महाराष्ट्रा टाइम्स

भारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाकारला

'पाकिस्तानहून आलेल्या रेल्वेला भारतात येण्यापासून रोखले. तसेच २०० शीख प्रवाशांना भारतात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली', असा गंभीर आरोप पाकिस्तानने केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून रेल्वेच्या प्रवेशासाठीचा प्रस्ताव व्यवस्थित पाठवण्यात आला नाही, त्यामुळे पाकिस्तानहून आलेल्या शीख प्रवाशांच्या रेल्वेला प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाने दिली आहे...
                 

‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’

                 

पुतिन यांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

​​​​र​शिया येथे सप्टेंबरच्या प्रारंभी होणाऱ्या इस्टर्न इकनॉमिक फोरम परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आमं६ण मोदी यांनी स्वीकारले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दरम्यान, जपानमधील ओसाका येथे २८ व २९ जून रोजी होणाऱ्या जी-२० परिषदेदरम्यान भारत, रशिया आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले...
                 

PM मोदींनी टाळली इम्रान यांची भेट

                 

सारी इन अ गाडी; लंडनमध्ये अनोखी कार रॅली

                 

प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगमध्ये ठिणगी

हाँगकाँगमध्ये चीनधार्जिण्या प्रमुख कॅरी लॅम आणि लोकशाहीवादी आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. प्रस्तावित प्रत्यार्पण कायद्याविरोधात रविवारी हाँगकाँगमध्ये विराट मोर्चा निघाला होता. सरकारच्या निर्णयाविरोधात लाखोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्यानंतरही, सरकारही भूमिकेवर ठाम असून, या विधेयकामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही, असे कॅरी लॅम यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे...
                 

शांघाय परिषदेत जिनपिंग-मोदी भेट

शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बिश्केक (किरगिझीस्तान) येथे आयोजित परिषदेमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच जिनपिंग-मोदी यांची भेट होणार आहे...
                 

थेरेसा मे यांचा पक्षनेतेपदाचा राजीनामा

'ब्रेक्झिट'वर संसदेत एकमत करण्यात अपयश आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शुक्रवारी हुजूर पक्षाच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदावर नव्या नेत्याच्या निवडीचा मार्ग खुला झाला असून, पक्षनेतेपदी निवड होणारा नेताच ब्रिटनचा नवा पंतप्रधान होणार आहे आणि तोच यापुढील 'ब्रेक्झिट'ची चर्चा करेल...
                 

स्फोटांनंतर श्रीलंकेत जाणारे पहिले PM मोदी

                 

सुंदर पिचाई यांना ग्लोबल लीडरशिप पुरस्कार

                 

अवकाश स्थान म्हणजे नेमकं काय?

पुढील दशकाच्या अखेरीस भारताचे स्वत:चे अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी केले आहे. अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या 'इस्रो'ने या प्रकल्पाद्वारे पुढचे पाऊल टाकले आहे. त्या निमित्ताने अवकाश स्थानकांचा घेतलेला हा मागोवा...
                 

बिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचाराचे उल्लंघन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बिश्केकमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पुन्हा एकदा शिष्टाचाराला हरताळ फासला. या बैठकीत इतर देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान बैठकीत येत असताना इम्नान खान मात्र न उठता आपल्या जागेवर बसूनच राहिले. शिष्टाचाराचे उल्लंघन करतानाचा इम्नान खान यांचा बैठकीतील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे...
                 

भारतासोबत संबंध दृढ करू: माइक पॉम्पिओ

'मोदी है तो मुमकिन है' या निवडणुकीच्या काळातील घोषणेचा संदर्भ देऊन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी भारत-अमेरिका सामरिक संबंध येत्या काळात आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला. 'इंडो-पॅसिफिक' क्षेत्रात मुक्त दळणवळणासह दोन्ही देशांना संबंध दृढ करण्यामध्ये उत्तम अशी संधी असल्याचे विधान त्यांनी केले...
                 

मोदी-शी भेटीत पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा

किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्यात झालेल्या चर्चेत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा समोर आला. दोन्ही नेत्यांमध्ये संक्षिप्त बातचीत झाली. त्यात भारताने पाकिस्तावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असण्यावर भर दिली. पंतप्रधान मोदींनी शी यांसा सांगितले की 'पाकिस्तानने दहशतवादमुक्त क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करावा, असं भारताला वाटतं. पण असं होताना दिसत नाही.'..
                 

