ईनाडू

मोहम्मद शमी केवळ १५ षटके टाकू शकणार, बीसीसीआयचे फर्मान

कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत सावधगिरी बाळगत एक फरमान बंगाल क्रिकेट असोसिएशनला धाडले आहे. आगामी रणजी ट्रॉफीच्या सामन्यात एका डावात १५ पेक्षा जास्त षटके टाकण्यास शमीला मनाई करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये शमी सध्या बंगालसाठी खेळतो आहे. बंगालचा पुढील सामना २० नोव्हेंबर रोजी केरळ संघाविरुद्ध होणार आहे...
                 

T20 WW: विंडींज-इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल, श्रबसोलची हॅटट्रिक

                 

HBD : एकेकाळी मशिदीत मारायचा झाडू, आता क्रिकेट विश्वातील मोठा तारा

                 

डिव्हिलियर्स नावाचे 'वादळ' पुन्हा मैदानात, ३० चेंडूत ठोकल्या ५९ धावा

केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे लाखो क्रिकेटप्रेमींना चांगलाच धक्‍का बसला आहे. मात्र, आता परत एकदा 'डिव्हिलियर्स' नावाचे वादळ मैदानावार घोंघावत आहे, ते म्हणजे मझांशी सुपर टी-२० लीग स्पर्धेत. शुक्रवारी न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात त्शाने स्पार्टन्सकडून खेळताना एबीने केप टाऊन ब्लिट्झविरूध्द ३० चेंडूमध्ये ५९ धावांची तुफानी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही...
                 

भारत 'अ'ने रचला धावांचा डोंगर, पार्थिवचे हुकले शतक

माऊंट मौनगुई - पार्थिव पटेल ९४, विजय शंकर ६२ आणि कृष्णाप्पा गौतम ४७ धावांच्या जोरावर भारत अ संघाने न्यूझीलंड अ विरुद्ध खेळताना धावांचा डोंगर रचला. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ८ बाद ४६७ धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या किवी फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजांची डाळ शिजली नाही. न्यूझीलंड अ संघास दुसऱ्यादिवसाखेर १ बाद १७० धावा करता आल्या...
                 

ऑस्ट्रेलियन दिग्गज डेमियन फ्लेमिंग म्हणतो बुमराह आहे भारताचा हुकुमी एक्का

सिडनी - ऑस्ट्रेलिया आणि भारत याच्यांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला ६ डिंसेबरपासून सुरुवात होणार आहे. या बहुचर्चीत मालिकेविषयी क्रिकेटविश्वातील अनेक जाणकारांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंगचाही समावेश झाला आहे. जसप्रीत बुमराहला भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाचा हुकुमी एक्का असल्याचे मत फ्लेमिंग यांनी मांडले आहे...
                 

यासिर शाहच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे लोटांगण

                 

हाँगकाँग ओपन: किदम्बी श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माचेही आव्हान संपुष्टात

कोवलून (हाँगकाँग) - भारताच्या किदम्बी श्रीकांतपाठोपाठ समीर वर्माचेही हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगचा खेळाडू ली चेक यूकडून समीर वर्माला पराभवाचा सामना करावा लागला. समीरच्या या पराभवासोबतच हाँगकाँग ओपनमधील भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे...
                 

जाणुन घ्या सनराईजर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू, 'हा' दिग्गज परतला संघात

                 

भारतीय 'अ' संघाची दमदार सुरुवात, ४ खेळाडूंनी ठोकली अर्धशतके

                 

राजस्थानकडून ११.५० कोटींची 'रॉयल्स' बोली लागलेला उनादकट बाहेर, स्टीव स्मिथ रिटेन

नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०१९ साठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादि जाहीर केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलच्या लिलावात ११.५० कोटीला खरेदी केलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला राजस्थान रॉयल्स संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उनादकट हा गेल्या वर्षाच्या मोसमातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता...
                 

आम्ही स्लेजिंग करणार नाही, कोणी केल्यास त्याला सोडणार नाही - विराट कोहली

मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत गेल्या काही वर्षांपासून बरेच वादविवाद घडले आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू स्लेजिंगद्वारे खेळाडूंना डिवचण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीत. यावेळेसही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ जात आहे, स्लेजिंगविषयी प्रश्न विचारला असता विराट म्हणाला, आम्ही स्लेजिंगची सुरुवात करणार नाही, पण आमच्याविरुद्ध कोणी स्लेजिंग केल्यास त्याला आम्ही सोडणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता...
                 

