केल्याची घटना ताजी असतानाच पाकने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एअरस्पेस देण्यास नकार दिला आहे. मोदींना आमच्या हवाई हद्दीतून प्रवास करू देणार नाही. तसं आम्ही भारतीय उच्चायुक्तांना कळवलं आहे, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे भारत आणि पाक दरम्यान आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे...
                 

काश्मीरमधून संचारबंदी हटवल्यावरच चर्चा: पाक

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर जगाचा पाठिंबा मिळविण्यात अपयश आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता वेगळाच राग आळवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत जम्मू-काश्मीरमधून संचारबंदी हटविल्या जात नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा करण्यात येणार नाही, असा कांगावा इम्रान यांनी केला आहे. तसं वृत्तही पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे...
                 

Live अपडेट्स: भारत Vs. द. आफ्रिका टी-२०

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

'वंचितला बी टीम म्हणणारे काँग्रेस भाजपचे गुलाम'

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
वंचित बहुजन आघाडीची मुख्य लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गिनती करत नाही. बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेसवाले हे भाजपचे गुलाम असून त्यांच्या इशाऱ्यावर ते चालतात. ही मंडळी चौकशी आणि केसेस टाळण्यासाठी भाजपात सहभागी होत आहेत, अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केली...
                 

अतिरेकी चंद्रावरचे नाहीत; युरोपनं पाकला सुनावले

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
काश्मीरसंदर्भात अपप्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला युरोपीय महासंघानं खडेबोल सुनावले. युरोपीय महासंघातील अनेक सदस्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना संरक्षण दिलं जात असून, ते शेजारी देशांत हल्ले घडवून आणतात, असं सांगतानाच त्यांनी भारताला पाठिंबाही दिला...
                 

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील ५ उमेदवार जाहीर

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच त्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत...
                 

सौरव गांगुलीचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
सर्वच संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली मालिकाही त्याच तयारीचा भाग असल्याचं मानलं जात आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा विचार आतापासूनच सुरू आहे. त्यादृष्टीनं टीम इंडिया सध्या युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देत आहे. मात्र, माजी कर्णधार सौरव गांगुलीचं मत काहीसं वेगळं आहे...
                 

जसोदाबेन यांना पाहून ममता भेटीसाठी धावल्या!

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडव्या विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू मंगळवारी पाहायला मिळाला. निमित्त होतं मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीचं. या भेटीदरम्यान ममतांनी जसोदाबेन यांची विचारपूस केलीच, शिवाय त्यांना एक साडीही भेट दिली. त्यांच्या या आतिथ्यशील स्वभावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे...
                 

उदयनराजेंच्या विरोधात कोण? राष्ट्रवादीकडून शोध

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे, तसे संकेत ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात कोणता उमेदवार रणांगणात उतरवायचा? याची चाचपणी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सुरू झाली आहे...
                 

निद्रिस्त मार्गांचा वापर करून पाककडून घुसखोरी: लष्कर

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

भारत आणि पाकच्या पंतप्रधानांना भेटणार: ट्रम्प

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटणार असून, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने खूप प्रगती झाली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. ह्युस्टन येथे मोदी यांची अमेरिकी भारतीयांसमोर सभा होणार असून, त्यामध्ये ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत, तर पुढील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरही त्यांची भेट होणार आहे...
                 

उर्मिला मातोंडकर आता 'शिवसैनिक' होणार?

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मुंबई: लोकल पुढचे नऊ महिने उशिरानंच धावणार

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
रखडलेले रेल्वे प्रकल्प, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस एकाच मार्गिकेतून धावत असल्याने लोकल खोळंबणे आणि रेल्वे फाटकांबाबत स्थानिक प्रशासनाचे उदासीन धोरण यांमुळे मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा ठाणे-दिवा पाचवी व सहावी मार्गिका हा महत्त्वाचा प्रकल्प रखडत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत, म्हणजे पुढील किमान नऊ महिने जलद मार्गावरील लोकल सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबानेच धावतील...
                 

३० सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोडीला मनाई

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

साखरपुड्याची अंगठी तरुणीने झोपेतच गिळली

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
अमेरिकेतल्या सँडिएगो येथे एका तरुणीने झोपेत असताना तिच्या साखरपुड्याची अंगठी गिळल्याची घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे आपण स्वप्नातच अंगठी गिळत आहोत असं या तरुणीला वाटलं. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर रुग्णालयात जाऊन एक्स रे काढले, तेव्हा तिने अंगठी गिळल्याचं आढळून आलं. या तरुणीने हा संपूर्ण किस्सा फेसबुकवरून शेअर केला असून तिची ही पोस्ट सर्वत्र शेअर होत आहे...
                 

वाढदिवसानिमित्त मोदींनी घेतला आईचा आशीर्वाद

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

तेल संकटः शेअर बाजार ६४२ अंकांनी कोसळला

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

पाहाः मुंबईत सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मिसेस सीएम म्हणतात, 'मोदी फादर ऑफ कंट्री'

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मुंबई: गोवंडीत विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची हत्या?