पाकिस्तानच्या बजेटमध्ये संरक्षण खर्चात बदल नाही

                 

अमेरिकेला जायचंय?‘फेसबुक’चे तपशील द्या

तुम्ही अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसाचा अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर सोबत तुमचे सोशल मीडियावरील तपशीलही उघड करावे लागणार आहेत. ट्रम्प प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या निर्देशांनुसार आता अमेरिकी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षांतील सोशल मीडियावरील तपशील देणे अनिवार्य ठरणार आहे. अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या अन्य देशांतील नागरिकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी मार्चमध्ये अशाप्रकारचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे...
                 

भारत-बांगलादेशातपुढील आठवड्यापासून चर्चा

भारत आणि बांगलादेशादरम्यान सीमा सुरक्षा दलस्तरावरील चर्चेला पुढील आठवड्यात ढाका येथे सुरुवात होणार आहे. या चर्चेदरम्यान सीमेवरील गुन्ह्यांसंदर्भात विविध मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत. सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख आर. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यांचे शिष्टमंडळ ११ जून रोजी बांगलादेशाला रवाना होईल. या..
                 

पंतप्रधान मोदींना मालदीवचा सर्वोच्च सन्मान

                 

इम्रान यांचे मोदींना पत्र

                 

दुबईत बसला भीषण अपघात, ८ भारतीयांचा मृत्यू

                 

Ad

एस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी

                 

Ad

चीनला हवीय हाँगकाँगवर पकड

प्रस्तावित प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगमध्ये ९ जून रोजी विराट मोर्चा निघाला होता. हे विधेयक चीनच्या बाजूने असून, त्याचे कायद्यात रुपांतर झाले तर हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर त्याचा परिणाम होण्याची तेथील नागरिकांना भीती आहे. तरीही, स्थानिक सरकार या विधेयकावर ठाम आहे. त्यामुळे, हा वाद चिघळण्याची शक्यता आहे...
                 

Ad

बिश्केक परिषद: मोदींनी दहशतवादावर पाकिस्तानला सुनावले

किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले. दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणाऱ्या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले...
                 

Ad

पाकने दहशतवादाविरोधात ठोस कृती करावी: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून भारतावर परिणाम करणाऱ्या दहशतवादाविरोधात पाकिस्तानने ठोस कृती करणे आवश्यक आहे, असे ठणकावले. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांची गुरुवारी भेट झाली...
                 

भारताचे पन्नास टक्के आयातशुल्क अस्वीकारार्ह: ट्रम्प

​​​भारताकडून अमेरिकेवर आकारल्या जाणाऱ्या आयातशुल्कावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. अमेरिकेच्या 'हार्ले डेव्हिडसन' या मोटारसायकलवर भारताकडून आकारल्या जाणाऱ्या आयाकतशुल्कासंदर्भात ट्रम्प बोलत होते. हा मुद्दा ट्रम्प यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून, भारताने 'हार्ले डेव्हिडसन'वरील आयातशुल्क शून्यावर आणावे, अशी त्यांची मागणी आहे...
                 

बेनामी मालमत्ता जाहीर करा: इम्रान खान

आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला पुन्हा मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'मालमत्ता घोषणा योजना' लागू केली असून, बेनामी मालमत्ता येत्या ३० जूनपर्यंत जाहीर करण्याचे आणि वेळेत कर भरण्याचे आवाहन पाकिस्तानी नागरिकांना केले आहे. ३० जूनपर्यंत मालमत्ता घोषित न केल्या कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेशवजा इशाराही खान यांनी सोमवारी दिला आहे...
                 

दहशतवादावर सामूहिक कारवाई, मोदी-सिरिसेनांचे एकमत

                 

मोदींची क्रिकेट डिप्लोमसी! मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना बॅट भेट

                 

चंद्राच्या मदतीने अॅमेझॉनचा मालक वाचवणार पृथ्वी!

                 

दुबईत बसला भीषण अपघात, १२ भारतीयांचा मृत्यू

                 

४००० महिलांच्या नसबंदीचा दावा, श्रीलंकेत तणाव

श्रीलंकेत एका मुस्लीम डॉक्टरच्या मदतीने ४,००० बौद्ध महिलांची गुप्त नसबंदी केल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे. श्रीलंकेतील 'दिवायना' या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले असून, या वृत्तानुसार, या डॉक्टरने शस्त्रक्रियेद्वारे मुलांना जन्म देणाऱ्या महिलांची गुप्तपणे नसबंदी केली आहे. दिवायना या वृत्तपत्राने २३ मे या दिवशी पहिल्याच पानावर वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानंतर श्रीलंकेत तणावाचे वातावरण पसरले आहे...
                 

गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध येणार?

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर चढाई करताना यंदाच्या हंगामात अकरा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळ सरकार गिर्यारोहकांच्या संख्येवर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे; परंतु या निर्णयामुळे परिस्थिती फारशी बदलणार नसून असे केल्यास तो केवळ उपाययोजना केल्याचा देखावा ठरेल, असे मत गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे...