महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

हत्तींच्या पुनरुत्थान शिबिरातील हत्तीण वाजवते 'माऊथ ऑर्गन'

4 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोईम्बतूर - तमीळनाडू येथील कोईम्बतूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या हत्तींच्या पुनरुत्थान शिबिरातील हत्तीण 'माऊथ ऑर्गन' वाजवत असल्याने चर्चेत आली आहे. ही हत्तीण पाहण्यासाठी आणि माऊथ ऑर्गन वादन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मंदिरांमधील हत्तींच्या पुनरुत्थानासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे...
                 

नागरिकत्व विधेयक दुरुस्ती: काही बांगलादेशींनाच लाभ मिळणे शक्य

4 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

कुंभमेळ्यातून उत्तरप्रदेश करणार १.२ लाख कोटींची कमाई - सीआयआय

4 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

वऱ्हाडी तयार पण घोड्यावर बसणार कोण? शिवराजसिंहांचा महाआघाडीला चिमटा

5 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
भोपाळ/ दिल्ली - मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी कोलकात्यात झालेल्या महाआघाडीच्या सभेवरून शिवराजसिंहांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ही एकजूट म्हणजे 'वऱ्हाडी तयार पण घोड्यावर बसणार कोण ?' असा सवाल शिवराजसिंह यांनी केला आहे...
                 

सरकारी योजनांची वर्णानुक्रमे 'ए' ते 'झेड'पर्यंत यादी बनवा, मोदींचा कार्यकर्त्यांना आदेश

6 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना 'मेरा बूथ, सब से मजबूत' या ब्रीदाचे महत्त्व सांगत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. त्यांनी इंग्रजी 'ए'पासून 'झेड'पर्यंत मोदी सरकारने राबविलेल्या सर्व योजनांच्या नावांची यादी 'अल्फाबेटिकली' तयार करावी, असे सांगितले. ते महाराष्ट्र आणि गोव्यातील कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते...
                 

भाजपविरोधातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना व्हायचेय पंतप्रधान - संबित पात्रा

6 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
हैदराबाद - तृणमूल काँग्रेसतर्फे कोलकाता येथे आयोजित महाआघाडीच्या रॅलीमध्ये भाजपविरोधी पक्षातील नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावर बोलताना, 'ही महाआघाडी वाटाघाटी करणाऱ्यांनी तयार केली आहे. यातील प्रत्येकजण पंतप्रधान होण्याच्या इरेला पेटला आहे,' असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. ते हैदराबाद येथे पत्रकारांशी बोलत होते...
                 

युवा मोर्चाच्या संकल्प रॅलीत युवकांची अनुपस्थिती, भाजप नेते भाषणादरम्यान भडकले

9 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज भाजप युवा मोर्चाच्यावतीने संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी मोठी गर्दी होणार, असा अंदाज भाजपला होता. मात्र, सभेमध्ये बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्याच रिकाम्या असल्यामुळे भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे दिल्ली भाजपचे अध्यक्ष चक्क भाषणाच्या वेळीच संतापल्याचे दिसून आले...
                 

'मायावती 'स्ट्राँग लेडी', त्यांच्यावरील टीका निषेधार्हच'

11 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - बहुजन पक्षाच्या प्रमुख मायावती 'स्ट्राँग लेडी' आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप आमदार साधना सिंह यांनी मायावतींवर केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध केला आहे. मायावती दलित समुदायातील 'स्ट्राँग लेडी' असून त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना उद्देशून करण्यात आलेले अपमानजनक वक्तव्य निषेधार्ह आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे...
                 

मॉर्निंग वॉकच ठरला कर्दनकाळ! मध्यप्रदेशात आणखी एका भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ

14 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
बरवानी - रविवारी सकाळी मध्यप्रदेशात भाजपच्या आणखी एका नेत्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बरवानीचे भाजप नेते मनोज ठाकरे आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा खून केला. वरला पोलीस चौकीच्या हद्दीत एका मैदानावर त्यांचा मृतदेह सापडल्याने मध्यप्रदेशात राजकीय हत्यांचे सत्रच सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे...
                 

मायावतींवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या 'त्या' भाजप महिला आमदारावर महिला आयोगाची कारवाई

15 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

बंगाली लेखक अतीन बंद्योपाध्याय यांचे निधन

16 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

शत्रुघ्न सिन्हांना भाजप म्हणू शकते 'खामोश..!' कारवाईचे संकेत

17 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा गेली चार वर्षे सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले गेले नाही. पण, शनिवारी बंगाल इथे झालेल्या विरोधकांच्या रॅलीनंतर भाजपने पहिल्यांदाच याची नोंद घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले, की त्यांच्यावर कारवाई होऊ शकते...
                 

आगामी बजेट सत्रात राफेलवरून सरकारला घेराव - मल्लिकार्जुन खर्गे

20 hours ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोलकता - आगामी बजेट सत्रात राफेल, शेती संकट, बेरोजगारी, नोटबंदी आणि सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप या मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्रातील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या मुद्द्यांवरून प्रश्न उपस्थित करतील, असे ते म्हणाले...
                 

'राफेलबाबत शंका दूर करा, अन्यथा जनता म्हणेल चौकीदार ही चोर है'

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

पंतप्रधानांनी 'के-९ वज्र' रणगाडा लष्कराला केला समर्पित, ही आहेत वैशिष्ट्ये

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

देशाच्या हिताची रक्षा करण्यासाठीच भाजपविरोधी पक्ष एकत्र - शरद पवार

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोलकाता - भाजपचे लोक म्हणतात ही आघाडी जास्त दिवस टिकणार नाही. मात्र, मी आपल्याला विश्वासाने सांगतो आपण देशाच्या हिताची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता आपण भाजपची सत्ता उलथून लावू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हटले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एकता रॅलीमध्ये ते बोलत होते. दरम्यान, भाजप विरोधी पक्ष एका छत्राखाली आले म्हणून त्यांचे आभारही पवार यांनी मानले...
                 

आरोपपत्र दाखल करून घेण्यास न्यायालयाचा नकार, कन्हैया कुमारप्रकरणी दिल्ली पोलीस तोंडघशी

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - कन्हैया कुमारसह इतर जणांवर १२०० पानी आरोपपत्र दाखल करणाऱ्या दिल्ली पोलिसांची आज न्यायालायाने चांगलीच कानउघडणी केली. कायदा विभागाकडून परवानगी मिळाल्याशिवाय तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे? असा खडा सवाल उपस्थित करत न्यायालायाने यावेळी पोलिसांनाच धारेवर धरले. दिल्ली सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. यानंतर दिल्ली पोलिसांनी परवानगीसाठी न्यायालयाकडे १० दिवसांची मुदत मागितली आहे...
                 

बंगालमध्ये आज भाजप विरोधात महा शक्तीप्रदर्शन, देशातील ताकदवान नेते एकवटले

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आज महासभेचे आयोजन केले आहे. यात देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. या सभेसाठी शरद पवार, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा, एम.के. स्टॅलीन यांचे आगमन झाले आहे. या सभेतून ममता बॅनर्जी आपली राजकीय ताकद आजमविण्याचा प्रयत्न करत आहेत...
                 

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक; २ सेवकांसह एका तरुणीचा समावेश

yesterday  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

गोव्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

अमित शाह यांना स्वाईन फ्ल्यू नाहीच, काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाने कंबर कसली, कडक कारवाईचा इशारा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचे चुकीचे वेळापत्रक व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पसरवणाऱ्याविरोधात आयोगाने कारवाईही केली होती...
                 

कोलकातामध्ये भाजपच्या 'मृत्युनादा'ची तयारी; ममतांच्या 'रॅली'मध्ये विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोलकाता - लोकसभा निवडणुकांना केवळ ३ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. तर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या उद्या होणाऱ्या रॅलीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. भाजपसाठी ही रॅली 'मृत्युनाद' ठरेल, असे ममता बॅनर्जी यांनी एका भाषणामध्ये स्पष्टही केले. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये २० पेक्षा जास्त भाजपविरोधी पक्ष हजर राहतील...
                 