PAK VS NZ: एकदिवसीय आणि टी-२० नंतर कसोटीत न्यूझीलंडची परीक्षा

                 

महिला टी-२० विश्वचषकः श्रीलंकेकडून बांगलादेशचा दारूण पराभव

                 

ऑस्ट्रेलियात कोहलीची 'कामगिरी' मास्टर ब्लास्टरपेक्षा 'भारी'

                 

ठाण्यात अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

                 

आयपीएलच्या सहभागासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पूर्ण कराव्या लागणार 'या' अटी

मुंबई - ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने २०१९ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्याशिवाय कोणताही ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या मंडळांनीही आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी खेळाडू उपलब्ध राहणार नसल्याचे जाहीर केले होते...
                 

चेक बाउंस प्रकरणी मोहम्मद शमीला न्यायालयाकडून समन्स

                 

ऐकून हैराण व्हाल, तंदुरुस्तीसाठी रात्रीच्यावेळी करतोय 'हा' खेळाडू व्यायाम

नवी दिल्ली - मैदानावर चांगली कामगिरी बजावायची असेल तर आपल्याकडे कौशल्याबरोबरच तंदुरुस्तीचीपण गरज असते. शारीरिक तंदुरुस्ती असेल तरच मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहू शकता. म्हणून खेळाडू त्यांच्या फिटनेसवर जास्त मेहनत घेतात. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झाले तर विंडीजच्या खेळाडूंना इतर खेळाडूपेक्षा दणकट शरीरयष्टी लाभली आहे. ते खेळाडू तंदुरुस्तीसाठी चांगली मेहनत घेतात. त्यातील एका खेळाडूचा वर्कआउट पाहून तुम्ही हैराण व्हाल...
                 

पाक ४ प्रांत सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार - शाहिद आफ्रिदी

लंडन - काश्मीर मुद्द्यावरील वक्तव्यांमुळे चर्चेत आलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. पाक आपले ४ प्रांत सांभाळू शकत नाही, तो काश्मीर काय सांभाळणार, असे आफ्रिदीने म्हटले आहे. या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूनेच देशासंबधी याप्रकारचे वक्तव्य केल्याने पाक सरकारला घरचा आहेर मिळाला आहे...
                 

कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी उतरला कबड्डीच्या मैदानावर

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॅप्टनकूल धोनीचे कबड्डी खेळतानाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आपल्या आक्रमक खेळीने अनेकदा क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या धोनीला कबड्डीच्या मैदानावर पाहून त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मात्र, धोनी हा काही कबड्डी खेळायला वैगेरे नाही, तर एका प्रमोशनल शूटसाठी प्रो-कबड्डीच्या मैदानात आला होता...
                 

रोहित शर्माला 'या' दौऱ्यातून अचानक विश्रांती

                 

विराट आणि रोहितने माझ्यातील सुप्त गुणांना वाव दिला - खलिल

नवी दिल्ली - अचूक टप्पा आणि वेग यामुळे साऱ्यांनाच प्रभावित केलेला भारताचा युवा गोलंदाज खलील अहमदने आपल्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. खलीलने त्याच्या यशाचे श्रेय कर्णधार कोहली आणि रोहितला दिले आहे. खलिलच्या मते, रोहित आणि विराटने त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला. त्यामुळे त्याची कामगिरी चमकदार झाली...
                 

वनडे रँकिंगमध्ये 'बिग हिटर' रॉस टेलर तिसरा, पटकावले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान

                 

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूंचाच 'बोलबाला'

                 

या खेळाडूच्या मदतीने रोहितने केला विश्वविक्रम, जगाला दाखवली 'हिटमॅन'ची ताकद

                 

रणजी चषकासाठी दिल्लीचा संघ घोषित, टीम इंडियाच्या लंबूला मिळाली जागा

दिल्ली- रणजी चषकातील पहिल्या सामन्यासाठी दिल्लीचा संघ घोषित करण्यात आला आहे. दिल्ली डेअरडेविल्सचे नेतृत्व सोडणाऱ्या गौतम गंभीरला संघात संधी देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज लंबू उर्फ ईशांत शर्माला स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी ईशांतला सरावासाठी रणजी सामने उपयुक्त ठरणार आहेत...
                 

