महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व निवासी डॉक्टर डेंग्यूच्या विळख्यात, संशयित रुग्णांची संख्या हजारांवर

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - विदर्भावर डेंग्यूचे सावट असताना आता वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरही डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहेत. १५ विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांवर सध्या उपचार सुरू आहेत. येथेच २५ पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही डेंग्यूची लागन होण्याचा धोका संभवत आहे. ४० च्यावर डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे...
                 

जाणून घ्या, 'बत्ती गुल मीटर चालू'ची दुसऱ्या दिवशीची कमाई

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
मुंबई - शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चीत 'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यात आला. वाढत्या विजबिलाच्या मुद्द्यावर या चित्रपटाने भाष्य केले. श्रीनारायण सिंग यांच्या दिग्दर्शनामुळे चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट अपयशी ठरला असल्याचे दिसत आहे...
                 

न्याय आणि समान हक्कांच्या मागणीसाठी पाकिस्तानी ख्रिश्चनांचे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयासमोर निदर्शने

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
जिनेवा - युरोप आणि युनायटेड किंगडममध्ये राहणारे पाकिस्तानी ख्रिश्चन नागरीक विल्सन पॅलेससमोर एकत्र आले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालयाबाहेर पाकिस्तानी अल्पसंख्यांकांना न्याय आणि समान हक्कांच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शने केली. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या ३९ व्या सत्रा दरम्यान ही निदर्शने करण्यात आली...
                 

वडिलांच्या सांगण्यावरुन मी लग्न केलं नाही, एकता कपूरचा धक्कादायक खुलासा

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत लग्न केले नाही. या यादीत टीव्ही क्वीन एकता कपूरचा ही सहभाग आहे. एकताच्या चाहत्यांना तिने अजूनपर्यंत लग्न का नाही असा प्रश्न पडतो. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक यशस्वी मालिका आणि चित्रपट करणारी एकता कपूरने अजूनही लग्न का केले नाही याबाबत तिनेच खुलासा केला आहे...
                 

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाची वीरपत्नी लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

बाप्पाला नमन करण्यासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
पुणे - सांस्कृतिक वारसा असणाऱया पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात सुरू झाली आहे. सगळीकडे चैतन्यदायी वातावरण तयार झाले आहे. यासोबतच प्रमुख विसर्जन मार्गावर चौकाचौकात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येत आहेत...
                 

नाशकात गणेश विसर्जनासाठी भाविकांची गोदावरी घाटावर गर्दी

12 hours ago  
बातम्या / ईनाडू/ नाशिक  
                 

खेळरत्नसाठी सोशल मीडियाची मदत, म्हणून बजरंग पुनियाच्या जागी विराट कोहलीची निवड

12 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

पंतप्रधानांनी इंधनदर आणि घोटाळ्यांची काळजी करावी, पटनायक यांचा मोदींना टोला

13 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. मोदी यांनी कौशल्यविकास अभियान आणि उज्ज्वला योजनेतील घोटाळ्यांची काळजी करावी, असा खोचक सल्ला पटनायक यांनी दिला. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यावर गंभीर विचार करण्याची गरज असल्याचेही नमूद केले...
                 

मावळमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी विहिरीत बुडून अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

13 hours ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
                 

गणेश विसर्जनासाठी दादर चौपाटीवर बीएमसीसह पोलीस प्रशासन सज्ज

13 hours ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - आज राज्यभरात गणेश विसर्जन मिवणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनान देखील गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. पालिकेच्या वतीने दादर चौपाटीवर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. त्याचा आढावा घेतला आहे, ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी....
                 

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, ड्रोन कॅमेराचीही राहणार करडी नजर

14 hours ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
                 

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात रुग्णवाहिकेची ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

14 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

LIVE : 'बाप्पा चालले गावाला...', राज्यभरात आज गणपती विसर्जनाचा जल्लोष

15 hours ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - राज्यभरात आज गणपती बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी राज्यभरात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी राज्यभरातील पालिकांनी जय्यत तयारी केली आहे. न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मिरवणुकीत डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे...
                 

