महाराष्ट्रा टाइम्स Zee24Taas

भारताने मालिकाविजयाची संधी दवडली

                 

मला नको, प्रशिक्षकांना पुरस्कार द्या: पंघल

                 

मी धन्य झालो!: राहुल आवारेची भावनिक प्रतिक्रिया

जागतिक कुस्तीत महाराष्ट्राच्या एका मराठमोळ्या कुस्तीगीराने प्रथमच पदक जिंकल्यामुळे मी धन्य झालो आहे. जेव्हा मी ब्राँझपदकाची झुंज जिंकलो तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपण देशाचे, महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केल्याचा आनंदच काही और होता. आता ऑलिम्पिक पदकही दूर नाही, याची खात्री मला वाटू लागली आहे. अर्थात, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, अशा शब्दांत जागतिक कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात ब्राँझपदक जिंकणाऱ्या राहुल आवारेने आपली प्रतिक्रिया 'मटा'शी बोलताना व्यक्त केली...
                 

युवीमुळे सप्टेंबर खास

                 

अवघ्या सहा मिनिटांत ‘खेळ खल्लास’; सुशीलकुमारचा पहिल्याच फेरीत पराभव

                 

रोहित शर्मा, धोनीमुळं विराट यशस्वी कर्णधार: गंभीर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विक्रमांना गवसणी घालत आहे. कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरत आहे. विराटच्या या यशामागील रहस्य माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरनं उलगडून सांगितलं आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीच्या रुपात संघात दोन कर्णधार आहेत. नेतृत्व करताना या दोघांचीही मदत विराटला मिळते, असं गंभीर म्हणाला...
                 

प्रशिक्षकाचा सल्ला नव्हे, स्वतःच्या हुशारीने जिंकले: विनेश

                 

प्रो-कबड्डी: बंगालचा हरयाणावर पहिला विजय

प्रो-कबड्डी लीगमधील हरयाणा स्टिलर्सविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करण्यात अखेर बंगाल वॉरियर्सला यश आले. गुरुवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात झालेल्या लढतीत बंगालने हरयाणाचे आव्हान ४८-३६ असे परतवून लावले. या लीगमधील बंगालचा हा हरयाणावरील पहिलावहिला विजय ठरला. या आधीच्या तिन्ही सामन्यांत हरयाणाने बंगालला पराभूत केले होते...
                 

साईना नेहवाल पराभूत; सिंधूची विजयी सलामी

                 

पाहा: 'सुपरमॅन' कोहलीने टिपला अफलातून झेल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावरची चपळाई नेहमीच लक्ष्यवेधी ठरते. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराटने तर कमालच केली. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराटने पाहुण्या संघाचा कर्णधार क्विंटन डी कॉकचा अफलातून झेल टिपला. अर्धशतक झळकावून खेळत असलेल्या डी कॉकला विराटच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे माघारी जावे लागले...
                 

वर्ल्ड बॉक्सिंग: अमितसह ४ खेळाडू क्वार्टर फायनलमध्ये

रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करण्याची शक्यता आहे. अमित पानघळ, संजीत, कविंदर सिंग आणि मनिष कौशिक हे चार भारतीय बॉक्सर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले आहेत. या चारही खेळाडूंनी हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यात किमान ब्राँझ पदक तरी जमा होणार आहे...
                 

सौरव गांगुलीचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला

सर्वच संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली मालिकाही त्याच तयारीचा भाग असल्याचं मानलं जात आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा विचार आतापासूनच सुरू आहे. त्यादृष्टीनं टीम इंडिया सध्या युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देत आहे. मात्र, माजी कर्णधार सौरव गांगुलीचं मत काहीसं वेगळं आहे...
                 

जागतिक कुस्ती स्पर्धा: विनेश पराभूत; पण पदकाची आशा जिवंत

भारताची आघाडीची महिला कुस्तीगीर विनेश फोगटचे जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी ब्राँझपदक जिंकण्याच्या आशा मात्र अजून कायम आहेत. ५३ किलो वजनी गटात तिला जपानच्या मायू मुकैदाने पराभूत केले. पण मुकैदा नंतर अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रिपिचेजद्वारे विनेशच्या पदक जिंकण्याच्या आशा जिवंत राहिल्या...
                 

'मॅच फिक्सिंग कायदा, सट्टेबाजी वैध करा'

                 

गुणवत्ता आहे; पण हवेत चांगले मार्गदर्शक: गोपीचंद

                 

जेतेपदाने आत्मविश्वास उंचावला: कौशल धर्मामेर

                 

आशिया कपचा विजयी शिल्पकार अथर्वचे जंगी स्वागत

१९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशला नमवत विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात बेस्टच्या महिला वाहक वैदेही अंकोलेकर यांचा मुलगा आणि डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरचा सिंहाचा वाटा राहिला. अथर्वने चमकदार कामगिरी करत पाच बळी मिळवले. अंतिम फेरीत सामन्याचा मानकरी ठरलेल्या अथर्वचे रविवारी जोरदार स्वागत झाले...
                 