टी-२० रँकिंगमध्ये कुलदीपची मोठी झेप, पटकावले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान

                 

मशरफी मुर्तझा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

                 

टी-२० क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा रिषभ पंत ठरला दुसरा भारतीय खेळाडू

चेन्नई - रविवारी विंडीजविरुद्धच्या तिसऱया आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. तसेच ३-० च्या फरकाने भारताने मालिकाही आपल्या नाववर केली. या सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चौफेर फटकेबाजी करत ३८ चेंडूत ५८ धावांची शानदार खेळी केली. या खेळीने एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे...
                 

पावसाने पाकिस्तानच्या विजयावर फेरले पाणी, न्यूझीलंडविरुद्धची मालिका बरोबरीत

                 

WW T-20 : भारतापुढे विजयासाठी १३६ धावांचे आव्हान

गुयाना - भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी-२० महिला विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिस्माह मारूफ आणि निदा दार यांनी अर्धशतके ठोकली.पाकिस्ताने भारतापुढे विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवले.पाकिस्ताने २० षटकात ७ बाद १३५ धावा केल्या. भारताच्या पूनम यादव आणि डायलन हेमलताने प्रत्येकी २ गडी बाद केले...
                 

मिलर, डु प्लेसिसची दमदार शतके; आफ्रिकेचा मालिका विजय

होबार्ट - दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यांत आफ्रिकेने जगजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा ४० धावांनी पराभव केला. या सामन्यात डेविड मिलर आणि फाफ डु प्लेसिसने वादळी शतकी खेळी केली. निर्णायक सामन्यात या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने ५० षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात ३२० धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला ५० षटकात ९ बाद २८० धावाच करता आल्या. आफ्रिकेने ९ वर्षानंतर ऑस्ट्रेलियात २-१ अशा फरकाने मालिका जिंकली...
                 

Happy Birthday रॉबिन उथप्पा; बीसीसीआयने ट्वीट करत दिल्या शुभेच्छा

मुंबई - भारताचा आक्रमक सलामीवीर रॉबिन उथप्पाचा आज वाढदिवस आहे. कर्नाकटच्या कुर्गमध्ये जन्मलेला रॉबिन उथप्पा आज ३३ वर्षांचा झाला आहे. उथप्पा त्याच्या स्टायलिश फलंदाजीसाठी ओळखला जातो. २००७ च्या टी-ट्वेन्टी विश्वचषकात खेळपट्टीवर चालत जावून ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीला खेचलेला षटकार आजही सर्वांच्या आठवणीत आहे...
                 

WW T-20: ...म्हणून एकही चेंडू न टाकता सामना झाला रद्द

                 

संघात वरिष्ठ खेळाडू नसल्याने आमचा पराभव - दिनेश रामदीन

                 

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय 'अ' संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना

                 

चेंडू लागल्याने पाकचा खेळाडू मैदानात कोसळला

अबुधाबी - पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला ६ गडी राखून हरविले. पण या विजयाचा जल्लोष त्यांना करता आला नाही. त्यांचा सलामीचा फलंदाज इमाम उल हक गंभीररित्या जखमी झाला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज फर्ग्यूसनचा चेंडू हकच्या डोक्यावर आदळला. हकला चक्कर आल्याने तो बेशुध्द होऊन खाली कोसळला...
                 

विस्मरणात गेलेल्या मुनाफ पटेलची क्रिकेटमधून अखेर निवृत्ती

मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याने आंतरराष्ट्रीय तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २००३ साली भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर ११ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर त्याने क्रिकेटला अलविदा केले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी मुनाफने निवृत्ती पत्करली आहे. त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे मुनाफला भारताचा मॅकग्रा म्हटले जायचे...
                 