शबरीमला : 'त्या' महिलांच्या सुरक्षेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - केरळमधील २ महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे अलीकडेच दर्शन घेतले होते. मंदिरात प्रवेश केलेल्या २ महिलांपैकी एका महिलेवर तिच्या सासूने हल्ला केला होता. पीडित महिलेने याप्रकरणी याचिका दाखल करून तिच्यासह मंदिरात प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या महिलेलाही सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे...
                 

जवानांना मिळणाऱ्या जेवणाची तक्रार करणाऱ्या तेज बहादूर यादव यांच्या मुलाची आत्महत्या

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

आधुनिक भारताचा जातिवाद, मृतदेहाला स्पर्श टाळला, मुलाने सायकलवरुन नेला आईचा मृतदेह

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
भुवनेश्वर - एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा मृतदेह चक्क सायकलवरून वाहून नेला असल्याची धक्कदायक घटना उघडकीस झाली आहे. झारसुगुडा येथील ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराला मदत न केल्यामुळे मुलाला आपल्या आईचा मृतदेह सायकलवरच न्यावा लागला आहे. आधुनिकतेचे गोडवे गाणाऱ्या देशात आजही जातिवादाचे चटके किती भयंकर आहेत याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे...
                 

रोहित वेमुला आत्महत्येला ३ वर्षे पूर्ण

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

यूपीचे राजकारण : सपा-बसपाचा निवडणुकीय जुगाड? काँग्रेसपुढे दुहेरी अडचण

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी एकत्र येत युती केली. या युतीने काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला दूर ठेवले. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अखिलेश-मायावती एकत्र आल्यामुळे ही युती किती टिकेल यावर संशय व्यक्त केला जात आहे. भाजपनेही ही युती टिकाणार नसल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही सपा-बसपा युवीच्या तटस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे...
                 

मेघालयातील खाणीत अडकलेल्या 'त्या' मजुरांपैकी एकाचा सापळा आढळला

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

पुन्हा मॉब लिंचिंग! चोरीच्या संशयावरुन ३ युवकांना मारहाण; एकाचा रुग्णालयात मृत्यू

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

'Volkswagen' वायू प्रदूषणाला कारणीभूत; १७१ कोटींचा दंड आकारा, 'NGT'ची मागणी

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
ऑटो डेस्क - राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) ४ सदस्यीय कमिटीने जर्मनीची कार निर्मिती करणारी कंपनी 'Volkswagen' ला वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरविले आहे. समितीने कंपनीवर लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा ठपकाही ठेवला आहे. चुकीचे सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल दिल्लीशी संबंधित वायू प्रदूषण संदर्भात १७१.३४ कोटी रुपयांचा दंड आकारण्याची मागणीही समितीने केली आहे...
                 

लवकर बरे व्हा.. जेटलींच्या आजारपणाचे वृत्त ऐकून विरोधकही झाले भावूक

3 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस अगोदरच अर्थमंत्री अरूण जेटली कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ६६ वर्षीय जेटलींच्या आरोग्यासाठी भाजपच्याच नव्हे तर विरोधी पक्षांमधील नेत्यांनीही चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देत आपली सद्भावना व्यक्त केली आहे. जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला असून न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे येणारा अर्थसंकल्प जेटली सादर करतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे...
                 

राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माहेश्वरी, खन्ना यांची नियुक्ती

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

हुंड्यासाठी गर्भवती महिलेला जिवंत जाळले, अर्भकासह महिलेचा मृत्यू

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद नाहीत; कर्नाटकचे प्रभारी वेणुगोपाल यांचे स्पष्टीकरण

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
बेंगळुरू - सध्या कर्नाटकमध्ये सत्तेचे नाट्य सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पण, काँग्रेसमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल दिले आहे...
                 

..तर भाजप नेत्यांना बेदम मारू; बसप नेत्याचे भर सभेत बेताल वक्तव्य

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
लखनौ - एकदा सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पळवून-पळवून मारू, असे आक्षेपार्ह विधान बहुजन समाज पक्षाच्या (बसप) एका नेत्याने केले आहे. विजय यादव, असे या नेत्याचे नाव असून मोरादाबाद येथील एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी असे वक्तव्य केले. समाजवादी पक्ष (सपा) आणि बसपने उत्तर प्रेदेशामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी केली आहे. त्यानंतर तेथे राजकीय घडामोडींना उधाण आलेले दिसते...
                 