अमित पंघलची विजयी सलामी

आशियाई विजेता अमित पंघलने (५२ किलो) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात यशाने केली. त्याने तैपेईच्या तु पो वै याच्यावर मात करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत दुसरा मानांकित असलेल्या २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्धी वै याच्यावर ५-० अशी सरळ मात केली. या विजयामुळे अमितने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत त्याला पुढची चाल मिळाली होती...
                 

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा:सौरभ वर्माला जेतेपद

                 

जागतिक कुस्ती स्पर्धा : ग्रीको रोमनमध्ये चार मल्लांची हार

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या ग्रीको रोमन गटातील मोहिमेला पहिल्याच फेरीत धक्का बसला. ग्रीको-रोमन प्रकारात शनिवारी भारताचे चारही कुस्तीगीर एकही फेरी न जिंकताच पराभूत झाले. ग्रीको रोमन प्रकारातील ऑलिम्पिक वजनी गटात नसलेल्या गटात भारतीय खेळाडू खेळत होते. त्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता हरप्रीतसिंग (८२ किलो), सागर (६३ किलो), मनजीत (५५किलो) यांना तर एकही गुण मिळविता आला नाही. केवळ ७२ किलो वजनी गटात योगेशने अमेरिकेचा प्रतिस्पर्धी रेमंड अँथनी बंकरला चांगली झुंज दिली आणि ५-६ अशा फरकाने तो पराभूत झाला...
                 

धोनीच्या निवृत्तीची चर्चा; काय म्हणाला विराट?

                 

बुमराहच्या कसोटीतील यशाचे रहस्य

१)पदार्पण झाल्यानंतर कसोटीत अधिकाधिक संधी मिळत गेली. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळून आत्मविश्वास लाभला; कारण तिथे मला डावपेचांची अचूक अंमलबजावणी करता आली. रणजी क्रिकेटमध्ये ठसा उमटवल्यानंतर संधी मिळाल्यास कसोटीतही यश मिळवू, असा विश्वास मला वाटत होता. त्यामुळे आता मायदेशात कसोटी क्रिकेट खेळतानाही कधीच दडपण येत नाही...
                 

कसोटी संघः राहुलला डच्चू; शुभमनला संधी

                 

कसोटीत 'हिटमॅन' रोहित शर्मा सलामीला येणार?

                 

नदाल १९

                 

सॉरी!...दिनेश कार्तिकनं मागितली BCCIची माफी

                 

देशासाठी 'सुवर्ण' जिंकायचं होतं, पण..: पुनिया

पायाला झालेल्या दुखापतीतून न सावरल्यानं पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं. पण दुर्दैवानं हे घडणार नाही. दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही, असं दीपकनं 'टाइम्स ऑफ इंडिया. कॉम'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं...
                 

क्रिकेटपटूंची दिवाळी; दैनिक भत्त्यात घसघशीत वाढ

                 

प्रो कबड्डी: पुणेरी पलटणचा सहावा विजय

                 

धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय: सुनील गावसकर

                 

पक्षपातामुळे बजरंगचा भ्रमनिरास

जागतिक कुस्तीच्या रँकिंगमध्ये अव्वल असलेला भारताचा भरवशाचा मल्ल बजरंग पुनियाचा गुरुवारी भ्रमनिरास झाला. त्याला लाभलेला सोपा ड्रॉपाहून गेल्यावेळी रौप्यपदक पटकावणाऱ्या बजरंगसाठी जगज्जेतेपद (सुवर्णपदक) म्हणजे फक्त औपचारिकतेपुरते उरले आहे, असे अंदाज होता; पण जागतिक स्पर्धेत वादग्रस्त ठरलेल्या ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानचा कुस्तीगीर दौलत नियाझबेकोव्हने बजरंगवर सरशी साधली...
                 

शाहिद आफ्रिदी विराटला म्हणतो, 'आप शानदार'

                 

प्रो कबड्डी: ‘यू मुम्बा’ने ‘यूपी’ला रोखले

                 

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला कांस्य पदक

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. विनेशने रेपेचेज मुकाबल्यात ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीला पराभूत करून ५३ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. या विजयाबरोबरच २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे...
                 

