महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू Zee24Taas

IPL फिक्सिंग: तो माझ्यासाठी सर्वांत कठीण काळ- धोनी

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
२०१३ मध्ये भारतीय क्रिकेट विश्वाला हादरवणाऱ्या आयपीएल फिक्सिंग प्रकरणावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मौन सोडंल आहे. धोनीने पाच वर्षानंतर आयपीएल फिक्सिंगवर आपली व्यथा मांडली आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणाने प्रचंड निराश झालो होतो. तो जीवनातील सर्वांत वाईट काळ होता. यात खेळाडूंची काय चूक होती?, असा सवाल धोनीने केला आहे...
                 

मोहिते-पाटलांनी फोन स्विच ऑफ ठेवून निर्णय घेतला: पवार

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
​माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. विजयसिंह मोहिते पाटील हे ज्येष्ठ असून लोकसभेत त्यांची गरज आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवत आपला निर्णय घेतला, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला...
                 

माजी न्यायमूर्ती पीसी घोष देशाचे पहिले लोकपाल

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
                 

रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीची न्यायालयात माहिती

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अवैध आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, वाड्रा चौकशीदरम्यान सहकार्य करत नाही असे ईडीकडून आज दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयात सांगण्यात आले. सोबतच चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याची परवानगीही ईडीकडून मागण्यात आली आहे...
                 

आयएल अँड एफएसच्या आर्थिक संकटाचा सैन्यदलालाही फटका, २१० कोटी अडचणीत ?

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ देश  
नवी दिल्ली - आयएल अँड एफएसने ९० हजार कोटींचे कर्ज थकविल्यानंतर त्याचे फटका बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. याच आय एल अँड एफएसच्या रोख्यामध्ये आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंडने (एजीआयएफ) पैसे गुंतविले आहेत. त्यामुळे हे गुंतविण्यात आलेले २१० कोटी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम वित्तीय विश्लेषकांकडून सल्ला मिळाल्यानेच ही गुंतवणूक केली होती, असे सैन्यदलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल मोहित वैष्णव यांनी माहिती दिली आहे...
                 

IPL: CSKची पहिली कमाई शहिदांच्या कुटुंबांना

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

बँक खाते उघडतानाच नीरव मोदीला पकडलं

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला काल लंडन पोलिसांनी एका बँकेतच बेड्या घातल्या. नीरव मोदी हा मेट्रो बँकेच्या एका शाखेत खाते उघडण्यासाठी गेला होता. त्याचवेळी बँकेतील सतर्क क्लर्कनं त्याला ओळखले आणि लंडन पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच तिथे पोलीस पोहोचले आणि त्यांनी नीरवच्या मुसक्या आवळल्या...
                 

फ्रान्सनंतर जर्मनीचाही मसूद अझहरला 'ईयू'मध्ये दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

सिक्सर किंग युवराज मुंबई इंडियन्स संघात, नीता अंबानींनी केले स्वागत

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
                 

CRPF कॅम्पमध्ये सहकाऱ्याचा बेछूट गोळीबार; ३ जवान ठार

21 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आयपीएलच्या इतिहासात १२ गोलंदाजांनी साधली हॅटट्रीक, या विक्रमातही सर्वात पुढे भारतीय

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
                 

'सेटर्स' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार रिलीज!

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
                 

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत निवडणूक सदिच्छा दूत

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला ‘प्रहार’ची ऑफर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला तथा यवतमाळातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन वैशाली येडे यांना प्रहार संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी ऑफर दिली आहे. यवतमाळ-वाशील लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी म्हणून प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती 'प्रहार'चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी दिली आहे...
                 

शिक्षकाच्या हत्येवर माओवाद्यांचा माफिनामा

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

राज ठाकरे आणि नारायण राणेंबाबत आदित्य ठाकरे म्हणतात, जाऊ दे...