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

'मॅच फिक्सिंग कायदा, सट्टेबाजी वैध करावी'

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मोदींचा वाढदिवस: पाक मंत्र्याचे लज्जास्पद ट्विट

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
देश आणि जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना शेजारी देश पाकिस्तानमधील मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी लज्जास्पद ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. फवाद यांना पाकिस्तानातच विरोध होत असून पाक नागरिक या ट्विटबाबत त्यांचा निषेध करत आहेत. फवाद हुसेन यांनी यापूर्वीही असे वादग्रस्त ट्विट केले आहेत...
                 

बर्थडे स्पेशल: आर.अश्विन...फिरकीचा जादुगार

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
जगातील दिग्गज फलंदाजांना फिरकीच्या जोरावर गिरकी घ्यायला लावणारा भारताचा गोलंदाज आर. अश्विन याचा आज वाढदिवस. १७ सप्टेंबर १९८६ रोजी चेन्नईत त्याचा जन्म झाला. नोव्हेंबर २०११मध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कॅरम बॉल टाकणाऱ्या मोजक्याच गोलंदाजांमध्ये अश्विनचं नाव घेतलं जातं. जाणून घेऊयात अश्विनचा जीवन प्रवास आणि क्रिकेट कारकीर्द.....
                 

पवारसाहेब, हा स्वाभिमान काय असतो?: उद्धव

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 'आज तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबू भुईसपाट झाल्यावर स्वाभिमानाचे नाव का घेता? हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो?,' असा खोचक सवाल उद्धव यांनी पवारांना केला आहे...
                 

शिवसेनेचा भाजप नेतृत्वाकडे १३५ जागांचा प्रस्ताव

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असले तरी जागावाटपाबाबत अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. अशातच शिवसेनेने रविवारी रात्री १३५ जागांचा प्रस्ताव भाजपच्या नेतृत्वाकडे पाठविला आहे. तर, नऊ जागा मित्र पक्षांसाठी वेगळ्या देण्याचेही या प्रस्तावात आहे..
                 

ऑनर किलिंग: २० वर्षाच्या दलित तरुणाला जिवंत जाळले

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ही माहिती समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या मृत तरुणाच्या आईचाही मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात हा प्रकार घडला. हा प्रकार ऑनर किलिंगचा असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलीच्या नातेवाइकांसह शेजाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली...
                 

'आरे'बाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' मार्गावरील 'मेट्रो-३' प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्याच्या वादामुळे आंदोलन तीव्र झालेले असतानाच आज, मंगळवारी या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दोन हजार १८५ झाडे तोडण्यास आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यास मंजुरी देण्याच्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे...
                 

ड्रग्ज लपवण्यासाठी तस्करांची नवी ‘सुलभ’ जागा

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मराठी माणसावर हात उचलला; हसमुख शहाला मनसेचा दणका

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

विधानसभा निवडणुकीची घोषणा १९ सप्टेंबरला?

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

सर्वधर्मियांना एकत्र आणणारी 'माऊंट मेरी जत्रा'

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मुंबईतील वांद्रे येथील 'माऊंट मेरी'ची जत्रा गेल्या अनेक वर्षांपासून भरते. जवळपास १०० वर्षांहून अधिक जून असलेल्या माऊंट मेरी बेसलिका चर्चला जत्रेच्या वेळी हजारो भाविक दरवर्षी भेट देतात. माऊंट मेरीच्या जत्रेचा माहोल अनुभवण्यासाठी आबालवृद्धांसह सर्वधर्मिय लोक इथं गर्दी करतात. चला तर मग पाऊया या ऐतिहासिक जत्रेचं महत्त्व......
                 

टी-२० वर्ल्डकपसाठी विराट कोहलीचा 'हा' प्लान

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. संघातील युवा खेळाडूंना चार ते पाच संधीतूनच स्वतःला सिद्ध करावं लागेल, असं त्यानं स्पष्ट केलं. यावेळी त्यानं स्वतःचं उदाहरण दिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी सुद्धा जास्त संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली नव्हती, असं त्यानं सांगितलं...
                 

म्हणून सलमाननं सोडला 'इन्शाअल्लाह' चित्रपट?

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

वेळ पडल्यास स्वत: काश्मीरला जाईन: गोगोई

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'जम्मू-काश्मीरच्या जनतेला न्यायालयात जाता येत नसल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर ते गंभीर आहे,' अशा शब्दांत चिंता व्यक्त करतानाच, याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून अहवाल मागवला आहे. 'वेळ पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीरचा दौरा करेन,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे...
                 

चंद्रकांत पाटलांविरुद्ध निवडणूक लढवणार: शेट्टी

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

ओला-उबरचा फटका 'बेस्ट'लाही बसला: उद्धव

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

काश्मीरबाबत २ आठवड्यात प्रतिज्ञापत्र द्या: SC

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
३७० कलम रद्द झाल्यापासून निर्माण झालेल्या जम्मू-काश्मीरच्या परिस्थिबाबत सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात जम्मू-काश्मीरबाबतच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेबाबतही अहवाल सादर करण्याचे केंद्राला निर्देश देण्यात आले आहेत...