महाराष्ट्रा टाइम्स Zee24Taas

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या पहिल्यांदाच २ लाखांवर

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २ लाखांच्या पार गेली आहे. ओपन डूअर्सच्या अहवालानुसार सध्या २ लाख २ हजार १४ भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षण विनिमय या अहवालातून ओपन डूअर्सने याबाबत माहिती दिली. अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याचं हे सलग सहावं वर्ष आहे...
                 

                 

श्रीलंकेत राजपक्षे यांचे पारडे जड

                 

ब्रिक्स: मोदींनी दिला व्यापार सहकार्याच्या मुद्द्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिक्स परिषदेत भाषण करताना व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर आणि अधिक सहकार्य वाढवण्याच्या विषयावर जोर दिला. याव्यतिरिक्त दहशतवादाविरोधात सुरक्षा सहकार्य वाढवण्याचं महत्त्व देखील मोदींनी अधोरेखित केलं. ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये ११ व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे...
                 

जगातली सर्वात महाग घड्याळ, किंमत तब्बल...

जगातील सर्वात महागड्या घड्याळीची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या घड्याळीची किंमत तब्बल २२२ कोटी रुपये आहे. स्वित्झर्लंडमधील लक्झरी वॉच निर्माता कंपनी Patek Philippe ने नुकताच एका घड्याळीचा लिलाव केला. ही घडी ३१ मिलियन स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास २२२ कोटी रुपयांना विकली गेली. जगात आतापर्यंत रिस्टवॉचसाठी (मनगटी घड्याळ) दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. दरम्यान, हा लिलाव चॅरिटीसाठी करण्यात आला होता. नंतर सर्व रक्कम दान करण्यात आली...
                 

भारताशी व्यापार बंद, पाक स्वतःच अडचणीत

भारताशी व्यापार करण्यावर बंदी घालणं पाकिस्तानला आता चांगलंच महागात पडत आहे. पाकिस्तान सरकारने जम्मू काश्मीरविषयी आग ओकत घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानची सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण, भारताकडून स्वस्तात कापूस खरेदी पाकिस्तानने स्वतःहून बंद केली. याशिवाय पाकिस्तानमध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे...
                 

ऑस्ट्रेलियातील वणव्यात तीन जण मृत्युमुखी

                 

मला भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करीन: नीरव मोदी

                 

भारतीय विमान संकटात; पाकने केली मदत

अचानक खराब वातावरणात विजांच्या कडकडाटात हे विमान सापडलं आणि धोका निर्माण झाला. वैमानिकाने तातडीने जवळच्या हवाई वाहतूक नियंत्रकांना अलर्ट जारी केला. विमान धोक्यात आहे हे पाहताच पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने सक्रिय होत विमानाला धोक्यातून बाहेर आणलं. विजांच्या कडकडाटात सापडलेलं हे विमान अचानक ३६ हजार फुटांहून ३४ हजार फुटांवर आलं. वातावरण एवढं खराब होतं, की पाकिस्तानमध्ये वीज पडून त्या दिवशी २० जणांचा मृत्यू झाला...
                 

भारत, चीनचा कचरा तरंगत लॉस एंजेलिसपर्यंत: ट्रम्प

औद्योगिक कचऱ्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियावर हल्लाबोल केला आहे. 'चीन, भारत आणि रशियासारखे देश आपल्या औद्योगिक प्लान्टमध्ये तयार होणाऱ्या रासायनिक कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेवर काम करत नाहीत आणि जो कचरा समुद्रात फेकतात तो तरंगत लॉस एंजेलिसपर्यंत येतो,' असं वादग्रस्त विधान ट्रम्प यांनी केलं आहे...
                 

भारतीयांना प्रदूषणामुळे हृदयविकाराचा धोका

                 

‘बुलबुल’मुळे १८ लाख लोकांचे स्थलांतर

                 

भाजपला लाभ मिळणार?

                 

कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीप, McDonald च्या CEO ची हकालपट्टी

मॅकडोनाल्डने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत स्टीव्ह ईस्टरब्रुक हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं उघड झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्टीव्ह यांचं कृत्य कंपनीच्या धोरणांच्या विरोधात असल्यामुळे ही कारवाई करत असल्याचं कंपनीच्या मंडळाने सांगितलं. ५२ वर्षीय स्टीव्ह २०१५ पासून सीईओ म्हणून काम करत होते...
                 

Ad
Ad
Ad
Ad

कुलभूषण यांचा खटला नागरी न्यायालयातच चालणार

पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानमधून सकारात्मक वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण यांना नागरी न्यायालयात आव्हान देण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. जाधव यांना हे आव्हान देता यावं यासाठी पाकिस्तानच्या संसदेमध्ये लष्करी कायद्यात दुरुस्तीही केली जाणार आहे...
                 

दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमा; अमेरिकेची संयुक्त राष्ट्रांना विनंती

                 

ट्रम्प प्रशासनात भारतीय आयटी कंपन्यांविरोधात भेदभाव वाढला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील प्रतिबंधात्मक धोरणांमुळे एच-१ बी अर्ज रद्द करण्याचं प्रमाण २०१५ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अमेरिकन थिंक टँककडून जारी करण्यात आलेल्या अहवालात ही बाब समोर आली. नामांकित भारतीय आयटी कंपन्यांचे अर्ज सर्वात जास्त फेटाळण्यात आल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं. ट्रम्प प्रशासनाकडून भारतीय कंपन्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. या आरोपाला बळ देणारी आकडेवारी समोर आली आहे...