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

राज ठाकरेंसह सर्वच नेते आमचे स्टार प्रचारक - सचिन अहिर

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

विदर्भाला गारपिटीचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला छुपा पाठिंबा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - भाजप आणि मोदी-शाहच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की, तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात आहे. म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान करु नये, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकारी मेळाव्यात स्पष्ट केली. यावरुन राजकीय वर्तुळात मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला छुपा पाठिंबा आहे, अशा चर्चेला उधाण आले आहे...
                 

'चौकीदार' मोहीम म्हणजे फास - राज ठाकरे

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - भाजप आणि पंतप्रधान मोदींच्याकडून सुरू असलेली चौकीदार मोहीम म्हणजे एक फास असल्याचे राज ठाकरे म्हणाले. “मैं भी चौकीदार हूं” मोहिमेची त्यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान म्हणून तुमचे विचार मोठे असले पाहिजेत, मात्र यांना काय? तर चौकीदार व्हायचे आहे, असे म्हणत मोदींच्या आवाजात त्यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली...
                 

गोवा: प्रमोद सावंत यांनी जिंकला विश्वास ठराव

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत आज २० विरुद्ध १५ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मनोहर पर्रीकरांच्या निधनांतर काही तासांतच काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केल्यामुळे गोव्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते की काय अशी सर्वत्र चर्चा होती...
                 

...म्हणून साजरा करतात 'जागतिक चिमणी दिवस'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
वाढतं शहरीकरण, परिणामी वाढलेलं काँक्रिटीकरण, कमी होत जाणारा जंगलाचा भूभाग, वाढलेलं मोबाईल टॉवरचं जाळं यामुळे चिमण्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातूनच चिमण्या वाचवण्यासाठी काही पक्षीप्रेमी पुढे आले. नोव्हेंबर २००९ पासून चिमणी वाचवण्याची मोहीम सुरू झाली. २० मार्च २०१० रोजी पहिल्यांदा दिल्ली येथे 'जागतिक चिमणी दिन' साजरा झाला...
                 

ठाण्यात नऊ वर्षीय मुलीवर श्वानाचा हल्ला, थोडक्यात बचावली

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
ठाणे - भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ठाणेकरांसाठी आव्हान ठरले आहे. साईनाथनगर परिसरात घराच्या प्रांगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला भटक्या श्वानाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. श्वानाच्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला नऊ टाके पडले असून तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुस्कान अन्वर शेख (९) असे जखमी मुलीचे नाव आहे...
                 

'गुलाल'च्या अभिनेत्याची दुदर्शा; झाला वॉचमॅन

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

जिओ फोन २ चा आज दुपारी १२ पासून फ्लॅश सेल

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

शिरूर मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचा पालकमंत्री गिरीश बापटांनी घेतला मेळावा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ पुणे  
                 

राज्यातील पहिल्या सहकुटुंब शेतकरी आत्महत्येला ३३ वर्ष पूर्ण

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व ४ मुलांसह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथे १९ मार्च १९८६ साली सहकुटुंब आत्महत्या केली होती. या घटनेची महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली. आज या घटनेच्या ३३ व्या स्मृती प्रित्यर्थ नागपूरातील जनमंचतर्फे अन्नदात्यासाठी संवेदना हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले...
                 

पंतप्रधान मोदींविरोधात भाजपमध्ये '२२० क्लब'?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भाजपमध्ये '२२० क्लब' असून, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या २२० जागा निवडून आल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधान होतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपमध्ये असा कोणताही '२२० क्लब' नाही. या सगळ्या अफवा आहेत, असं सांगत गडकरी यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला...
                 

काटोलकर यंदा दोनवेळा करणार मतदान, लोकसभा-विधानसभा एकत्रच

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ नागपूर  
नागपूर - अखेर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी जारी केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या दिवशी सात जणांनी अर्ज खरेदी केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २ लाख ४३ हजार मतदार होते. यात नवीन २४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. काटोल विधानसभा क्षेत्रात ३२८ मतदार केंद्र आहेत...
                 