ऑस्ट्रेलिया विजयी ट्रॅकवर, ७ सामन्यानंतर मिळविला पहिला विजय

                 

टी-२० विश्वचषक: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

                 

स्मिथ, वार्नरवरील बंदी उठण्याची शक्यता, माजी क्रिकेटपटूंनी टाकला दबाव

सिडनी - ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड स्टीव स्मिथ, डेविड वार्नर यांच्यावर लावण्यात आलेली बंदी मागे घेऊ शकतो. ऑस्ट्रेलिया क्रिकेटर संघटनेने स्मिथ आणि वार्नर यांच्यावरील बंदी हटवावी, या मागणीसाठी सीएचे मुख्याधिकारी केविन रॉबर्टस यांच्याकडे तगादा लावला आहे. रॉबर्टस यांनी स्मिथ आणि वार्नर यांच्यावरील बंदी हटविण्यासाठी लवकरच विचार करण्यात येईल असे सांगितले. या दोघांवरील बंदी उठवल्यास स्मिथ आणि वार्नर भारताविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतील...
                 

चाहत्यांमुळेच मानधन मिळते, बीसीसीआयने विराट कोहलीला सुनावले

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला चाहत्यांबद्दल 'देश सोडून दुसऱ्या देशात राहायला जा' हे वक्तव्य चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. विराटच्या या वक्तव्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत जर चाहते सामना पाहायला आले नाहीत तर खेळाडू आणि बीसीसीआय आर्थिक अडचणीत येतील, हे बहुधा विराट विसरला असेल, असे अधिकाऱ्यांनी विराटला सुनावले आहे...
                 

कोहलीच्या 'त्या' ट्विटवर युजरचे सडेतोड उत्तर, म्हणाला विराट तू...

मुंबई - भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. एका युजरने विराट कोहली आणि भारतीय फलंदाज आवडत नसल्याची खोचक पोस्ट शेअर केली होती. त्यावर विराटने प्रतिउत्तर देत खेळाडू आवडत नसेल तर देश सोडून जाण्यास सांगितले होते. त्यावर युजरने कोहलीच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेत सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली...
                 

बापरे ! हा गोलदांज कोण ? पहा 'त्या'चा चक्रावून सोडणारा व्हिडिओ

नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये गोलंदाज हे फलंदाजांना बाद करण्यासाठी अजब-गजब कसरती करत असतात. तुम्ही गोलंदाजीत दोन्ही हाताने बॉलिंग करणारे बॉलर्स पाहिले असतील. पण भारतात असा एक गोलंदाज आहे जो ३६० अंश कोन फिरुन गोलंदाजी करतो. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटचे दिग्गजदेखील हैराण झाले आहेत. शिवा सिंग असे या गोलंदाजाचे नाव आहे...
                 

टी-२० मध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या रोहितला विश्वविक्रम खुणावतोय

चेन्नई - भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करीत आहे. नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तडाखेबंद त्याने शतक ठोकून टी-२० मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला. भारत आणि विंडीज यांच्यातील शेवटचा टी-२० सामना चेन्नईला रविवारी ११ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यातही रोहितला आणखी एक विश्वविक्रम करण्याची संधी आहे...
                 

भारतीय गोलंदाजांनी आयपीएलमध्ये खेळू नये, विराट कोहलीचा सल्ला

मुंबई - क्रिकेटचे आगामी विश्वचषक २०१९ साली इंग्लंडमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठी जवळपास सहा महिने शिल्लक आहेत. सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी संघ व्यवस्थापन खेळाडूंना आयपीएल आणि इतर टी-20 लीगमध्ये भाग घेण्यापासून सतर्क आहेत. याच धर्तीवर विराटनेही सीओएच्या बैठकीत भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळू नये, असे मत मांडले आहे...
                 

पाहा व्हिडिओ: ६ चेंडूत ६ षटकार, एका षटकात कुटल्या ४३ धावा

नवी दिल्ली - न्यूझीलंडच्या २ खेळाडूंनी प्रथमश्रेणीच्या सामन्यात नवा विक्रम केला आहे. दोघांनी मिळून एका षटकात तब्बल ४३ धावा कुटल्या. नार्दर्न डिस्ट्रिक्टचे फलंदाज जो कार्टर आणि ब्रेट हॅम्टन यांनी एकाच षटकात ६ षटकार आणि १ चौकरांच्या आतषबाजीने ४३ धावा कुटल्या. त्यातील २ षटकार नोबॉलवर खेचले. सेंट्रल डिस्ट्रिक्टचा गोलंदाज विलेम लुडिक या गोलंदाजाच्या षटकात हा विक्रम केला आहे...
                 