शत्रुघ्न सिन्हांचे थेट मोदींना आव्हान; वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचे केले स्पष्ट

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

निवडणुकांच्या तोंडावर भाजप जनतेच्या दारात; चार दिवसात घेणार ५० पत्रकार परिषदा

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आल्या आहेत. केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी वातावरण तापवले आहे. त्यामुळे, भारतीय जनता पक्ष देखील जनतेत जाण्याचा विचार करत आहे. येत्या चार दिवसात देशातील ५० ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. यात केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर नेते यात सामील होणार आहेत...
                 

पर्यटक संख्या घटण्याला गोवा सरकार जबाबदार; उपसभापती मायकल लोबोंचा आरोप

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

लढा अजून संपलेला नाही! शबरीमलात प्रवेश करणाऱ्या त्या 'दुर्गे'ला सासूचीच मारहाण

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
तिरूअनंतपुरम - शबरीमला मंदिरात प्रवेश केलेल्या 'त्या' दोन महिलांपैकी एका महिलेला तिच्या सासूनेच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कनकदुर्गा (वय ४४) या महिलेने शबरीमलात प्रवेश केल्याने चिडलेल्या सासूने तिला मारहाण केली. कनकदुर्गा हिने केलेल्या दाव्यानुसार ही मारहाण इतरी गंभीर होती की यानंतर तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागले...
                 

कर'नाटक' अध्याय २ मुंबईत; काँग्रेसचे 'ते' ३ आमदार भाजपच्या गळाला चर्चेला उधाण

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

गोव्यात बुधवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सवास सुरुवात

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
पणजी - मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याबरोबरच नवनवीन वैज्ञानिक शोध आणि संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ जानेवारीपर्यंत हा चित्रपट महोत्सव चालणार आहे. 'सागराचे भवितव्य'' 'तंत्रज्ञान आणि संशोधन' आणि 'पायाभूत विज्ञान' ही यावर्षीच्या विज्ञान चित्रपट महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तसेच चित्रपट बनविण्याची कार्यशाळा आणि प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे...
                 

अर्थमंत्री अरूण जेटली वैद्यकीय उपचारासाठी अचानक अमेरिकेला रवाना

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

घोडेबाजाराची बातमी चुकीची, कर्नाटक सरकार पूर्णपणे सुरक्षित; कुमारस्वामींचा दावा

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

उमर खालिदचा मोदींवर हल्लाबोल; आरोपपत्र दाखल होताच फेसबुकवर पोस्ट

6 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

मोदीजींना धन्यवाद, 'त्या' कारवाईची कन्हैया कुमारने उडवली खिल्ली

6 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल कन्हैया कुमारसह इतर काही जणांवर दिल्ली पोलिसांनी १२०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना कन्हैया कुमारने या घटनेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. आरोपपत्र दाखल केल्याची बातमी खरी असेल तर पोलीस आणि पंतप्रधान मोदींचे मी आभारच मानतो, असे म्हणत कन्हैयाने याची खिल्ली उडवली. घटनेच्या तीन वर्षानंतर निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे कन्हैया म्हणाला. तसेच माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे कन्हैया कुमारने यावेळी सांगितले...
                 

कर्नाटक सरकार धोक्यात? काँग्रेसच्या तीन आमदारांची मुंबईत भाजप नेत्यांसोबत खलबते

6 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
बंगळुरू - कर्नाटकचे मंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी कर्नाटकमधील काँग्रेस जेडीएसचे सरकार उलथवून लावण्यसाठी घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस अंतर्गत जेडीएसच्या आमदारांना मुंबईत बोलवले असून ह्या तीनही आमदारांची भाजप नेत्यांसोबत बोलणी सुरू असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या वृत्ताचे खंडन करत संभ्रम अजूनच वाढवला आहे...
                 