होळी: अतिउत्साहींना रोखण्यासाठी पोलीस सज्ज

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदी-शहांविरुद्ध राजगर्जना; पाठिंबा मात्र कुणालाच नाही!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
नरेंद्र मोदी-अमित शहा विरुद्ध देश अशी ही लोकसभा निवडणूक असून मोदी-शहामुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. देशाच्या नव्या प्रारंभासाठी मोदी-शहा हे राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे. देश ह्या दडपशाहीतून मुक्त होणं गरजेचं आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या आणि भाजपच्या विरोधात प्रचार करा, असे आवाहनही राज यांनी कार्यकर्त्यांना केले...
                 

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी अधिक आनंदी: UN

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक घसरून तो १४० व्या स्थानी पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत सात पायऱ्या खाली सरकला आहे. यादीत भारत पाकिस्तानच्या मागे असल्याचे दिसत आहे. यादीत पाकिस्तान ६७व्या स्थानी आहे. दरम्यान, फिनलँड देशाने याही वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी हा रिपोर्ट प्रसिद्ध केला...
                 

दाऊद इब्राहिमला आणण्याच्या हालचालींना वेग

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार; एक जवान शहीद

16 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

गुगलने ठेवलं होळीसाठी विशेष डुडल

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'अशी' आहे रोहित शर्माची बॅट, मुंबई इंडियन्सने ट्वीट केला PHOTO

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
मुंबई - इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ फेव्हरिट मानला जात आहे. यंदाही हा संघ चौथ्यांदा जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. नेतृत्वाची धुरा हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आज मुंबई इंडियन्सने त्याच्या कर्णधाराच्या बॅटचे फोटो ट्वीट केले आहेत. या बॅटवर रोहितचे नाव आणि त्याचा आवडता क्रमांक म्हणजेच RO ४५ special असे लिहिले आहे...
                 

कॅन्सर बरा करतो सांगत पुजाऱ्याचा बलात्कार

20 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मंत्रसिद्धीने मुलाचा कर्करोग बरा करतो असे सांगत पुजाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. इतकेच नाही, तर या मांत्रिकाने पीडित महिलेच्या पतीकडून ३.५ लाख रुपयेही उकळले आहेत. या महिलेच्या कर्करोड पीडित १० वर्षीय मुलाचा गेल्यावर्षी मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दाम्पत्य उच्चशिक्षित असून महिलेचा पती शास्त्रज्ञ आहे...
                 

हॅपी होळी! धुळवडीच्या शुभेच्छा द्या, संदेश लिहा

21 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'सेक्रेड गेम्स'चा सिक्वेल १४ दिवसांनी होणार प्रदर्शित?

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
मुंबई - नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरीजची बरीच चर्चा झाली. सेक्रेड गेम्सला मिळालेल्या या प्रतिसादानंतर 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनचीदेखील अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. नेटफ्लिक्सने एक फोटो शेअर करून १४ दिवसांनी 'सेक्रेड गेम्स'चा सिक्वेल प्रदर्शित होण्याचे संकेत दिले आहेत...
                 

पावरफुल बॅटरी असलेला Xiaomi 'Redmi Go' लाँच

yesterday  
बातम्या / ईनाडू/ गॅजेटविश्‍व  
                 

‘पीएमओ’ म्हणजे मोदींचे प्रसिद्धी मंत्रालय: राहुल

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मतदान दिनांकाचा चुकीचा उल्लेख अनावधानाने, जिल्हाधिकारी कार्यालयाचा खुलासा

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
​मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या आदेशात मतदान तारखेचा उल्लेख चुकला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यात असे चुकीच्या तारखांचे वृत्त काही वृत्तपत्रे व प्रसिद्धी माध्यमांमधून प्रकाशित झाले होते. त्याबाबतचा सविस्तर खुलासा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे...
                 

