महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू Zee24Taas

आशिया चषक २०१८: आज पुन्हा रंगणार भारत-पाक सामना

दुबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेत दुसऱ्यांदा भिडणार आहे. भारत हा सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यापासुन धडा घेऊन विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या विचारात असेल. भारताने पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात आठ गडी राखून पराभव केला होता...
                 

ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेट स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नरचे जोरदार पुनरागमन

मेलबॉर्न - चेंडू कुरतडल्याप्रकरणी १ वर्षांची बंदी आलेल्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. २९ वर्षीय माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एनएसडब्ल्यू प्रिमियर लीग स्पर्धेत संदरलँडविरुद्ध ९२ चेंडूत ८५ धावा करत झोकात पुनरागमन केले आहे. शनिवारी ग्लेन मॅग्राथ ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात स्मिथने आपण अजूनही दादा फलंदाज असल्याचे दाखवून दिले...
                 

गैरवर्तवणुक केल्याप्रकरणी आयसीसीने ठोठावला 'या' खेळाडूंना दंड

अबुधाबी- शुक्रवारी झालेल्या आशिया कप २०१८ च्या सुपर फोरच्या फेरीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर विजय मिळविला. या सामन्यात गैरवर्तवणुक केल्याप्रकरणी अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाण आणि फिरकी गोलंदाज राशीद खान आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली या तिघांना १५ टक्के मॅच फीचा दंड ठोठावला आहे. तसेच त्याचबरोबर आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल १ चा भंग केल्यामुळे या तिघांनाही १ डिमिरीट पॉइंटही देण्यात आला आहे...
                 

विराटविना भारतीय फलंदाजी दुबळी- सौरभ गांगुली

हैदराबाद- भारताचा कर्णधार विराट कोहलीविना भारतीय संघाची फलंदाजी दुबळी असल्याचे मत माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. मधल्या फळी बाबत सौरभने चिंता व्यक्त करत म्हणाला, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू सारख्या फलंदाजांना संधी देण्याऐवजी लोकेश राहुल, ऋषभ पंत सारख्या फलंदाजांना संधी देणे गरजेचे आहे. लोकेश राहुलला संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे...
                 

महिला टी-२० : भारतीय महिलांची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात, जेमायमा रॉर्ड्रीग्जचे अर्धशतक

                 

राजकारण नको रे बाबा ! राजकीय प्रवेशावर द्रविडचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'

                 

सामना गमावल्यानंतर रडू कोसळलेल्या खेळाडूचे शोएब मलिकने केले सात्वंन

दुबई- पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने चांगलीच झुंज दिली. विजयासाठी पाकिस्तानच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. सामना हरल्यानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना अफताब आलमला रडू कोसळले. त्यानंतर शोएब मलिकने त्याच्याजवळ जात त्या खेळाडूचे सात्वंन केले. शोएबच्या या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे...
                 

शिखर धवनने साधली भारतीय दिग्गजांच्या 'या' विक्रमाशी बरोबरी

                 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या सराव सामन्याचे नेतृत्व करुण नायरकडे

हैदराबाद- वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड प्रेसिडेंट इलेवन संघाच्या कर्णधारपदी करुण नायरची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध बोर्ड प्रेसिडेंट इलेवन संघात २९ सप्टेंबरला सामना होणार आहे. हा सामना वडोदरा येथे खेळवला जाईल. यष्टीरक्षकाची जबाबदारी इशान किशनवर सोपविण्यात आली आहेत...
                 

पावसामुळे भारत-श्रीलंका दुसरा टी-२० सामना रद्द

                 

'या' देशात रंगणार पुढील वर्षी आयपीएलचे सामने

हैदराबाद- देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आयपीएल पुढील वर्षी देशाबाहेर आयोजित केली जाणार आहे. २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल देशाबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे सामने रंगणार आहेत. यापूर्वी निवडणुकांमुळे दोनदा आयपीएलचे आयोजन देशाबाहेर करण्यात आले होते...
                 