बिग बॉस १२'विकेंड वॉर', 'या' जोडीची सर्वांना जोरदार टक्कर!

15 hours ago  
बातम्या / ईनाडू/ इतर मनोरंजन  
                 

ईशान-जान्हवीचे जिममधील 'झिंगाट' वर्कआऊट, पाहा व्हिडिओ

16 hours ago  
बातम्या / ईनाडू/ इतर मनोरंजन  
                 

भक्तांची आर्जव बाप्पांनी ऐकली, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच आगमन

17 hours ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - दहा दिवस भक्तीभावाने पूर्जा अर्चना केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. बाप्पांचे आज विसर्जन करण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त विघ्नहर्त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जव करतात. भक्तांची ही विनंती बाप्पांनी ऐकली असून त्यांचे आगमन पुढच्या वर्षी ११ दिवस अगोदरच होणार आहे...
                 

मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

19 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

आशिया चषक २०१८: आज पुन्हा रंगणार भारत-पाक सामना

20 hours ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
दुबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेत दुसऱ्यांदा भिडणार आहे. भारत हा सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यापासुन धडा घेऊन विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या विचारात असेल. भारताने पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात आठ गडी राखून पराभव केला होता...
                 

नव्या पाकिस्तानच्या तोंडात पुन्हा युद्धाची भाषा

yesterday  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
इस्लामाबाद - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कामर जावेद बाजवा यांनी भारताला उघडपणे धमकी दिल्यानंतर काही दिवस उलटत नाहीत तेच पुन्हा पाकिस्तान लष्कराकडून युद्धाची भाषा केली जात आहे. "पाकिस्तानी सैनिक युद्धाला तयार आहेत", असा भडकाऊ इशारा पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्याने त्यांचा विक्षिप्त चेहरा समोर आला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानकडून, असे विधान करणे गांभिर्याने घ्यावे लागणार आहे...
                 

ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेट स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नरचे जोरदार पुनरागमन

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
मेलबॉर्न - चेंडू कुरतडल्याप्रकरणी १ वर्षांची बंदी आलेल्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. २९ वर्षीय माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एनएसडब्ल्यू प्रिमियर लीग स्पर्धेत संदरलँडविरुद्ध ९२ चेंडूत ८५ धावा करत झोकात पुनरागमन केले आहे. शनिवारी ग्लेन मॅग्राथ ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात स्मिथने आपण अजूनही दादा फलंदाज असल्याचे दाखवून दिले...
                 

शाहिद आणि श्रद्धाच्या चित्रपटाची 'बत्ती गुल' ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

yesterday  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
मुंबई - वाढत्या विजबिलाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा 'बत्ती गुल मीटर चालू' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा कपूर आणि शाहिदसारख्या कलाकारांच्या भूमिका आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा'सारखा चित्रपट साकारणाऱ्या श्रीनारायण सिंग यांच्या दिग्दर्शनामुळे चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट अपयशी ठरला असल्याचे दिसत आहे...
                 

महावितरणच्या बुटीबोरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
                 

पाकिस्तानला फक्त एकच भाषा कळते, परराष्ट्रमंत्र्यांची भेट रद्द करण्याच्या निर्णयाला लष्करप्रमुखांचे समर्थन

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
जयपूर - भारत - पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील प्रस्तावित भेट रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी समर्थन केले आहे. पाकिस्तानला त्यांच्यात भाषेत उत्तर द्यायची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. दहशतवाद व शांततेची चर्चा एकाच वेळी होणे शक्य नसून पाकिस्ताने कुरापती करणे थांबवावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला...
                 