माझगाव येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

अमरावतीत नवनीत राणांना राष्ट्रवादीचे समर्थन

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आमदार रवी राणा यांच्या अर्धांगिनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीस समर्थन दिले आहे. राणा दाम्पत्याने बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राणा यांच्या उमेदवारीला समर्थन देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे...
                 

नागपूर: सोशल मीडियामुळे सापडला ‘लाडला’

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

निवडणूक लढवून डिपॉझिट वाचवून दाखवावे, विनोद तावडेंचे मनसेला आव्हान

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यामुळे देश अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी प्रचार करणार आहे. लोकांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानीही तसा प्रचार करावा असे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आवाहन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. राज ठाकरे यांचे रंगशारदा येथील भाषण संपताच भाजपचे नेते व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेवर जोरदार टीका केली. मनसेने निवडणूक लढवून आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे असे थेट आव्हानच तावडे यांनी मनसेला दिले आहे...
                 

पीएनबी घोटाळा: फरार आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक तारखांमध्ये बदल, चूक झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

आगे आगे देखिये होता है क्या..अनेकजण भाजपच्या रांगेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टाकले पेचात

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - मागील आठवड्यात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश घेतला. यानंतर सातत्याने भाजपकडून आमच्या पक्षात विरोधी गोटातले मोठे नेते येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज आगे आगे देखो होता है क्या, असे सांगत आगामी काळात नवे राजकीय बदल बघायला मिळतील असे सूतोवाच केले आहे...
                 

चौकीदार हा देशभक्तीला पर्यायी शब्द: मोदी

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'संपूर्ण देश चौकीदार झाला आहे. चौकीदार हा देशभक्तीला पर्यायी शब्द आहे,' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात विद्यार्थ्यांपासून शिक्षक, शेतकरी, नोकरदार आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लोक 'मी सुद्धा या देशाचा चौकीदार आहे' असं म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे...
                 

कोळी समाजाची पारंपरिक होळी; महिला, पुरुष, लहानग्यांसह वृद्धांचा उत्साह शिगेला

yesterday  
बातम्या / ईनाडू/ ठाणे  
                 

महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिनाचा आज ९२ वा वर्धापनदिन

yesterday  
बातम्या / ईनाडू/ रायगड  
रायगड - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून अखिल मानव जातीला पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेला आज ९२ वर्ष पूर्ण होत आहेत. चवदर तळे सत्याग्रह दिनाचा ९२ वा वर्धापनदिन आज महाडमध्ये उत्साहात साजरा होत असुन देशभरातुन हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत...
                 

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे निधन

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

किंग्ज इलेव्हनकडून शहीदांच्या कुटुंबीयांना मदत

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पुण्यात गॅरेजसमोरील २० ते २५ वाहने पेटली!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सुजय विखेंसह राज्यातील १६ उमेदवार जाहीर

9 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असून भाजपने पहिल्या यादीत राज्यातील १६ उमेदवार जाहीर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे डॉ. सुजय विखे पाटील यांना अपेक्षेप्रमाणे अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत...
                 

पाहा: मुंबईत 'पबजी'च्या राक्षसाचे झाले दहन!

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
बीडीडी, वरळी येथील श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 'पबजी' गेमरुपी राक्षसाची होळी उभारली होती. खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते या 'पबजी' गेमच्या राक्षसाच्या होळीचं दहन करण्यात आलं. पबजीच्या राक्षसाचं दहन करण्यासाठी अनोख्या पद्धतीने एका प्रतिकात्मक बंदुकीचा वापर करण्यात आला. वरळीतीलच वीर नेताजी क्रीडा मंडळाने होळीवर दहशतवादी मसूद अजहरचा पुतळा उभारला होता, त्याचंही दहन करण्यात आलं...
                 

लोकसभेसाठी नाशकात मनसेचे भुजबळांना ‘बळ’

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुका न लढण्याची घोषणा करताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात काम करण्याचा सल्ला मनसैनिकांना दिला आहे. त्यामुळे मनसैनिकाचा कल आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीकडे वळणार असल्याचे चित्र असून, नाशिक आणि दिंडोरीत मनसैनिक राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याचे चित्र आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच याला पुष्टी दिली..
                 