मुद्रा लोनमुळे वाढू शकतो एनपीए, रिझर्व्ह बँकेचा सरकारला इशारा

6 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

प्रजासत्ताक दिनापूर्वीच हिज्बुल मुजाहिद्दीनचे २ दहशतवादी अटकेत

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

वर्मांना बडतर्फ करणाऱ्या 'त्या' न्यायमूर्तींनी नाकारली मोदी सरकारची 'ऑफर'

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

इंडिया गेटवर महिलेने दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या-मोठ्या दाव्यांची सातत्याने पोल खोल होताना दिसत आहे. येथे रविवारी सकाळच्या सुमारास मानसिक दृष्या दुर्बल असलेल्या एका महिलेने इंडिया गेटवर देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही, तर संबंधित महिलेने चप्पल काढून इंडिया गेटवर आक्षेपार्ह वक्तव्येही केले...
                 

'आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नव्हे, त्यांना जातिआधारित आरक्षण संपवायचय'

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
कोलकत्ता - गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी रविवारी सर्वणांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. जातीवर आधारित आरक्षण संपुष्टात आणण्याचा संघ आणि भाजपचा जुना डाव असून सवर्ण आरक्षण हे त्याच दिशेने टाकले गेलेले पाऊल असल्याचे ते म्हणाले. शनिवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर सवर्ण वर्गातील गरीबांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...
                 

निवडणुकीसाठी सज्ज रहा, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सूचना

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

सवर्ण आरक्षणाच्या मागे आहे 'ही' व्यक्ती, युपीएच्या काळातच तयार होती योजना

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
दिल्ली/भोपाळ - लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच केंद्र सरकारने सवर्ण जातींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजपला फायदा होईल असा कयास केला जात आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असेही तज्ज्ञ सांगत आहेत. मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयामागे भोपाळमधील एक व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. ईनाडू इंडियाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे...
                 

ऋणानुबंध: मगरीच्या निधनाने गावावर शोककळा; असा दिला अखेरचा निरोप

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
रायपूर - माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. त्यामुळे आजपर्यंत तुम्ही माणूस, माकड आणि कुत्र्यांची अंत्ययात्रा पाहिली असेल पण, कधी एका मगरीची अंत्ययात्रा पाहिली आहे का? नाही ना, तर या फोटोंमध्ये तुम्ही ती पाहू शकता. छत्तीसगडच्या बेमेतरामधील मोहतारा गावातील ही दुश्य आहेत. या मगरीचे नाव गंगाराम असे होते...
                 

उत्तर प्रदेशात काँग्रेस पूर्ण शक्तीनीशी लोकसभा निवडणूक लढवणार - राहुल गांधी

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

बिहारच्या बेगूसरायमध्ये चकमक, तिघांचा खात्मा

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

यूपीतील 'बुआ - बबुआ' आघाडी बिघडवणार भाजपबरोबर काँग्रेसचाही खेळ ?

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
लखनौ - लोकसभा निवडणूक २०१९ साठी सपा आणि बसपा यांनी एकमेकांचा हात धरला आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी पत्रकार परिषदेत आज आघाडीची घोषणा केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही आघाडी आहे. उत्तर प्रदेशच्या ८० जागांपैकी ३८-३८ असा त्यांचा फॉर्म्यूला असून, उर्वरीत २ जागा त्यांनी मित्रपक्षांसाठी ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे ही आघाडी करत असताना सपा-बसपाने काँग्रेसला दोन हात लांब ठेवले असून तसे करण्यामागील कारणही सांगितले आहे. यावेळी मायावतींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मात्र, अखिलेश यादव यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले...
                 

राजस्थानातून पाकिस्तानी महिलेला गुप्त माहिती पुरवणाऱ्या लष्करी जवानाला अटक

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
जयपूर - राजस्थान गुप्तचर संस्थेच्या शाखेने हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक केली. हा जवान पाकिस्तानी महिलेला लष्करातील गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर सिंह असे या जवानाचे नाव असून त्याला जैसलमेर येथून अटक करण्यात आली. सोमवीर बऱ्याच काळापासून राजस्थान गुप्तचर संस्था आणि लष्करी गुप्तचर संस्थेच्या रडारवर होता...
                 

दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर यांना वीरमरण

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

कृपया आहेर नको; मोदींना मतदान करा, नमो अॅप वापरा

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
सूरत - 'राफेल' या एका नावावरून देशात सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. दररोजच्या वृत्तपत्रात, साप्ताहिक, मासिकांमध्ये याविषयी काही ना काही छापून येत आहे. आता राफेल हा विषय लग्नपत्रिकेवरही आला आहे. पंतप्रधान मोदींच्या एका समर्थकाने लग्नपत्रिकेत राफेलची माहिती छापली आहे. मोदी सरकार राफेल प्रकरणी योग्य असून त्यांच्या विषयी चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे त्यात म्हटले आहे...
                 

४ वर्षांपासून भारत असहिष्णुतेचा साक्षीदार; राहुल गांधींचा दुबईत हल्लाबोल

8 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

'लवकरच सुरू होईल राम मंदिराचे काम, निवडणुकीसाठी असेल राष्ट्रीय मुद्दा'

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

दिल्लीत मोदी लाट संपुष्टात, आपसोबत आघाडी नाही - शीला दीक्षित

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

आलोक वर्मांविरोधातील सीव्हीसीचा अहवाल, ठेवण्यात आले आहेत 'असे' आरोप

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

चंद्रयान-२ चे प्रेक्षपण एप्रिलच्या मध्यात होणार - इस्त्रो

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

यूपीत 'बुआ-भतीजा' एकत्र.. सप व बसप आघाडीची उद्या होणार घोषणा

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
लखनौ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी व भाजपला टक्कर देण्यासाठी अखिलेश व मायावती यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या (शनिवार) होणार आहे. सपचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपच्या अध्यक्षा मायावती संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार आहेत...
                 

हैदराबादमध्ये घुमणार 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघोष; शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉनचेही आयोजन

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
हैदराबाद - महाराष्ट्रासह देशभरातील मराठी बांधवाचे आराध्य दैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी १९ फेब्रुवारीला देशभरात उत्साहाने साजरी केली जाते. त्याप्रमाणेच पूर्वी निजामशाहीची आणि आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी असलेल्या हैदराबादमध्येदेखील शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यंदाही तेलंगणा मराठा समाज समितीच्यावतीने 'शिवजयंती उत्सव' जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ५ किलोमीटरच्या मॅरेथॉनसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे समन्वयक दिलीप जगताप यांनी दिली...
                 

'अस्सी घाटा' ते 'राजघाट' देवेंद्र फडणवीसांचा नावेने प्रवास, पाहा - Video

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांची पुन्हा हकालपट्टी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने आज पुन्हा एकदा अलोक वर्मांना सीबीआयच्या प्रमुखपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अलोक वर्मांना सक्तीच्या रजेनंतर सीबीआय प्रमुखपदी नेमण्यात आले होते. आता त्यांची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आल्याने सीबीआयमधील अंतर्गत राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय न्यायाधीश ए के सिक्रा व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा या समितीत समावेश होता. अलोक वर्मांना हटवण्याचा निर्णय २- १ या मताधिक्याने घेण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्मांना हटवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता...
                 

जीएसटी परिषदेचा छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटीची मर्यादा वाढवली

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - जीएसटी परिषदेची ३२ वी बैठक आज पार पडली. या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. या बैठकीत छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी असलेली जीएसटीची मर्यादा वाढविण्याचा, तसेच छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीच्या झंझटीतून मुक्त करण्यासाठी कंपोझिशन स्किमचीही मर्यादा वाढवीण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
                 

भारतीय लष्कर अजूनही होमोफोबिक, लष्करप्रमुख म्हणाले समलैंगिकतेला मान्यता नाहीच

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - समलैंगिक संबंधांचा शिरकाव आम्ही लष्करात होऊ देणार नाही, असे वक्तव्य लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्दबातल ठरवले होते. मात्र, काही गोष्टी कायद्याला मान्य असल्या तरी लष्कराला मान्य नसल्याचे म्हणत रावत यांनी लष्करात समलैंगिक संबंधांना अनुमती देणार नसल्याचे म्हटले आहे. समलैंगिकतेविषयी लष्कराचे स्वत:चे वेगळे कायदे असल्याचेही ते म्हणाले...
                 