दत्त मंदिरातील दानपेटी फोडणारे दोघे आरोपी गजाआड

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
                 

महामार्गावर वाहनचालकास लुटणाऱ्या टोळीला गुलबर्ग्यात अटक, मुद्देमाल जप्त

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाऱ्या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यास ठाणे गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक कार, रोख रक्कम, पाच मोबाईल आणि जनावरांना गुंगी देणाऱ्या औषधांच्या 3 बाटल्या व इंजेक्शन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी जनावरे चोरुन त्याची कसायाला विक्री करत असल्याचेही उघड झाले आहे...
                 

कल्याण-डोंबिवलीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरवात, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसी नजर

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - कल्याण-डोंबिवलीत रविवारी अनंत चतुर्दशीला १० हजार १५६ घरगुती, तर १५६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध मिरवणुका आणि जल्लोष या वेळी पाहायला मिळणार आहे. आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या, मिरवणुकीत डॉल्बी, डीजेचा वापर करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मात्र, नियम मोडणाऱ्या मंडळासह डीजेवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मात्र, आज सायंकाळीच उल्हासनगरातील एका मंडळाने दुर्गाडी गणेश घाटावर १५ फुटाची गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले...
                 

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
                 

गणेश विसर्जनसाठी ठाणे पालिका प्रशासन सज्ज

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये स्वयंसेवक, महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते...
                 

पानशेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्यास सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा

yesterday  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
पुणे - पानशेत तसेच वरसगाव प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या येत्या ३ महिन्यात सोडवल्या नाही तर, पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अप्पर जिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१९) रोजी तहसील कार्यालय दौंड येथे बैठक घेण्यात आली...
                 

गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज, मिरवणुकीत डीजे लावल्यास होणार कडक कारवाई

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नाशिक  
नाशिक - शहरात रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही गणेश मंडळांनी डीजे लावून मिरवणूक काढल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल शनिवारी पत्रकार परिषदेत दिली...
                 

पर्वरी येथे महसूलमंत्री खंवटे यांच्या हस्ते अग्नीशामक दलाच्या इमारतीची पायाभरणी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

विराटविना भारतीय फलंदाजी दुबळी- सौरभ गांगुली

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
हैदराबाद- भारताचा कर्णधार विराट कोहलीविना भारतीय संघाची फलंदाजी दुबळी असल्याचे मत माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. मधल्या फळी बाबत सौरभने चिंता व्यक्त करत म्हणाला, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू सारख्या फलंदाजांना संधी देण्याऐवजी लोकेश राहुल, ऋषभ पंत सारख्या फलंदाजांना संधी देणे गरजेचे आहे. लोकेश राहुलला संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे...
                 

दारुतस्करीतील 'रईस' गजाआड ; चंद्रपूर पोलिसांची कामगिरी

                 

राजकारण नको रे बाबा ! राजकीय प्रवेशावर द्रविडचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
                 

नागपूरमध्ये गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; पोलिसांना अँटी पोल्युशन मास्कचे वाटप

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
                 

परदेशी अभ्यास दौऱ्यांना जाणार नाही - म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

yesterday  
बातम्या / ईनाडू/ रत्नागिरी  
                 

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ७ गणेश मंडळावर मिरज पोलिसांची कारवाई

yesterday  
बातम्या / ईनाडू/ सांगली  
                 

९७ वर्षांची अखंड परंपरा; एक गाव एक गणपती

yesterday  
बातम्या / ईनाडू/ रायगड  
रायगड - 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना रोहा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाने अखंड ९७ वर्षीही राबवली आहे. हे गणपती मंडळ शतकपुर्तीकडे वाटचाल करत आहे. दरवर्षी या गणपतीचे विसर्जन पांरपारिक पध्दतीने केले जाते. तर, यावर्षी मंडळाने लंकादहनचा देखावा उभारला आहे. या विसर्जन निरोपाला गणरायासमोर शहरातील तरुणाई लेझीमच्या तालावर ठेका धरत असते. एक गाव एक गणपती या लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेचे पालन या मंडळाने अखंड ९७ वर्षे केली आहेत...
                 