'हा' माजी कर्णधार बंगालमधून लढविणार लोकसभा निवडणूक

कोलकाता - भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक बंगालमधून लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अझरुद्दीन कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अद्याप कळाले नाही. अझरुद्दीन यांना बंगालमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ऑफर दिली जात आहे. काही स्थानिक आणि राष्ट्रीय पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे...
                 

१९ वर्षानंतर टीम इंडियाला भेटला दुसरा कुंबळे, एका डावात घेतले १० बळी

मुंबई - टीम इंडियाच्या जम्बोने दिल्लीच्या फोरजशाहा कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्धचा ड्रीम स्पेल कधीच विसरु शकत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या १९९९ साली झालेल्या दुसऱया कसोटी सामन्यांत या स्पेलमध्ये अनिलने एका डावात १० गडी बाद केले.अनिलच्या या ड्रिम स्पेलची आठवण १९ वर्षांनंतर पुन्हा एका भारताच्या एका युवा गोलंदाजाने अशी कामगिरी करुन दिली आहे...
                 

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी कांबळीने केली 'ही' भविष्यवाणी

मुंबई - माजी खेळाडू विनोद कांबळीने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठी भविष्यावाणी केली आहे. स्टीव स्मिथ आणि डेविड वार्नरसारखे दिग्गज खेळाडू नसल्याने भारतीय संघ ऑस्ट्रेलियात विजयी पताका फडकावू शकतो, असे कांबळीने भाकित केले आहे. शानदार फॉर्मात असलेल्या कर्णधार विराट कोहलीचे कांबळीने कौतुक करत म्हणाला, की कोहलीत धावांची भूक खूप आहे. मैदानावर तो शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो...
                 

नव्या खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी द्या- गौतम गंभीर

नवी दिल्ली- माझ्या खांद्यावर असलेली नेतृत्वाची जबाबदारी कमी करुन ती नव्या खेळाडूकडे देण्यात यावी, अशी मागणी दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीर यांने डीडीसीएच्या निवड समितीकडे केला होता. गंभीरने केलेल्या विनंतीनुसार, डीडीसीएने दिल्लीचा कर्णधार म्हणून युवा फलंदाज नीतीश राणा याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राणा २०१८-१९ च्या रणजी मौसमात दिल्ली संघाची कमान सांभाळणार आहे...
                 

जेव्हा रवी शास्त्री मुंबईच्या लोकलमधून करतात प्रवास.. नेटीझन्सकडून भन्नाट जोक्स व्हायरल

                 

शेवटच्या कसोटीत श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज रंगना हेराथने केला नवा विक्रम

                 

भारत-विंडीज सामन्याच्या एक दिवस आधी योगी सरकारने बदलले स्टेडियमचे नाव

                 

पाकच्या खेळाडूने मोडला विराट कोहलीचा 'हा' मोठा विक्रम

                 

व्हिडिओ: जेव्हा विंडीजचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला धावतात...

                 

वाढदिवस क्रिकेटच्या बेताज बादशाहाचा!

भारत या देशात क्रिकेट या खेळाला फक्त खेळ नाही तर एक धर्म मानला जातो आणि याचे चाहतेही असंख्य आहेत. भारतात जन्म घेतलेला प्रत्येक मुलगा हा मोठा होऊन क्रिकेट खेळाडू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाढत असतो. असाच एक विराट कोहली नावाच्या युवा खेळाडूने भारतीय क्रिकेटमध्ये धडक दिली आणि बघता बघता तो भारतीय क्रिकेटचा चेहरा बनून गेला. भारतात क्रिकेट नावाच्या धर्मावर आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारा एकमेव राजा म्हणजे विराट कोहली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...
                 