वादग्रस्त साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचाही काढता पाय

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
यवतमाळ - ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अडथळ्यांची शर्यत अजूनही संपलेली नाही. रोज काही ना काही नव्या घडामोडी घडत असून या संमेलनातून दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आपला पाय काढता घेतला आहे. संमेलनाला देवेंद्र फडणवीस गैरहजर राहाणार असून मुख्यमंत्र्यांच्या जागी विनोद तावडे साहित्य संमेलनाच्या उद्धाटनाला हजेरी लावणार असल्याची माहिती पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली आहे...
                 

कन्हैया, उमर खलीदवर लवकरच देशद्रोहाचा गुन्हा - दिल्ली पोलीस आयुक्त

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

भाजप-शिवसेना युतीचा तिढा : मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींसोबत 'गुप्त' बैठक

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

मोदी सरकारवर नाराज IAS अधिकाऱ्याचा नोकरीला अलविदा, UPSC २००९ चा टॉपर लढवणार निवडणूक

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
दिल्ली - जम्मू काश्मिरमधील प्रशासकीय अधिकारी शाह फैजल यांनी नोकरीला अलविदा करून राजकारणात नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३५ वर्षीय फैजल आता सक्रीय राजकारणात सामील होणार असून ते नॅशनल कॉन्फरन्सकडून आगामी निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. २००९ च्या आयएएस परीक्षेत देशातून टॉपर येणारा फैजल पहिलाच काश्मिरी युवक ठरला होता. त्यावेळी संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता...
                 

उत्तर प्रदेशात काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकते; खासदार पुनियांचा सूचक इशारा

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
दिल्ली - समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामध्ये निवडणुकीच्या संबंधी चर्चा झाली आहे. दोघांमध्ये जागावाटप निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. यात काँग्रेसची भूमिका काय असणार याबद्दल संदिग्धता आहे. अशातच काँग्रेसला कमजोर समजू नका, गरज पडली तर आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू, असा इशारा काँग्रेसचे खासदार पी.एल. पुनिया यांनी दिला आहे...
                 

'२१व्या शतकात 'दुसरे आंबेडकर' जन्माला आले, ते आहेत 'नरेंद्र मोदी''

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
डेहराडून - खुल्या प्रवर्गातील गरीबांनाही आरक्षण देण्याचा केंद्राच्या निर्णयाचे सर्व राजकीय पक्षांकडून स्वागत होत आहे. त्याचबरोबर बहुतांशी पक्षांकडून जाणूनबुजून हा निर्णय २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घेतला असल्याची टीका होत आहे. मात्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे...
                 

गोव्याचे आजारी सरकार विसर्जित करावे, गोवा सुरक्षा मंचाची मागणी

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
पणजी - सचिवालयातील कार्यालयांवर गोव्याच्या मंत्र्यांचा अजूनही बहिष्कार आहे. आजारपणामुळे असह्य अवस्थेत विश्रांतीची गरज असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर खुर्चीला चिकटून राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मागच्या १० महिन्यांत खातेवाटप झालेला नाही. त्यामुळे राज्यातील कारभार विस्कळीत झाला आहे. गोव्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आजारी सरकार ताबडतोब विसर्जीत करून मध्यावधी विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचाच्यावतीने करण्यात आली...
                 

चीनने तिबेटमध्ये तैनात केल्या 'मोबाईल होवित्झर' तोफा

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

चंद्राबाबूंनी घेतली राहुल गांधींची भेट; चर्चा गुपीत

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

नागरिकत्व विधेयकः त्रिपुरात पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार; ६ आदिवासी तरुण जखमी

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

सवर्ण आरक्षणाला पाठिंबा, पण हा तर भाजपचा निवडणुकीसाठीचा स्टंट - माकप

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
दिल्ली - सरकारने सवर्ण जातीतील गरीबांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पण, जोवर खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू होत नाही तोवर त्याचा काही उपयोग नाही. तसेच, यातील ८ लाखांची मर्यादाही अव्यवहारिक आहे. त्यामुळे हा भाजपचा निवडणुकीसाठीचा स्टंट असल्याचे माकप नेते सिताराम येचुरी आणि मोहम्मद सलीम यांनी म्हटले आहे...