सॅमसंगचे गॅलक्सी J श्रेणीमधील २ स्मार्टफोन लॉन्च, आकर्षक फीचर्स मिळणार परवडणाऱ्या दरात

yesterday  
बातम्या / ईनाडू/ गॅजेटविश्‍व  
                 

मुंबई महापालिकेचे श्री गणेश गौरव पुरस्कार जाहीर, स्वप्नाक्षय मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

विसर्जनाच्या धर्तीवर पोलिसांचे संचलन, मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नाशिक  
                 

गणेश विसर्जन : पालिका प्रशासन सज्ज; ३ हजार कर्मचारी, २७८ पथके तैनात

yesterday  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
                 

'वॉक विथ कमिशनर', नागरिकांनी आयुक्तांसमोर वाचला तक्रारींचा पाढा

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नाशिक  
                 

पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला, चालक व क्लिनर गंभीर जखमी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
पुणे - रावेत गावाजवळ बसने हुलकावणी दिल्याने पुलाचा कठडा तोडून एक ट्रक पवना नदीपात्रात कोसळला. आज पहाटे साडेसहा वाजता सुमारास ही घटना घडली. बसने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले...
                 

डॉल्बीबंदीचा निर्णय योग्यच, मराठी बिगबॉस फेम राऊत यांचे मत

yesterday  
बातम्या / ईनाडू/ इतर मनोरंजन  
ठाणे - काही लोक नुसते आरडा ओरड करुन उत्सव साजरे करतात, काही ठिकाणी दारू पिऊन फक्त धिंगाणा केला जातो, यावर लगाम लावायचा असेल तर यावर आणलेली न्यायालयाची बंदी ही योग्यच आहे, असे मत मराठी बिगबॉस फेम शर्मिष्ठा राऊत यांनी व्यक्त केले. ठाण्याच्या किसन नगर भागातील महाराजा अशी ख्याती असलेली गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या...
                 

विराट कोहलीआधी फक्त या २ क्रिकेटपटूंना भेटलाय राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी क्रीडा मंत्रालयाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. २५ सप्टेंबराला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत विराट कोहलीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विराट कोहलीसोबत भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनाही यावेळी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विराटआधी भारताच्या फक्त २ क्रिकेटपटूंना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून ओळखला जातो...
                 

कर्मवीर भाऊराव पाटील : आज वटवृक्ष झालेल्या रयत शिक्षण संस्थेचा पाया भरणारे शिक्षणमहर्षी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ कोल्हापूर  
                 

देश एकाच विचारसरणीवर चालू शकत नाही - राहुल गांधी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

पंजाबला नेऊन तब्बल ८ महिने तरुणीवर अत्याचार, ५० हजारात केला सौदा

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
उधमसिंह नगर - तरुणीला ८ महिने डांबून ठेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्याच गावातील एका तरुणावर अपहरण करुन ८ महिने डांबून ठेऊन सतत अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ८ महिन्यांपूर्वी कोतवाली सितारागंजमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यावर काहीही कारवाई न झाल्यामुळे तरुणीने वरीष्ठ पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची विनवणी केली आहे...
                 

सशस्त्र संघर्षातील नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी वार्षिक अहवाल सादर करा - सुरक्षा परिषद

yesterday  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या आदेशाविरोधात हैदराबादच्या प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
हैदराबाद - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रातील राळेगाव, केळापूर अशा २० गावांमध्ये या नरभक्षक वाघिणीने धूमाकूळ घातला होता. या वाघिणीने १३ नागरिकांचा बळी घेतला आहे. या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भारतात पहिल्यांदाच अशा पद्धतीने वाघिणीसह तिच्या २ बछड्यांना पकडण्यासाठी 'मिशन टी १' ही मोहिम वनविभागाकडून हाती घेण्यात आली आहे. यावर आता हैदराबादमधील प्राणीमित्र संघटनेने विरोध दर्शवला आहे...
                 