आशिया चषक २०१८ : बांगलादेशला तिसरा झटका, शकीब माघारी

दुबई- आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतो आहे. सामन्याला सुरुवात झाली असून भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. हार्दिकच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे. जडेजा एक वर्षानंतर संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मोमिनुल हक आणि अबू हैदर यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे...
                 

आशिया चषक; कितीही पाऊस आला तरी 'या' मैदानावर सामना राहतो सुरूच

                 

'धोनीच्या निर्णयाने बदलले माझे आयुष्य'

दुबई- आशिया चषकात गोलंदाजांच्या जीवावर पाकिस्तानला हरविण्यात भारतीय संघाला यश आले. त्यात विशेष कामगिरी केली होती ती फिरकी गोलंदाज केदार जाधवने. केदारने ९ षटकात २३ धावा देत तीन बळी टिपत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. ही त्याची आत्तापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली. आपल्या या चांगल्या कामगिरीचे श्रेय केदार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला देतो. धोनीच्याच निर्णयामुळे जीवन बदलल्याचे केदारने सांगितले...
                 

शहाबाज नदीमच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी

चेन्नई - विजय हजारे चषक स्पर्धेत भारताचा युवा गोलंदाज शहाबाज नदीमने एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आज चेन्नई येथे झालेल्या झारखंड विरुद्ध राजस्थान या सामन्यात शहाबाजने १० षटकात १० धावांच्या बदल्यात ८ विकेट पटकावलेत. शहाबाजची ही जादूई गोलंदाजी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे...
                 

VIDEO - तुम्ही पाहिलात का मनिष पांडेचा अफलातून झेल !

हैदराबाद - आशिया चषकात आज सुरू असलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला १६२ धावांत रोखले. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने ही कामगिरी केली. पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असताना एक अविस्मरणीय क्षण या सामन्यात घडला, तो म्हणजे मनिष पांडेने अविश्वसनीयरित्या सर्फराज अहमदचा सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल...
                 

आशिया चषक २०१८; पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पंड्याला दुखापत

                 

क्रिकेटपटू स्टोक्स अडचणीत; समलैंगिक जोडप्याला मारहाणप्रकरणी होणार शिक्षा?

लंडन - बेन स्टोक्स आणि अॅलेक्स हेल्स यांना गेल्यावर्षी क्लबच्या बाहेर मारहाण केल्याप्रकरणी इंग्लंड अॅण्ड व्हेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) शिक्षा सुनावणार आहे. ईसीबीने यावर बोलताना सांगितले, की दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटचा अपमान केला आहे. याप्रकरणी स्वतंत्र ३ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ आणि ७ डिसेंबरला यासंदर्भात सुनावणी होणार आहे...
                 

... जर फाळणी झाली नसती, तर 'या' संघाने केले असते जगावर राज्य

                 

'या' पाकिस्तानी खेळाडूचे मामा म्हणतात; भाच्याने शतक करावे, पण सामना भारताने जिंकावा

                 

वाचा, कोण आहे ? आशिया चषकातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा खलिल अहमद

                 

पाकला विजेतेपदाची सर्वाधिक संधी - मांजरेकर

                 

विजय हजारे चषक : युवराजचे क्रिकेटमध्ये पुनरागमन, पंजाब क्रिकेट संघात निवड

                 

आशिया चषक: अफगाणिस्तानकडून लंका दहन, श्रीलंका स्पर्धेतून बाहेर

                 

२०१९ विश्वचषक संघात धोनी की पंत; सेहवागने दिली 'या' खेळाडूला पसंती

हैदराबाद - २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय टीम निवडीसंदर्भात दिग्गजांकडून विविध मते व्यक्त केली जात आहेत. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. भारताचा तडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेदेखील आपले मत व्यक्त केले आहे. त्याने भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून अनुभवी महेंद्रसिंग धोनीला पसंदी दर्शवली आहे...
                 