अमेरिका क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे 'या' मुंबईकराच्या हाती

मुंबई आणि क्रिकेट यांचे विशेष असे एक नाते आहे. येथील बहुतांश सगळ्याच गल्ली, चौक आणि मैदानात मुले क्रिकेट खेळताना दिसतात. त्यापैकीच एक सौरभ नेत्रावलकर हा आता अमेरिकेच्या संघाचे सूत्र संभाळताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेटला यशोशिखरावर नेण्यात मुंबईतील अनेक दिग्गज क्रिकेटर्सचे योगदान आहे. पण, आता अमेरिकेच्या क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवण्यासाठी मुंबई सज्ज आहे. सौरभने याआधी भारताच्या अंडर १९ संघात आपले कौशल्य दाखवले आहे...
                 

फलंदाजीतील सर्व 'विराट' विक्रम कोहली मोडून काढेल - स्टीव वॉ

                 

ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज म्हणतो, 'हार्दिकला मिस करेल टीम इंडिया'

सिडनी - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कमतरता नक्कीच जाणवेल असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीने व्यक्त केले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या पंड्याला आशिया चषकावेळी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती...
                 

जो रुटने ठोकले १५ वे शतक, इंग्लंडकडे २७८ धावांची आघाडी

                 

यूएईमध्ये होणारी टी-२० लीग रद्द, क्रिकेट फॅन्सला धक्का

                 

विराटला डिवचू नका, डु प्लेसिसचा कांगारुंना सल्ला

                 

आयपीएलमध्ये तळपणार स्मिथ-वॉर्नरची बॅट..

मुंबई - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सने तर डेव्हिड वॉर्नरला सनराईजर्स हैदराबादने रिटेन केल्यामुळे आयपील २०१९ मध्ये हे दोन्ही दिग्गज खेळताना दिसणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमानुसार गुरुवारी सर्व संघमालकांकडून खेळाडूंना रिलीज आणि रिटेन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या नियमानुसार स्मिथ आणि वॉर्नरला त्यांच्या संघाकडून रिटेन करण्यात आले आहे...
                 

निवृत्तीच्या दिवशीचे सचिनचे भाषण ऐकून तुम्ही आजही व्हाल भावूक

मुंबई - २९ वर्षांपूर्वी १५ नोव्हेंबर १९८९ ला क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. २४ वर्ष क्रिकेटविश्व गाजवल्यानंतर सचिन १६ नोव्हेंबर २०१३ ला निवृत्त झाला होता. विंडीजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सचिनने केलेली ७४ धावांची आणि त्याचे केलेले भाषण आजही सर्व क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे...
                 

IPL: 'या' ३ दिग्गज खेळाडूंना दिल्ली संघाकडून डच्चू

                 

स्वप्न तुटले युवी-रैनाचे, विश्वचषकात खेळण्याचे

मुंबई - विश्वचषकापूर्वी भारताला केवळ १३ सामने खेळायचे आहे. त्यापूर्वी संघात यापुढे कोणताही बदल केला जाणार नाही. सध्या जे १५ खेळाडू आहे त्याच्या सोबतच आम्ही विश्वचषकात खेळणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. शास्त्री यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीच्या या विधानावरुन सिक्सर किंग युवराज सिंग आणि चपळ क्षेत्ररक्षक सुरैश रैना यांचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न तुटल्याचे बोलले जात आहे...
                 

बांगलादेशने झिम्बाब्वेला नमवत मालिकेत साधली बरोबरी, टेलरचे शतक वाया

                 

IPL: मुंबई इंडियन्सने १८ खेळाडू केले रिटेन, ड्युमिनी-कमिन्ससह १० जणांना नारळ

                 

रणजी क्रिकेट: सर जडेजाची जिगरबाज खेळी, हुकले द्विशतक

राजकोट - भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य सर रवींद्र जडेजाने रणजी सामन्यात जिगरबाज खेळी करत संघाला तारले आहे. त्याने सौराष्ट्रकडून खेळताना रेल्वेच्या संघाविरुद्ध १७८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने ४ बळी घेतले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सौराष्टने पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी मिळवली. सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ३४४ धावा केल्या...
                 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुण्यात, केले युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन

पुणे - देशातील गुणवंत खेळाडूंना क्रिकेटसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीची स्थापना करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्थापन केलेल्या या अकॅडमी अंतर्गत आज पुण्याच्या बिशप्स हायस्कूलच्या मैदानावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. यावेळी सचिनसोबत त्याचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीदेखील उपस्थित होता...
                 