एका वर्षानंतर जोरदार पुनरागमन करणाऱ्या जडेजाने केला 'हा' मोठा पराक्रम

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
हैदराबाद - भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने एका वर्षानंतर बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात जोरदार कामगिरी केली आहे. आशिया चषकात शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात ४ विकेट घेत, भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बांग्लादेशविरुद्ध चमकदार कामगिरी करताना एकदिवसीय सामन्यामध्ये तब्बल ४ वर्षानंतर जडेजाने ३ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे...
                 

रायगडात कंटेनरच्या अपघातात ४ जण गंभीर जखमी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ रायगड  
                 

ऐन गणेशोत्सवात नागपूरकरांच्या डोकेदुखीत वाढ, 'रेड बस' सेवा बंद

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - ऐन गणेशोत्सवाच्या काळात नागपूरकरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महानगर पालिकेच्या परिवहन विभागाने जुनी थकबाकी थकवल्याने आज स्टार बस ऑपरेटरने बसेस बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. नागपूर शहरात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. अशा परिस्थितीत बस सेवा बंद पडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत...
                 

पुण्यात मानाच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बैठक संपन्न, अनेक महत्त्वाचे निर्णय

yesterday  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
पुणे - गणेशोत्सवाची धामधूम आता अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध गणेश मंडळांची विसर्जन मिरवणुकीच्या दृष्टीने लगबग सुरू झाली आहे. शहरातल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला मानाच्या ५ गणपतींपासून सुरुवात होत असते. शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मानाच्या ५ गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते...
                 

संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - खा. संजय सिंह

yesterday  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - राफेल विमान व्यवहारात तब्बल ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. म्हणजेच एका विमानाच्या खरेदीमागे तब्बल १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील संजय सिंह यांनी केली आहे. नागपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
                 

शिखर धवनने साधली भारतीय दिग्गजांच्या 'या' विक्रमाशी बरोबरी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
                 

'त्या' खुर्चीवर बसताच शिक्षकांचे डोळे पाणावले

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

जयललितांचा जीवनप्रवास उलगणार 'द आयर्न लेडी'चे पोस्टर रिलीज

yesterday  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
दिवगंत दाक्षिणात्य अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'द आयर्न लेडी' या बायोपिकचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे...
                 

जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्यात १९५५ पासून गणरायाची प्रतिष्ठापना

yesterday  
बातम्या / ईनाडू/ रायगड  
रायगड - गणेशोत्सवकाळात प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन होत असताना या काळात शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावतात. स्वतःच्या घरी गणपती विराजमान झालेला असतानाही पोलिसांना कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे सेवेवर हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला गणपतीची पूजा कार्यालयातही करावयास मिळावी, या हेतूने अलिबाग पोलीस ठाण्यात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते...
                 

आशिया चषक : भारताच्या जावयाने वाचवली पाकिस्तानची लाज

yesterday  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
अबुधाबी - आशिया चषकात सुपर-४ फेरीत शुक्रवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ विकेट राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने कडवी झुंज देत पाकिस्तानसमोर ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हशमतुल्लाह शाहिदी (९७) आणि कर्णधार असघर अफघाण (६७) यांच्या अर्धशतकाच्या बळावर अफगाणिस्तानला पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. २५८ धावांचा पाठलाग करताना पाकला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. पाकचा माजी कर्णधार शोएब मलिकने टिच्चून फलंदाजी करत पाकिस्तानला पराभवापासून वाचवले...
                 

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 'या' क्षेत्रातही आहे अग्रेसर, पाहा व्हिडिओ!

yesterday  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
                 

विसर्जन सोहळा ऑनलाईन नोंदणीला २३ विदेशी पर्यटकांचा प्रतिसाद

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - जगभरात गणेशोत्सवाबाबत एक वेगळे कुतूहल आणि उत्सुकता दिसून येते. गणेश विसर्जन सोहळा विदेशी पर्यटकांना सुनियोजित पाहता यावा, यासाठी गिरगाव चौपाटीवर पालिका व पर्यटन विभागातर्फे विशेष मंडप उभारण्यात आला आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन नोंदणीला २३ विदेशी पर्यटकांनी प्रतिसाद दिला आहे...
                 

अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांची कारवाई, ४ लाखांच्या मुद्देमालासह एक ताब्यात

                 

एकता गणेश मंडळाने साकारली किल्ले रायगडाची प्रतिकृती

yesterday  
बातम्या / ईनाडू/ सांगली  
सांगली - मिरज येथील एकता गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महारांच्या किल्ले रायगडाची भव्य प्रतिकृती साकारली आहे. यावर्षी किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी संकलित करण्याची मोहीम या गणेश मंडळाने हाती घेतली आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवात गणेश मंडळे अनेक कार्यक्रम राबवत असतात. त्याच पार्श्वभूमीवर एकता गणेश मंडळ हा कार्यक्रम राबवत आहे...
                 

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी महिला लेझिम पथक सज्ज

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - दरवर्षीप्रमाणे यंदाही टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे महिला लेझिम पथक लक्षवेधी ठरणार आहे. या पथकाचे हे सलग १० वे वर्ष आहे. दरवर्षी आपल्या वैविध्यपूर्ण नृत्याविष्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळातर्फे आत्तापर्यंत लेझिम, झांज, ढाल-तलवार, झेंडा आणि हलगी सारखी पथके सादर केली आहेत. यंदा २८ महिलांच्या लेझिम पथकासह हे पथक सज्ज आहे...
                 

त्या व्हायरल झालेल्या फोटोमागे भलतेच रहस्य, वाचून तुम्ही व्हाल थक्क

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी स्वच्छता कर्मचारी अनिल यांचा गटारात पडून मृत्यू झाला होता. अनिल यांच्या मृत्यूनंतर एक फोटो व्हायरल झाला होता. अनिल यांच्या मृतदेहावर हात ठेऊन एक लहान मुलगा रडत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या भावनिक फोटोमुळे अनिलच्या पत्नीला अनेकांनी मदत केली. ती मदत जवळपास ६० लाख रुपयापर्यंत जमली आहे. मात्र, या सर्व प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे...
                 

दौंडमध्ये स्वाईन फ्ल्यूने युवकाचा मृत्यू

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
                 

सलूनच्या आड चालणाऱ्या देहव्यवसायावर पोलिसांचा छापा, २ दलालांना अटक

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
                 

रेशन व्यवस्था मोडीत काढण्याचा आरोप करीत अन्न सुरक्षा अभियान कार्यकर्त्यांतर्फे निर्दशने

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ रायगड  
रायगड- राज्य सरकारने रेशनवर धान्य देण्याऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुरवातीला मुंबईत हा प्रयोग केला जाणार असून कालांतराने राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील रेशनव्यवस्था मोडीत काढण्याचा हा डाव आहे असे सांगत आज अन्न सुरक्षा अभियानाच्यावतीने रोहा, माणगाव, तळा, कर्जत आणि खालापूर तालुक्यांत आज निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या निर्णयाची होळी देखील करण्यात आली...
                 

पन्नास हजारांची लाच स्वीकारताना समाजकल्याण अधिकारी अटकेत

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
पुणे - आश्रम शाळेच्या तपासणी अहवालावर अनुकुल शेरा देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या उप-आयुक्तांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. पुंजी सखाराम कवटे (वय ५६) असे अटक करण्यात आलेल्या उप-आयुक्तांचे नाव आहे...
                 

पाँडेचेरी चित्रपट महोत्सवात १०० हून अधिक चित्रपट होणार प्रदर्शित

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
नवी दिल्ली - पाँडेचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल २०१८ (पीआईएफएफ) च्या पहिल्याच महोत्सवात तब्बल १०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात ३ चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर, ११ चित्रपटांचा भारतात प्रीमियर आणि ५ चित्रपटांचे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. 'बर्लिनेल 2017' मध्ये सिल्वर बीयर ग्रँड ज्यूरी पुरस्कार विजेता एलेन गोमिस दिग्दर्शित 'फेलेसाइट' या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात २५ सप्टेंबरला होईल. महोत्सवाची अखेर अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'तीन और आधा' चित्रपटाने होईल...
                 