खेलरत्न पुरस्कारासाठी विराट कोहली, मिराबाई चानू यांची शिफारस

                 

हाँगकाँगच्या कर्णधाराला भारत-पाक सामन्याची प्रतिक्षा, भारतीय संघाला दिला पाठिंबा

                 

आशिया चषक; बांग्लादेशची विजयी सलामी, लंकेचा १३७ धावांनी पराभव

                 

डेनीने घेतली स्टीव स्मिथची विकेट; स्टीव-डेनी विवाहबद्ध

                 

इंग्लड-भारत मालिकेतील दारूण पराभवानंतरही धोनीने केली संघाची पाठराखण

                 

Asia Cup 2018: आजपासून रंगणार आशिया चषकाचा थरार

                 

जेव्हा शोएब मलिक भेटतो धोनीला....

दुबई - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात होणारा क्रिकेटचा सामना क्रिकेटप्रेमींना आनंदाची पर्वणी देणारा असतो. सामन्यापूर्वी आणि नंतर दोन्ही संघात नेहमीच चर्चा, टीका, खुन्नस आजपर्यंत आपण मैदानावर पाहिले आहेत. तरीही दोन्ही खेळांडूमध्ये आजही तितकेच मैत्रीचे चांगले संबंध असल्याचे दुबईमध्ये दिसून आले. जेव्हा दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये सराव करत होते त्यावेळी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा धोनीशी हस्तांदोलनासह चर्चा करताना दिसून आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे...
                 

गौतम गंभीरच्या कपाळावर टिकली तर, डोक्यावर ओढणी, काय आहे प्रकरण?

                 

ड्रॉप आऊट मुरलीने ठोकले काऊंटीत दमदार शतक

नॉटिंघम - इंग्लंड दौऱयात सुमार कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर काढण्यात आलेल्या मुरली विजयने कांऊटी क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. विजय सध्या एसेक्स संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा मुरली विजय हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी पीयूष चावलाने २००९ मध्ये 'ससेक्स'कडून खेळताना शतक केले होते...
                 

...या कारणासाठी सोडले कर्णधारपद, धोनीचा खुलासा

                 

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

                 

ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर रिकी पॉन्टिंगची आगपाखड

हैदराबाद- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर आगपाखड केली आहे. पाकिस्तान विरूद्ध यूएईमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, यात त्याचा आवडता अष्टपैलू खेळाडू गेल्न मॅक्सवेलला संधी न दिल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे...
                 

'या' खेळाडूने एकही कसोटी न खेळता घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेविड मिलरने आतंराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. विशेष म्हणजे त्याने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल अशी त्याला आशा आहे...
                 

बारामतीतून घडणार उद्योन्मुख क्रिकेटपटू - बिरजू मांढरे

बारामती - उद्घाटनानंतर अनेक दिवस खेळण्यासाठी प्रतिक्षेत असलेला बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडियम सुरू झाला आहे. बारामती नगरपालिकेने स्टेडियमचे अनेक वर्षे रखडलेले काम पूर्ण केले आहे. सर्व सोयींयुक्त सुसज्ज असे स्टेडियम बनवले आहे. बारामतीसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम क्रिकेट प्रेमींसाठी खुले झाल्याने या स्टेडियममधून लवकरच उद्योन्मुख क्रिकेटपटू निर्माण होतील, असे नियोजन समिती अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी सांगितले...
                 

पाचव्या कसोटीत भारताचा दारूण पराभव, ऋषभ, राहुल यांची शतकी खेळी व्यर्थ

हैदराबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने ही मालिका ४-१ ने जिंकली. सलामीचा फलंदाज लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांची शतकी खेळी व्यर्थ ठरली. अॅलिस्टर कुकचा हा अंतिम सामना होता. इंग्लंडच्या संघाने हा सामना ११८ धावांनी जिंकून कुकला विजयी निरोप दिला...
                 

राहुलने मोडला द्रविडचा 'हा' विक्रम

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलने इंग्लंडविरूध्दच्या मालिकेत फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केली नाही. मात्र त्याने उत्तम क्षेत्ररक्षण करत एक विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. एका मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम त्याने केला आहे. माजी कर्णधार राहुल द्रविडचा एका मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम मागे टाकला आहे. लोकेशने या मालिकेत सर्वाधिक १४ झेल पकडण्याचा विक्रम केला आहे...
                 

पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, ३१ वर्षीय खेळाडू करणार कसोटीत पदार्पण

हैदराबाद - ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी अॅरॉन फिंचला संघात स्थान दिले आहे. फिंचचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे. त्याच्यासोबत पीटर सिडललाही संधी देण्यात आली आहे. सिडलने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा कसोटी सामना २०१६ मध्ये खेळला होता...
                 

द्रविडचा मोठा विक्रम मोडण्याचा 'गोल्डन चान्स' कोहलीने गमावला

                 

Ind vs Eng 5th test - चौथ्या दिवसअखेर भारत ३ बाद ५८

लंडन - इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीत सोमवारी चौथ्या दिवसअखेर ओव्हलच्या मैदानावर भारताने ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. धवन, पुजारा आणि कोहली झटपट बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी ४६४ धावांचे आव्हान ठेवले होते. आता एका दिवसाचा खेळ शिल्लक असून भारताला विजयासाठी ४०६ धावांची तर इंग्लंडला ७ बळींची गरज आहे...
                 

AUS A vs IND A : भारत मजबूत स्थितीत, श्रीकरचे शतक

बंगळुरू - ऑस्ट्रेलिया 'अ' आणि भारत 'अ' याच्यांत खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार ३४६ धावा केल्यानंतर प्रत्युतरादाखल मैदानात उतरलेल्या भारताने आतापर्यंत ९ विकेट गमावत ४८३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर १३७ धावांची आघाडीही मिळवली आहे. या मालिकेत भारत 'अ' संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे...
                 

भारताविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा जेम्स अँडरसन पहिलाच गोलंदाज

                 

गैरवर्तवणूक केल्यामुळे जेम्स अँडरसनवर आयसीसीची कठोर कारवाई

                 

स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा

दुबई- आशिया कपमध्ये भारताने बांगलादेशला पाणी पाजत ७ गडी राखून दमदार विजय मिळविला. या सामन्यात हिरो ठरला तो म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा. बांगलादेशचे चार गडी बाद करत सामनावीर म्हणूनही त्याला गौरवण्यात आले. गोलंदाजी करताना त्याचा पूर्वीसारखा जोश दिसत होता. त्याने केलेल्या चतुर गोलंदाजीमुळेच बांगलादेशी फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. आपल्या कामगिरीबाबत बोलताना रविंद्र जडेजाने आपल्याला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नसल्याचे प्रसारमाध्यामापुढे म्हटले आहे...
                 

विराट कोहलीआधी फक्त या २ क्रिकेटपटूंना भेटलाय राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी क्रीडा मंत्रालयाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. २५ सप्टेंबराला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत विराट कोहलीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विराट कोहलीसोबत भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनाही यावेळी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विराटआधी भारताच्या फक्त २ क्रिकेटपटूंना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून ओळखला जातो...
                 

आशिया चषक : भारताच्या जावयाने वाचवली पाकिस्तानची लाज

अबुधाबी - आशिया चषकात सुपर-४ फेरीत शुक्रवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ विकेट राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने कडवी झुंज देत पाकिस्तानसमोर ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हशमतुल्लाह शाहिदी (९७) आणि कर्णधार असघर अफघाण (६७) यांच्या अर्धशतकाच्या बळावर अफगाणिस्तानला पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. २५८ धावांचा पाठलाग करताना पाकला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. पाकचा माजी कर्णधार शोएब मलिकने टिच्चून फलंदाजी करत पाकिस्तानला पराभवापासून वाचवले...
                 

ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघासाठी सोपा नाही - रिकी पॉन्टिंग

नवी दिल्ली - भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱयात संघर्ष करत असताना दिसला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळेच कसोटी मालिकेत भारताला ४-१ असा पराभव स्विकारावा लागला. डिसेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौरा करत आहे. मात्र, हा दौरा भारतीय संघासाठी सोपा नसेल असे मत माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले आहे...
                 