Ad

भारतात पुन्हा हल्ला झाल्यास पाकला महागात पडेल: US

17 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पाकिस्तानने देशातील दहशतवादी संघटनांविरोधात निर्णायक कारवाई करणे अत्यंत गरजेचे असून, भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानसमोर 'मोठ्या अडचणी' निर्माण होतील, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. देशात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कारवाई करतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे, असेही अधिकारी म्हणाला...
                 

क्राईस्टचर्च हल्ल्यात मला दोषी ठरवण्यासाठी माध्यमे रात्रंदिवस कार्यरत - डोनाल्ड ट्रम्प

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

Ad

मीही एक दिवस विराटसारखाच क्रिकेटर होईल - बटलर

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ क्रिकेट  
दिल्ली - क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा काढणाऱ्या विराट कोहलीचे जगभरात कौतुक होत आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्याची कामगिरी बहरत आहे. जगाला त्याच्या फलंदाजीने भुरळ घातली आहे. इंग्लंडचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरही विराटच्या फलंदाजीने अत्यंत प्रभावित झाला आहे. जोसच्या मते, विराट हा सर्वोत्तम खेळाडू आहे. तसेच एकदिवस मीही विराट कोहली सारखाच होईल असे त्याने सांगितले...
                 

Ad

सोशल प्रचार: आक्षेपार्ह मजकूर ३ तासांत काढणार

20 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Ad

फुगे फेकणाऱ्यांनो सावधान, धुळवडीसाठी पोलीस सज्ज

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आयुष्मानच्या 'बधाई हो'चा दाक्षिणात्य भाषांमध्ये होणार रिमेक, बोनी कपूरने घेतले हक्क

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ बॉलिवूड  
मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. अल्प बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. आता दिग्दर्शक बोनी कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाचा दाक्षिणात्य भाषेत रिमेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे...
                 

धोनीमुळे गोलंदाजांचे बरेचसे काम सोपे: यादव

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मर्सिडीजमध्ये सापडली दोन कोटींची रोकड

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

दहशतवादी मसूद अजझरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज वरळीत होणार दहन

yesterday  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

काँग्रेसच्या सहाव्या यादीत राज्यातील ७ उमेदवार; मुंबईत एकनाथ गायकवाडांना पुन्हा संधी

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

ओझर विमानतळावर पोलिसांची करडी नजर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सीएसएमटी पूल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करा - रवी राजा

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूलाच्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी स्वतः पोलिसांनी गुन्हा नोंदवून स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक केली आहे. इतक्यावर ही कारवाई न थांबता संबंधित स्ट्रक्चरल ऑडिटरची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी म्हणून या दुर्घटनेची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे...
                 

मुंबईचा केळी विक्रेता बनला पोलीस उपनिरीक्षक

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
मुंबई - तुमचे ध्येय ठरलेले असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचेचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश येडगे. ज्ञानेश यांनी धोबीतलाव येथील केळी विक्रेता ते पोलीस उपनिरीक्षक, असा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत राज्यात खुल्या प्रवर्गातून ज्ञानेशने १६१ वा क्रमांक पटकावला आहे...
                 

नाशिकमध्ये मोसंबीच्या बागांची होळी!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

प्रियांकांनी वाराणसीत दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा; राज ठाकरेंची टीका

2 days ago  
बातम्या / ईनाडू/ मुंबई  
                 

महाराष्ट्रातील आणखी एक 'राज'घराणं भाजपमध्ये

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
नगरमधील विखे-पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एका 'राज'घराण्यानं भारतीय जनता पक्षाशी घरोबा केला आहे. सोलापूरचे राष्ट्रवादीचे नाराज खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते-पाटलांच्या या निर्णयामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जागा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे...
                 

लोकसभा निवडणूक लढणार नाही: मायावती

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home