सहा महिन्याच्या आत रिक्षामध्ये जीपीएस यंत्रणा लावा, उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा लावणे आवश्यक आहे. येत्या सहा महिन्यांच्या आत रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा लावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांनी या बद्दलची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती...
                 

अंबरनाथ नगरपरिषदेच्यावतीने दिव्यांगांना साहित्य वाटप

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या निधीचा पुरेसा विनियोग होत नसल्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. मात्र, अंबरनाथ नगरपरिषदेने दिव्यांगांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देत असून ही बहुतेक राज्यातील पहिली नगरपरिषद आहे. असे गौरवोद्गार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. अंबरनाथ नगरपरिषदेच्या अपंग कल्याण विभागातर्फे सूर्योदय सभागृहात 544 दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते...
                 

करिनाचा आज ३८ वा वाढदिवस, 'तख्त'मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
                 

कुरियर देण्याच्या बहाण्याने धाडसी चोरी; लाखोंचा माल लंपास

                 

न्यूयॉर्कमध्ये होणारी चर्चा भारताकडून रद्द होणे दुर्दैवी - पाकिस्तान

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

आशिया चषक २०१८: लढवय्या अफगाणिस्तानचे पाकिस्तानसमोर २५७ धावांचे लक्ष्य

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
अबुधाबी - आशिया चषकाच्या सुपर-४ च्या सामन्यात आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची लढत चालू आहे. या लढतीत अफगाणिस्तानने कडवी झुंज देत पाकिस्तानसमोर ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हशमतुल्लाह शाहिदी ( ९७ ) आणि कर्णधार असघर अफघाण ( ६७ ) यांच्या अर्धशतकाच्या बळावर अफगाणिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली...
                 

राम रहीम मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम; एकाच मंडपात बाप्पासह मोहरमच्या ताजियाची स्थापना

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
                 

मोदींनी देशाचा विश्वासघात केला..! राफेलवरुन राहुल यांचा हल्लाबोल

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - राफेल करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हस्तक्षेप करत बंद दरवाज्याआड बदलला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या खुलाशानंतर हे आता स्पष्ट झाले आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले आहे. मोदी यांनी ही कृती करुन देशाचा विश्वासघात केला आहे, असा हल्लाबोलही राहुल यांनी यावेळी केला...
                 

गणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

बदलापूरच्या गावदेवी तलावात मृत्त माशांचा खच

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - बदलापूरच्या पूर्वेकडे असलेल्या गावदेवी तलावत मृत माशांचा खच पडला आहे. गावदेवी तलावात दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. त्यामुळे या विसर्जन झालेल्या गणपती मध्ये असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगातील केमिकल पाण्यात मिसळल्यामुळे हे मासे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने वर्तवला आहे...
                 

गुटखा विक्रीचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र, गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करणार - गिरीश बापट

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास गुटखा व पानमसाला विक्री प्रकरणी आयपीसीअंतर्गत एफआयआर दाखल करण्यास प्रतिबंध नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणार असल्याचे श्री. गिरीश बापट यांनी सांगितले...
                 

राफेलचे कंत्राट रिलायन्सला देण्याचा भारत सरकारचाच प्रस्ताव - फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खळबळजक खुलासा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - राफेल खरेदीवरुन काँग्रेस - भाजपमधील आरोप - प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात आता फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्क्वा ओलांदे यांच्या ताज्या वक्तव्याने या वादात भर पडण्याची शक्यता आहे. फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राफेलचे कंत्राट रिलायन्सला देण्यासाठी भारत सरकारनेच शिफारस केली होती असे वक्तव्य केले आहे. राफेल विमानाबाबत डासॉल्ट व रिलायन्समध्ये झालेल्या करारात सरकारचा कुठल्याही प्रक