टी-२०: रिषभ पंतवर 'सरस' कामगिरीचा दबाव

भारत-द. आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर आज, मोहालीत दुसरा सामना होत आहे. मालिकेत आघाडी मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. वेस्ट इंडीज दौऱ्यात अपयशी ठरलेल्या रिषभ पंतवर सगळ्यांच्या नजरा असतील. अन्य युवा खेळाडूंपेक्षा वरचढ कामगिरी करून त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे...
                 

जागतिक बॉक्सिंग: अमीत, मनीष उपांत्यपूर्व फेरीत

एशियन चॅम्पियन अमित पंघल (५२ किलो), मनीष कौशिक (६३ किलो) आणि संजीत यांनी (९१ किलो) आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमितला जागतिक स्पर्धेतील दुसरे पदक मिळविण्याची संधी आहे. मनीष आणि संजीतची ही पदार्पणाची स्पर्धा आहे. हे तिन्ही बॉक्सर सैन्यदलातील आहेत...
                 

चीन ओपन स्पर्धेत सात्त्विक-अश्विनीचा सनसनाटी विजय

                 

श्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला!

                 

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा: दुर्योधनसिंग नेगीचा पराभव

                 

चीन स्पर्धेत सिंधूला कठीण ‘पेपर’

गेल्याच महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेली वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकून जगज्जेती होण्याचा मान संपादल्यानंतर सिंधू आपले वर्चस्व राखण्यासाठी सिद्ध झाली आहे. यावेळी ती चीन ओपन वर्ल्ड टूर सुपर १००० गुणांच्या स्पर्धेत भाग घेत असून या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेत महिला एकेरीत सिंधूसह सायना नेहवालही भाग घेते आहे. मात्र, जगज्जेत्या सिंधूला या स्पर्धेत सर्वात आव्हानात्मक 'ड्रॉ' मिळाला आहे...
                 

टी-२० वर्ल्डकपसाठी विराट कोहलीचा 'हा' प्लान

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. संघातील युवा खेळाडूंना चार ते पाच संधीतूनच स्वतःला सिद्ध करावं लागेल, असं त्यानं स्पष्ट केलं. यावेळी त्यानं स्वतःचं उदाहरण दिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी सुद्धा जास्त संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली नव्हती, असं त्यानं सांगितलं...
                 

ग्रिको-रोमनमधील अपयश सुरूच

को-रोमन या कुस्ती प्रकारांत भारतीय मल्लांचे अपयश नवे नाही. यंदा कझाकिस्तानच्या नूर-सुल्तान येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येदेखील सलग दुसऱ्या दिवशी भारताच्या मल्लांनी ग्रिको-रोमनमध्ये सपशेल शरणागती पत्करली. ९७ किलो वजनी गटात आर रवी यांनी पहिल्या फेरीची लढत जिंकली. हेच काय ते भारताचे यश. बाकी मनीष एम (६७ किलो) आणि सुनीलकुमार (८७ किलो) यांना तर एकही गुण पटकावता आला नाही...
                 

धरमशालात पावसाचा खेळ; पहिला टी-२० सामना रद्द

                 

U-19 आशिया कपः भारताची जेतेपदाला गवसणी

                 

द. अफ्रिका कसोटी: रोहित करणार डावाची सुरुवात?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अंतिम संघातून लोकेश राहुलला वगळण्यात आल्यानं सलामीला कोण येणार हा प्रश्न आता टीम इंडियाला सतावतो आहे. ही जबाबदारी भारताचा स्टार फलंदाज व वन-डे क्रिकेटमधील सलामीवीर रोहित शर्मा याच्यावरच सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे...
                 

अरेरे! इतिहास रचूनही हरली ख्रिस गेलची टीम

सेंट किट्स येथील वॉर्नर पार्कवर मंगळवारी दोन वेळा इतिहास रचला गेला! ख्रिस गेलने आपलं २२ वं टी २० शतक केलं आणि वॉल्टनच्या ७३ धावांच्या जोरावर जमैकाने विक्रमी २४१ धावा केल्या. दोघांनी १५ षटकार लगावले. जमैकाने त्या बळावर २० षटकांत चार गडी गमावत २४१ धावा केल्या. कॅरेबियन प्रिमीअर लीगची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र इतकी मोठी धावसंख्या उभारूनही सेंट किट्स अँड नेवीस पॅट्रिएट्सने जमैकाचा पराभव केला...
                 

'भारताच्या धमकीमुळे लंकेच्या खेळाडूंचा पाक दौरा रद्द'

श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंनी सरक्षेच्या कारणावरून आपला पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानानने याचे खापर भारताच्या माथ्यावर मारले आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावल्याचा थेट आरोपही पाकिस्ताना सरकारचे मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएल करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिल्याचे वक्तव्य फवाद हुसैन यांनी केले आहे...
                 

सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात कोळी सज्ज

अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियातील जवळपास सगळे प्रमुख समुद्र आणि सामुद्रधुनी पोहून जाणाऱ्या २० वर्षीय प्रभात कोळीच्या या कामगिरीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली. त्याला राष्ट्रीय क्रीडादिनी तेन्झिंग नॉर्गे हा साहसी खेळासाठी दिला जाणारा पुरस्कार देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आता अमेरिकेच्या मॅरेथॉन स्वीमिंग फेडरेशनने निश्चित केलेल्या सात आव्हानात्मक समुद्रातील सातवा समुद्र ओलांडण्यासाठी प्रभात सज्ज आहे...
                 

Ad

टी-२०: भारताला वेध मालिकाविजयाचे

                 

Ad

चीन ओपन: साईप्रणीतचा पराभव; भारताचे ‘पॅकअप’

                 

Ad

मिराबाईचा राष्ट्रीय विक्रम; ब्राँझपदक मात्र हुकले

                 

Ad

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जगज्जेत्या सिंधूचे 'पॅकअप'

                 

जागतिक बॉक्सिंगमध्ये दोन पदके निश्चित

भारताच्या अमित पंघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून किमान ब्राँझपदक निश्चित केले आहे. दोन्ही बॉक्सरचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरेल. एशियाड आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या सीडेड अमितने ५२ किलो गटात फिलिपिन्सच्या कार्लो पालमवर ४-१ अशी मात केली...
                 

दुसरा टी-२०: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 'विराट' विजय

                 

४० धावांत ९ बळी; अॅबॉटने केली कमाल

                 

टी-२०: खास विक्रमासाठी धवनला हव्यात फक्त ४४ धावा

                 

मीराबाईचे ऑलिम्पिक लक्ष्य

जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेद्वारे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य माजी विजेत्या भारताच्या मीराबाई चानूचे असणार आहे. २०१७च्या जागतिक स्पर्धेत मीराबाईने ४८ किलो गटातून सुवर्णपदक मिळवले होते. तिच्याकडून पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा आहे...
                 

पाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही!

                 

स्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी व्यक्त केले आहे. आपण कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांची तुलना करू इच्छित नाही, स्टीव्हचे विक्रमच त्याच्याविषयी बोलतात अशा शब्दात आपले मत व्यक्त करत गांगुलीने या दोन क्रिकेटपटूंची तुलना करणे टाळले. गांगुली प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता...
                 

तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये 'मॅच-फिक्सिंग'?

काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये 'स्पॉट-फिक्सिंग'च्या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. आता तमिळनाडूतील प्रीमियर लीगमध्येही 'मॅच-फिक्सिंग' झाल्याच्या संशयावरून वादळ उठले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी विभागाने याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. प्रथम श्रेणीमधील काही क्रिकेटपटू व दोन प्रशिक्षक या 'मॅच-फिक्सिंग'मध्ये गुंतले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...
                 

प्रो-कबड्डी लीग: ‘यूपी योद्धा’ची पाचव्या स्थानी झेप

                 

...तर परिणाम भोगशील; शास्त्रींचा पंतला इशारा

वेस्ट इंडीज दौऱ्यावर केलेल्या चुकांमध्ये सुधारणा झाली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतचं थेट नाव न घेता दिला. या युवा विकेटकीपर-फलंदाजानं वेस्ट इंडीज दौऱ्यावर सगळ्यांनाच निराश केलं. एका वनडे सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, असं सांगत शास्त्रींनी पंतच्या निराशाजनक कामगिरीवर बोट ठेवलं...
                 

झुंजार कविंदरची आगेकूच

आशियाई स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या कविंदरसिंग बिश्टने (५७ किलो) वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेच्या लढतीत त्याने झुंजार खेळ करत चीनच्या चेना झिहाओवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. पाचव्या सीडेड कविंदरने चेनाचा कडवा प्रतिकार मोडून काढला...
                 

धरमशाला: पहिल्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना आज धरमशाला येथील स्टेडियमवर होत असून या सामन्यावर पावसाचे सावट आहे. धरमशालात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम असून आज दुपारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामन्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे...
                 

रोहितने माझी झोप उडवली होती: गंभीर

                 

छे, धोनी निवृत्त होणार नाहीयेः एमएसके प्रसाद

                 

खेळाडूंमधील मतभिन्नता म्हणजे मतभेद नाही: शास्त्री

                 

'या' गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार: रवी शास्त्री

                 

बियांका आंद्रेस्कू: नवी तारका!

                 

'स्मिथ हा कायम 'चीटर' म्हणूनच ओळखला जाईल'