आशिया चषक २०१८: लढवय्या अफगाणिस्तानचे पाकिस्तानसमोर २५७ धावांचे लक्ष्य

अबुधाबी - आशिया चषकाच्या सुपर-४ च्या सामन्यात आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची लढत चालू आहे. या लढतीत अफगाणिस्तानने कडवी झुंज देत पाकिस्तानसमोर ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हशमतुल्लाह शाहिदी ( ९७ ) आणि कर्णधार असघर अफघाण ( ६७ ) यांच्या अर्धशतकाच्या बळावर अफगाणिस्तानने आव्हानात्मक धावसंख्या उभारली...
                 

उलटफेर करण्यात बांगलादेश पुढे, भारत-बांगलादेशमधील काही विवादीत क्षण

                 

'असा' पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू

हैदराबाद - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक खेळासाठी जगभरात ओळखला जातो. त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३ द्विशतके आहेत. आशिया चषकात बुधवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची शानदार खेळी केली. रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकुण २९४ सामन्यांमध्ये २९४ षटकार जमा आहेत...
                 

भारत-पाक सामन्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'वर 'गणपती बाप्पा'चा जयजयकार पडला भारी

दुबई - आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक या कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये बुधवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. या हायहोल्टेज सामन्यात आपापल्या संघाला समर्थन देण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्येही जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. पाकिस्तान संघाचे चाहते 'पाकिस्तान जिंदाबाद' असा नारा देत होते तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय चाहत्यांनी 'गणपती बाप्पा मोरया'चा जयजयकार करत संपूर्ण मैदान दणाणून सोडले होते...
                 

आशिया चषक २०१८: पाकिस्तानसमोर आज अफगाणिस्तानचे आव्हान

                 

आशिया चषक : अफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय, राशिद ठरला विजयाचा शिल्पकार

दुबई - बर्थ डे बॉय राशिद खानने केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे अफगाणिस्तानने बांगलादेशवर १३६ धावांनी मोठा विजय मिळवला. शेख जायेद मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५५ अशी मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४२.१ षटकात सर्वबाद ११९ धावा करू शकला. राशिदने अखेरच्या षटकांमध्ये ३२ चेंडूंत नाबाद ५७ धावांची खेळी केली. त्यासोबतच ९ षटकांमध्ये १३ धावा देत २ बळीही घेतले...
                 

पाकिस्तानी खेळाडूच्या बुटांची लेस जेव्हा भारतीय खेळाडू बांधतो, चहलचे कौतुक

दुबई - भारताने पाकिस्तानवर आशिया चषकात आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. भारतीय संघाने विजयासह क्रीडारसिकांची मने जिंकली. त्यासोबतच भारताचा युवा गोलंदाज युझवेंद्र चहलने देखील नेटकऱ्यांची मने जिंकून घेतली. युझवेंद्र चहलने उस्मान खानला केलेल्या मदतीवर नेटकरी फिदा झाले आहेत. यातून युझवेंद्रची खिलाडूवृत्ती कौतुकास्पद ठरली...
                 

हार्दिक पंड्यासह दोन खेळाडू आशियाचषकामधून बाहेर

हैदराबाद - भारतीय संघाला आशिया चषका सारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेत जोरदार झटका बसला आहे.भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. हार्दिक पंड्यानंतर दोन खेळाडू दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडले आहेत. शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांना दुखापतीने घेरले आहे. त्या तिघांच्या जागी पर्याय म्हणून दीपक चाहर, रवींद्र जडेजा, सिद्धार्थ कौल यांची निवड करण्यात आली आहे...
                 

धोनी शुन्यावर बाद झाल्याने संतापला छोटा चाहता, पाहा व्हिडिओ

                 

भारत-पाक सामन्यात मैदानात दिसले शरद पवार; आता विजय नक्की

दुबई - आशिया चषकामध्ये आज पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना सुरू आहे. या 'हायव्होल्टेज' सामन्याकडे दोन्ही देशांच्या चाहत्यांचे लक्ष लागुण आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयचे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार मैदानात आल्याने सोशल मीडियावर भलत्याच चर्चांना उधान आले आहे...
                 

भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजांचे लक्ष

                 

याच दिवशी युवराजने ठोकले सलग ६ षटकार, अशी होती 'त्या'मागची कहाणी

सोशल मिडिया डेस्क - आपल्या फलंदाजीने अनेक गोलंदाजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या युवराजने आजपासून बरोबर ११ वर्षांपूर्वी इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग ६ गगनचुंबी षटकार ठोकले होते. या सामन्यात इंग्लंडचा अष्टलपैलू अॅण्ड्रु फ्लिंटॉफने घेतलेल्या पंग्याचे बिल स्टुअर्ड ब्रॉडच्या नावावर फाडले होते. तसेच, टि-२० क्रिकेट विश्वातले सर्वात जलद अर्धशतक अवघ्या १२ चेंडूत ठोकण्याचा पराक्रमही युवराजने याच खेळीदरम्यान केला होता...
                 

आशिया चषक २०१८: भारताने उडवला पाकचा धुव्वा, आठ गडी राखून मिळवला विजय

दुबई - आशिया चषकात आज झालेल्या भारत-पाक यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यात भारताने आठ गडी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांनी १६२ धावांवर रोखले. हे आव्हान भारताने ८ गडी आणि १२६ चेंडू राखून सहज पार केले. गोलंदाज आणि फलंदाज यांच्या सामूहिक कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला...
                 

आशिया चषक २०१८ : गब्बरची शतकी खेळी, हाँगकाँगपुढे २८६ धावांचे आव्हान

दुबई - भारतीय संघ आशिया चषकामध्ये आज कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळतो आहे. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून शिखर धवन आणि अंबाती रायडूने दमदार फलंदाजी केली. मात्र, यानंतर आलेल्या अन्य फलंदाजांनी झटपट तंबूची वाट धरली. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही...
                 

Bigg Boss १२: घरात प्रवेश करताच श्रीसंतला करावा लागला 'या' अडचणींचा सामना

                 

किकेटच्या देवाने घेतले पत्नीसह लालबागच्या राजाचे दर्शन

                 

अशिया चषक - पहिला पेपर सोपा; नजरा मात्र पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यावर...

दुबई - भारताला इंग्लड दौऱयामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. या कारणाने भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या अशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना हाँगकाँगसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यापेक्षा पाकिस्तानसोबत होणाऱया सामन्यावर विश्वातील तमाम क्रिकेट रसिकांची नजर असणार आहे...
                 

अशिया चषक २०१८ Live - श्रीलंकेसमोर अफगाणिस्तानचे २५० धावांचे लक्ष

                 

आशिया कप २०१८: अफगाणिस्तान समोर आज श्रीलंकेचे आव्हान

                 

पाकिस्तानचा हाँगकाँगवर ८ गडी राखून दणदणीत विजय

हैदराबाद - दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दुबळ्या हाँगकाँगवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हाँगकाँगने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हाँगकाँगचा डाव केवळ ११६ धावातच संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ८ गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला...
                 

भारत-पाक संबंध सुधारल्यावरच दोन्ही देशात क्रिकेटचे सामने व्हावे- गंभीर

                 

भारत आशिया चषक जिंकू शकतो - सौरव गांगुली

कोलकाता- इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा ४-१ ने दारुण पराभव झाला. आशिया कप स्पर्धेत कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने त्याची कमतरता जाणवेल. तरीही भारतीय संघ आशिया चषकात चांगली कामगिरी करेल. भारत हाच विजयाचा प्रमुख दावेदार आहे, असा विश्वास भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे...
                 

आशिया कपमध्ये भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी भारत 'अ' संघाचे ५ गोलंदाज दुबईला रवाना

हैदराबाद - बीसीसीआयने आशिया कपमध्ये भारतीय फलंदाजांना सराव करता यावा, यासाठी भारत 'अ' संघाच्या ५ गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातला (युएई) पाठवले आहे. यामध्ये मध्य प्रदेशचा अवेश खान, पंजाबचा सिद्धार्थ कौल, कर्नाटकचा प्रसिद्ध कृष्णा याबरोबरच डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम आणि लेग स्पिनर मयंक मार्केंडेचा समावेश करण्यात आला आहे...
                 