एबी डिव्हिलिअर्स 'या' संघाच्या कर्णधारपदी

                 

IPL : मुंबई-हैदराबादच्या ६ अष्टपैलूंवर एकटा धोनी पडला भारी

                 

कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज खेळाडूला दिला नारळ

                 

जगजेत्या ऑस्ट्रेलियापेक्षा हाँगकाँग आणि झिम्बाब्वेचे संघ भारी

मुंबई - २०१४ साली विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला सध्या उतरती कळा लागलेली आहे. यावर्षी मार्च महिन्यांत कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी आल्यानंतर संघाची कामगिरी इतकी खालावली आहे की, यावर्षी सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा हाँगकाँग आणि झिम्बाब्वेचे संघ सरस ठरले आहेत...
                 

पाकच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावणाऱ्या मराठमोळ्या कानिटकरचा आज वाढदिवस

                 

शोएब मलिकला हवाय कुटुंबासाठी वेळ; टी-१० लीग खेळणार नाही

                 

कांगारुंना चित करण्यासाठी आम्ही आहोत सज्ज - कुलदीप

                 

रणजी ट्रॉफी : झारखंडने हरियाणाला २ दिवसातच केले पराभूत

रोहतक - झारखंडने रणजी ट्रॉफीच्या 'क' गटातील दुसऱ्या सामन्यात दुस-याच दिवशी हरियाणाचा ९ गडी राखून पराभव केला. चौधरी बंसीलाल क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झारखंडने हरियाणाला पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात ७२ धावावंर बाद केले. पहिल्या डावात झारखंडला १४३ धावांमध्ये गारद करण्यात हरियाणाच्या गोलंदाजांना यश आले. मात्र, त्यांचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने लाजिरवाण्या पराभावास सामोरे जावे लागले...
                 

विराटचा त्यावेळी संयम सुटला होता - विश्वनाथन आनंद

मुंबई - विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी एका चाहत्याला ट्वीटरवर उत्तर देताना देश सोडून जा असे वक्तव्य केले होते. यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे. पाचवेळा जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता विश्वनाथन आनंद यानेही यावर आपले मत व्यक्त केले. विराट भावनिक झाल्याने त्याचा संयम सुटला, त्यामुळे जे मनात आले ते विराट बोलून गेला...
                 

टी-२० विश्वचषकानंतर मिताली राज निवृत्ती स्वीकारणार

गयाना - भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राज आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा वाटेवर आहे. भारताची सर्वाधिक यशस्वी फलंदाज ठरलेल्या मितालीने विंडीजमध्ये सुरु असलेला टी-२० विश्वचषक शेवटचा असल्याचे सांगितले. मिताली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. नुकतेच मितालीने रोहित शर्माचा टी-२० मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मोडीत काढला आहे...
                 

पटेल नसता तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो नसतो - श्रीसंत

मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा भोगत असलेला भारतीय क्रिकेटर श्रीसंत सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना श्रीसंतने क्रिकेट कारकिर्दीबाबत एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, जर भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल आपल्यासोबत नसता तर मी कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो नसतो...
                 

ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी आव्हानात्मक असेल- रोहित शर्मा

                 

मुशफिकुर रहीमचा डबल धमाका, केला 'हा' नवा विक्रम

                 

दुसऱ्या कसोटीत बांगलादेश मजबूत स्थितीत, मोमीनुल-मुश्फिकुरची शतकी खेळी

ढाका - झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत मोमीनुल हक आणि मुश्फिकुर रहीम यांनी शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेश मजबूत स्थितीत पोहचला आहे. मोमीनुलने २४७ चेंडूत १६१ धावांची खेळी केली. त्याचे हे सातवे कसोटी शतक ठरले. मुश्फिकुर रहीमने नाबाद १११ धावाची खेळी केली. त्याचे हे सहावे कसोटी शतक होते. दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर बांगलादेश पहिल्या दिवसाअखेर ५ बाद ३०३ धावा केल्या...
                 

श्रीलंकेला झटका, कर्णधार चंडीमल दुसऱ्या कसोटीतून बाहेर