स्टेन गनचे दोन वर्षानंतर संघात पुनरागमन; फॉफ डु प्लेसिस फिट

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका आणि झिंम्बाब्वे यांच्यात या महिन्याच्या अखेरीस एकदिवसीय मालिकेस सुरुवात होणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये दोन वर्षांनंतर आफ्रिकेचा ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पुनरागम केले आहे. स्टेनने त्याचा शेवटचा सामना २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता...
                 

आशिया चषकापूर्वी श्रीलंकेला झटका; दानुष्का गुणाथिलका दुखापतग्रस्त

                 

भारताची फळी भक्कम मात्र कोहलीची उणीव भासेल - इमाल-उल-हक

                 

रोमांचकारी सामन्यात भारत विजयी, मालिकेवर कब्जा

गॉल - तानिया भाटिया आणि मिताली राज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाचा ७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. रोमांचकारी सामन्यात भारताने ५० षटकात सर्वबाद २१९ धावा केल्या होत्या. दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा पूर्ण संघ ४८.१ षटकात २१२ धावावर सर्वबाद झाले...
                 

टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॉल कॉलिंगवूडचा क्रिकेटला अलविदा

लंडन- इंग्लंड संघाचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. गुरुवारी त्याने निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. आपल्या नेतृत्वाखाली त्याने इंग्लंडला पहिल्यांदा २०१० मध्ये वेस्टइंडिज येथे झालेला विश्वकप जिंकून दिला. नुकतेच इंग्लंडचा सलामीचा फलंदाज अॅलिस्टर कुक याने निवृत्ती स्वीकारली आहे...
                 

मुंबई संघाच्या नेतृत्वाची धुरा अंजिक्य रहाणेकडे

                 

पराभवानंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

ओव्हल - भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारताचा दारुण पराभव करत ५ सामन्यांची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. तिसरी कसोटी सोडली तर प्रत्येक सामन्यात इंग्लंडने भारतावर वर्चस्व गाजवले होते. मालिकेनंतर आयसीसीने जागतिक कसोटी क्रमवारी घोषित केली. भारतीय क्रिकेटचा संघ पराभवनंतरही अव्वल स्थानी कायम राहिला आहे. मालिका जिंकून इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे...
                 

'या' संघासोबत वनडे क्रिकेट खेळणार अर्जुन तेंडूलकर

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. अर्जुन तेंडूलकर डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची निवड ६ व्या अखिल भारतीय जे वाई लेले इन्विटेशनल एकदिवसीय मालिकेसाठी झाली आहे. १६ सप्टेंबरपासून या मालिकेला वडोदरा येथून सुरुवात होणार आहे. या संघाच्या नेतृत्वाची धुरा सुवेद पाकर याच्याकडे सोपविण्यात आली आहे...
                 

सचिन तेंडुलकरचा 'चार्मिं'ग गर्लसोबत रोमान्स, श्री रेड्डीची स्फोटक पोस्ट

मुंबई - काही दिवसांपूर्वी तेलुगु अभिनेत्री श्री रेड्डीची बरीच चर्चा झाली. तिने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या प्रतिष्ठित लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हैदराबाद येथील तेलुगु फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स समोर तिने टॉपलेस प्रदर्शन केले होते. आता तिने चक्क सचिन तेंडूलकरवर वादग्रस्त पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे...
                 

भारत पराभवाच्या छायेत, रिषभ, राहुल झाले बाद

हैदराबाद- भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरू असलेला पाचवा अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. सलामीचा फलंदाज लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याने दमदार शतकी खेळी केली आहे. लोकेश १४९ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदच्या सुरेख लेगस्पिन चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला तर ऋषभ ने ११३ धावावर बाद झाला...